Add

Add

0
एमआयटी वर्ल्डपीस युनिव्हर्सिटी व एमआयटी एडीटी विद्यापीठातर्फे विश्‍वराजबाग,लोणी काळभोर येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचे  मा.शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते 19 रोजी अनावरण...

पुणे (प्रतिनिधी):-एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी,पुणे व एमआयटी एडीटी विद्यापीठ, राजबाग, पुणे यांच्यातर्फे संपूर्ण जगातील एकमेवाद्वितीय असा एक महान आदर्श जाणता राजा, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, युगपुरूष व संपूर्ण जगासमोर इतिहास घडविणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा शिवजयंतीच्या दिवशी,  मंगळवार, दि.19 फेब्रुवारी 2019 रोजी दुपारी 4.15वाजता जगातील सर्वात मोठ्या घुमटाच्या परिसरात, विश्‍वराजबाग, लोणी काळभोर, पुणे येथे होणार आहे. 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री मा.श्री.शरदचंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. अध्यक्षस्थानी विधानपरिषदेचे अध्यक्ष मा. श्री. रामराजे नाईक निंबाळकर हे असतील. 
महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री मा. ना. श्री.सुधीर मुनगंटीवार, पुण्याचे पालकमंत्री ना.श्री.गिरीश बापट, कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, सातार्‍याचे खासदार  श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती संभाजी राजे, खासदार श्री. शिवाजीराव आढळराव पाटील,माजी केंद्रीय गृहमंत्री श्री. सुशीलकुमार शिंदे, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्री. श्रीनिवास पाटील, सातार्‍याचे आमदार श्री. शिवेंद्रराजे भोसले व आमदार श्री. बाबूराव पाचर्णे हे विशेष सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. 
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अश्‍वारूढ असून त्याची उंची 15 फूट आहे. जवळपास 2 टन ब्राँझचा वापर करून त्याची निर्मिती केली आहे. राजबाग, लोणी काळभोर येथील कॅम्पसच्या प्रवेश द्वाराच्या आतमध्ये आल्यावर प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन होईल. त्यांना पाहिल्यावर संपूर्ण जगात भारत मातेचा संदेश देणार्‍या या भूमीची महती जनतेला कळेल.त्याच प्रमाणे महाराजांच्या या पुतळ्यामुळे परिसराच्या वैभवात नक्कीच भर पडली आहे. येथे येणारे विद्यार्थी व पर्यटकांना महाराजांचे दर्शन घेऊन त्यांना प्रेरणा मिळेल.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी,पुणे तर्फे भारतीय संस्कृती ज्ञान-दर्शन विश्‍वराजबाग या आमच्या संस्थेच्या प्रांगणात ज्ञान-विज्ञानाधिष्ठित भारतीय संस्कृतीवर आधारित, वैश्‍विक भारतीय संस्कृती व परंपरेचे दर्शन घडविणारी, विश्‍वशांती संगीत कला अकादमी, महान अशा 18 ऋषींचे आश्रम, श्रीमद् भगवद्गीता ज्ञानभवन आणि नुकतेच पुण्याच्या वैभवात आणि नावलौकिकात भर घालणारी,मानवता आणि विश्‍वशांतीचा संदेश देणारी जगातील सर्वात मोठी घुमटाकार वास्तू-‘तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर विश्‍वशांती प्रार्थना सभागृह’ आणि विश्‍वशांती ग्रंथालयाची निर्मिती करण्यात आली आहे.अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांनी दिली.

Post a Comment

 
Top