Add

Add

0
या पुढे ऑलिम्पिक स्पर्धेत आपण निश्चितच चमकदार कामगिरी करू.
- पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते पद्मश्री मुरलीकांत पेटकर

        पुणे(प्रतिनिधी):- सरकारने खेलो इंडिया स्पर्धेचे आयोजन करून युवकांसाठी क्रीडा क्षेत्रातील संधींची अनेक कवाडे खुली केली आहेत. खेलो इंडियातूनच उद्याचे ऑलिम्पिकवीर पुढे येतील आणि यापुढे  ऑलिम्पिक स्पर्धेत चमकदार  कामगिरी करून पदकांचा दुष्काळ नक्कीच संपवतील असा विश्वास भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांनी आज व्यक्त केला.
    क्रीडा क्षेत्रात या स्पर्धेचे आयोजन करून सरकारने दोन पावले पुढे टाकली आहेत,तर समाजातील उद्योगपतींसह मोठ्या संस्थांनीही आपले योगदान द्यावेअसे आवाहन त्यांनी यावेळी केले.
             सैन्य दलात सेवा बजावताना अपंगत्व आलेल्या पद्मश्री पेटकर यांनी 1972 साली पॅरालिम्पिक स्पर्धेत जलतरण क्रीडा प्रकारात देशाला वैयक्तिक पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले होते . त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांना 1975साली शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरविण्यात  आलातर 2018मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दोन्ही पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्रातील ते पहिले दिव्यांग व्यक्ती आहेत.
             खेलो इंडिया युथ गेम मध्ये जलतरण क्रीडा प्रकारांच्या पदकांचे वितरण श्री. पेटकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ते बोलत होते. पद्मश्री पेटकर म्हणालेआपल्या देशात प्रतिभावंतांची कमतरता नाही. मात्र आपल्या देशातील सर्वसामान्य मुलांना ऑलिम्पिकमध्ये खेळल्या जाणाऱ्या केवळ दोन तीनच क्रीडा प्रकारांचीच माहिती असते. तेच खेळ मुले खेळत असतात. इतर खेळांची माहितीच नसल्याने आपण ऑलिम्पिकमध्ये पदकांची अपेक्षा काय करणार?
           खेलो इंडियाच्या माध्यमातून देशभरातील मुलांना खेळांची माहिती मिळत आहे. या निमित्ताने चांगले प्रशिक्षकचांगली मैदाने,चांगले खेळाचे साहित्य खेळाडूंना मिळत आहे. खेलो इंडियामुळे नवा विश्वास मुलांना मिळत आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंबरोबरच ही स्पर्धा पहायला आलेल्या मुलांनाही खेळाविषयी आत्मियता वाढेलनव्या खेळांची त्यांना ओळख होईल.
           खेलो इंडिया स्पर्धेसारखी स्पर्धा कांही वर्षापूर्वी सुरु केली असती तर आतापर्यंत आपण ऑलिम्पिकमध्ये पदक तालिकेत खूप पुढे गेलो असतो ,असे सांगत श्री .पेटकर म्हणालेगेल्या दोन वर्षापासून खेलो इंडियाचे आयोजन करण्यात येत आहे. याचा चांगला परिणाम नक्कीच आपल्याला पुढच्या काही वर्षात दिसेल. ऑलिम्पिकबरोबरच इतर स्पर्धांमध्येही आपले खेळाडू चमकतील आणि ऑलंपीकमधील पदकांचा दुष्काळ नक्कीच संपवतील.  
             खेलो इंडियाच्या निमित्ताने सरकारने दमदार पाऊल उचलले आहेआता समाजातील इतर घटकांनीही क्रीडा क्षेत्रासाठी योगदान द्यावे. खेलो इंडियाचे अत्यंत नेटके नियोजन केल्यामुळे महाराष्ट्र शासनाची देशभरात नक्कीच चांगली प्रतिमा निर्माण होईलअसा विश्वास श्री पेटकर यांनी व्यक्त केला.
लक्ष वेधून घेतले...
आजची  त्यांची उपस्थिती लक्ष वेधून घेणारी होती ..क्रीडा एक्सपोच्या ठिकाणी नवोदित खेळाडू व शाळकरी मुलांनी त्यांना गराडा घातला. त्यांच्याबरोबर फोटो काढून घेतले. व्यंगावर मात करून आपण ही अवघड कामगिरी कशी यशस्वी करून दाखविली. या बरोबरच सैन्यातील रोमांचक अनुभवही जाणून घेत होते. आज शनिवार असल्याने शाळकरी मुलांची उपस्थिती लक्षणीय होती. त्यांची आजची उपस्थिती आणि मार्गदर्शन निश्चितच प्रेरणादायी होते .

Post a Comment

 
Top