Add

Add

0
                   खापरादेव मंडळाचा माघी श्री गणेशोत्सव सोहळा ...! 

मुंबई (महेश्वर भिकाजी तेटांबे ):-खापरादेव मंडळ हे नेहमीच विविध उपक्रम राबविण्यात अग्रेसर असते त्यात प्रामुख्याने आरोग्य शिबिर , गुढीपाडवा शोभायात्रा , श्री शिवजी महाराज जयंती , विद्यार्थी गुणगौरव सोहळा , स्वच्छता अभियान , गोविंदा उत्सव , कोजागिरी पौर्णिमा , खापरादेव प्रीमियर लीग असे वैविध्यपूर्ण उपक्रम राबविण्यात हातखंडा असलेले खापरादेव मंडळ यांनी 7 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यान माघी श्री गणेशोत्सव सोहळ्याचे आयोजन करिरोड (पूर्व) येथील रामदूत वसाहतीमधील पटांगणात शिस्तबद्ध आणि भक्तिमय स्वरूपात केले आहे हे मंडळाचे 19 वे वर्ष असून या उत्सवात धार्मिक कार्यक्रमा बरोबर सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा शिस्तमय  पद्धतीने साजरे करण्यात आले याप्रसंगी 
विविध मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली क्रीडा शिक्षक माननीय योगेश साळवी , नृत्य दिग्दर्शक सिद्धेश मालप , सिने नाट्य अभिनेता ,दिग्दर्शक महेश्वर तेटांबे ,शैलेश खांबे, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे विभागीय प्रमुख सचिन शिंदे आदी मान्यवरांचा मंडळाचे अध्यक्ष , सचिव यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष सर्वश्री पद्माकर कुवेस्कर , सचिव सुनील मयेकर ,खजिनदार प्रशांत वरावडेकर , नंदकुमार पार्सेकर , सुबोध नारकर , सिद्धेश तळेकर , तुषार लाड तसेच सदस्य दत्ताराम हडकर , 
विशाल माने , प्रसाद तोंडवळकर , अभिजित मंचेकर , गणेश साटम , संदीप साळवी आदी मान्यवर उपस्थित होते 

Post a Comment

 
Top