Add

Add

0

               बोतरवाडी शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न..  

पिरंगुट(प्रतिनिधी ):- मुळशी  तालुक्यातील बोतरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. संमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कला कौशल्याचे प्रदर्शन करून उपस्थित मान्यवरांची व ग्रामस्थांची मने जिंकली. भोर-वेल्हश-मुळशी भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष विठ्ठल शेलार व मुळशी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष महादेव कोंढरे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्‌घाटन झाले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक दगडू करंजावणे, बोतरवाडीचे सरपंच संतोष निंबाळकर, ग्रामपंचायत सदस्य समीर शेलार, मारुती पाखरे, मुख्याध्यापक रवींद्र चौधरी आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी हिंदी,मराठी व पंजाबी अशा विविध गीतांवरती नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. आपल्या पाल्यांचे सुंदर अशी नृत्य पाहून पालकही भारावून गेले होते.कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र चौधरी,बशिक्षक,दिनेश भोइर, शिक्षिका अश्विनी थोरात आणि शाळा व्यवस्थापन समिती व इतर शिक्षिका वर्ग यांनी केले होते.

Post a Comment

 
Top