Add

Add

0
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अार्थिक अडचणीत..?


प्रवाशी सवलत याेजनांचा भार, राज्य सरकारकडून रक्कम वेळेवर मिळत नसल्याने ताेटा वाढला 
 
मंगेश फल्ले | पुणे-

राज्य शासनाच्या अादेशानुसार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एसटी) प्रवासी भाड्यात 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक,विद्यार्थी-विद्यार्थिनी,स्वातंत्र्यसैनिक,पत्रकार,अंध व्यक्ती अशा वेगवेगळ्या 24 प्रकारच्या सवलती प्रवाशांना देत असते. सन 1996-97 पर्यंत सदर सवलतींचा भार महामंडळ सहन करत असल्याने महामंडळ ताेट्यात चालले हाेते. त्यामुळे शासनाने 2000 मध्ये जीअार काढून 1996-97 पासून सवलतींची 100 टक्के रक्कम देण्यास मंजुरी दिली. सन 2017-18 अखेर 607 काेटी 75लाख रुपये शासनाकडून परिवहन विभागास येणे शिल्लक हाेते, तर सन 2018-19 चे अंदाजित सवलत मूल्य एक हजार 484.31 काेटी विचारात घेता शासनाकडून सवलत मूल्यापाेटी एकूण दाेन हजार 92 काेटी रुपये येणे बाकी अाहेत.मात्र,शासनाने चालू अर्थसंकल्पात केवळ एक हजार 450 काेटींची तरतूद केली अहे. मंजूर करण्यात अालेली व शिल्लक सवलत मूल्यांची प्रतिपूर्ती वेळेवर हाेत नसल्याने महामंडळाला अार्थिक संकटाला सामोरे जावे लागत असल्याची माहिती परिवहन महामंडळाच्या सूत्रांनी दिली. 
राज्य परिवहन महामंडळातर्फे लाखाे प्रवाशांची राज्यभरात दरराेज वाहतूक केली जात अाहे. राज्याच्या कानाकाेपऱ्यात एसटीची नाळ प्रवाशांशी जाेडली असल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे महत्त्वाचे अंग म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांत अवैध प्रवासी वाहतुकीमुळे महामंडळाचे सुमारे 1000 ते 1200 काेटींचे वार्षिक नुकसान हाेत आहे.याशिवाय जनतेची अडचण समजून घेऊन ताेट्यात चाल णाऱ्या डाेंगराळ व दुर्गम भागातसुद्धा एसटीला फेऱ्या चालवाव्या लागतात. त्यामुळेही महामंडळाचे सुमारे ६०० कोटींचे नुकसान हाेत अाहे. तसेच टप्पे वाहतुकीची मक्तेदारी ही महामंडळाची असतानासुद्धा खासगी वाहतू कदार सर्रासपणे टप्पे वाहतुकीचा वापर करत असल्याने महामंडळास दीड काेटीपर्यंतचा ताेटा सहन करावा लागत अाहे. एसटी महामंडळ वर्षभरात प्रवासी कर, माेटार वाहन कर, टाेल टॅक्स,स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर असे मिळून एकूण एक हजार 38 काेटी रुपये इतका कर शासनास भरत अाहे. अशा परिस्थितीत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षमपणे चालवण्यासाठी शासनाच्या मदतीशिवाय अशक्यप्राय बनत चालले अाहे.
लालपरीपेक्षा वातानुकूलितला महत्त्व : सध्याच्या मितीला राज्यात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात एक लाख पाच हजार कर्मचारी, अधिकारी काम करत असून महामंडळाच्या 18हजार 560 साध्या, निमअाराम व वातानुकूलित बसेस कार्यरत अाहेत. महामंडळ बस ताफ्यातून निकामी झालेल्या जुन्या बसेस माेडीत काढून नवीन बसेसची भर घालत असते. त्यासाठी नवीन बसेस खरेदी तसेच नवीन बस बांधणीसाठी महामंडळ अावश्यकतेनुसार चेसिसची खरेदी करते. गेल्या दाेन ते तीन वर्षांत लालपरी बसच्या एकाही चेसिसची खरेदी करण्यात अाली नसून महामंडळाकडून वातानुकूलित 'शिवशाही' बसेसला प्राधान्य देण्यात अाले अाहे. 
चालू वर्षात एसटीला एक हजार काेटींचा ताेटा 
महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपाेर्ट कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे म्हणाले, परिवहन महामंडळास सन 2017-18 या अार्थिक वर्षात एकूण उत्पन्न 7,162,16काेटी मिळाले असून एकूण खर्च 8,190.94 काेटी झाला असल्याने या वर्षात महामंडळाला 1,028.78काेटी रुपये ताेटा झाला अाहे, तर पूर्वकालीन समायाेजन 309.84 काेटी विचारात घेता निव्वळ ताेटा 1,338.62 काेटी झाला अाहे. महामंडळाचा संचित ताेटा 3,668.62 काेटी असून इंधनाच्या वाढत्या किमती, अनुदान, थकबाकी, वेगवेगळे कर, प्रशासकीय खर्च या बाबींचा माेठा भार महामंडळाला सहन करावा लागत अाहे. सवलतीची रक्कम वेळेत शासनाकडून परिवहन मंडळास मिळणे अावश्यक अाहे, अन्यथा अार्थिक गणित बिघडण्याची शक्यता अाहे. राज्यात सार्वजनिक प्रवासी वाहतूक सक्षमपणे चालवण्यासाठी प्रवाशांना किफायतशीर दरात प्रवास उपलब्ध करून दिल्यास खासगी वाहतुकीने प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी हाेर्इल. त्यामुळे इंधन बचत हाेऊन पर्यावरणाचा ऱ्हास कमी हाेण्यास मदत हाेर्इल. एसटीची सेवा ही 'ना नफा ना ताेटा' या तत्त्वावर चालवण्यासाठी स्थापन झाली. 

Post a Comment

 
Top