Add

Add

0
पौड (प्रतिनिधी) :-मुळशी तालुक्यातील पौड पोलीस स्टेशन आणि महिला पोलीस पाटील,यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार  दिनांक 10 फेब्रुवारी रोजी हळदी- कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाची सुरवात पौड पोलीस स्टेशनचे निरीक्षक मा.सुरेश  निंबाळकर साहेब यांच्या पत्नी 'मा.सौ.मनीषाताई निंबाळकर' , 'PSI रेखा दुधभाते मॅडम' तसेच मुळशी पंहक्त समितीच्या माजी सभापती 'मा.सौ.कोमलताई वाशिवले'यांच्या हस्ते "निस र्गाची" म्हणजेच "वृक्षाची पूजा" करून करण्यात आली. . ईश्वरी विनोद दातीर(वय वर्षे 10) हिने भरत नाट्यम नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.सर्व महिलांना वाण म्हणून आरोग्यवर्धक असे 'तुळशीचे रोप' देण्यात आले. यानिमित्ताने पौड पोलीस स्टेशन च्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पौड पोलीस स्टेशन च्या "PSI मा.सौ.रेखा दुधभाते मॅडम" यांचा सक्रिय सहभाग आणि उत्कृष्ट नियोजन यामुळे कार्यक्रम खऱ्या अर्थाने यशस्वी झाला. या कार्यक्रमाला मा.श्री सुरेश निंबाळकर साहेब, मनीषाताई निंबाळकर,रेखा दुधभाते मॅडम,कोमलताई वशिवले,स्वातीताई ढमाले,महिला पोलीस पाटील, महिला दक्षता समितीच्या भगिनी आदी सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यांबद्दल सर्वांचे मनापासून आभार. तसेच हे सर्व नियोजन करण्यासाठी सुपे साहेब व इतर सहकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले यासाठी त्यांचे देखील मनापासून आभा

Post a Comment

 
Top