Add

Add

0
              मराठीतल्या पहिल्या टॅलेंट मॅनेजमेंट एजंसी .... 
            'ड्रीमर्स पीआर अँड मार्केटिंग'ला झाली पाच वर्ष पूर्ण 
पुणे (प्रतिनिधी ):-सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित, सिध्दार्थ जाधव, स्पृहा जोशीने एकत्र येऊन सेलिब्रेट केला आनंद . मराठी सिनेसृष्टीतली पहिली  टॅलेंट मॅनेजमेंट एजंसी  'ड्रीमर्स पीआर अँड मार्केटिंग' 2014 ला सुरू झाली. अल्पावधीतच मराठीतले अनेक ए-लिस्टर्स सेलिब्रिटी ह्या एजन्सीकडे वळले. आणि  'ड्रीमर्स पीआर अँड मार्केटिंग'ने मराठीतल्या सर्वाधिक बड्या स्टार्सचे मॅनेजमेंट करण्याचा मान मिळवला.
नुकतीच  'ड्रीमर्स पीआर अँड मार्केटिंग'ला पाच वर्ष पूर्ण झाली आहेत.त्यानिमित्ताने सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित, स्पृहा जोशी, सिध्दार्थ जाधव, रोहित राऊत, जुईली जोगळेकर, सायली पंकज, अभय महाजन, दीप्ती सती, आदिती द्रविड, प्रतिक देशमुख, आणि श्रुती कोतवाल ह्या सेलिब्रिटींनी एकत्र येऊन केक कापून आनंद सेलिब्रेट केला. 
अभिनेत्री सई ताम्हणकर म्हणाली, "मी ड्रीमर्स पीआर अँड  मार्केटिंगशिवाय माझ्या करीयरच्या गेल्या पाच वर्षात मी उत्तुंग यश मिळवू शकले. हे यश ड्रीमर्समूळे मी पाहू शकल्याचा आनंद मला आहे. आणि पुढच्या वाटचालीसाठी ड्रीमर्सला माझ्या शुभेच्छा." 
अभिनेत्री अमृता खानविलकर म्हणते, "ड्रीमर्स पीआर अँड मार्केटिंग तुम्ही मराठी सिनेसृष्टीतले 'गेम चेंजर'  आहात. तुम्हांला माझ्याकडून अनेक शुभेच्छा." 
अभिनेत्री हर्षदा खानविलकर म्हणतात, " तुम्ही रॉकस्टार आहात. मराठी सिनेसृष्टीतल्या आसमंतात असेच ता-यांसारखे चमकत रहा. माझ्या तुम्हांला भरभरून शुभेच्छा."अभिनेता सिध्दार्थ जाधव म्हणतो, "संजयदादा आणि दिपकदादांसह संपूर्ण टीमला माझ्या अनेक शुभेच्छा. तुम्ही मला आजवर दिलेल्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी तुमचे अनेक धन्यवाद." 

Post a Comment

 
Top