Add

Add

0
  अण्णा शिरगावकर : दाभोळमधील साठ वर्षे
  विशेषांकाचे शिवजयंतीला दापोलीत प्रकाशन

दापोली(धीरज वाटेकर ):-तालुक्यातील जगप्रसिद्ध दाभोळमध्ये आपल्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण साठ वर्षे घालविलेले आणि सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे शिरगाव (चिपळूण) येथे आपल्या मुलीकडे वास्तव्यास असलेले कोकणच्या प्राचीन इतिहासाचे सं
शोधक, पुराणवस्तू संग्राहक, अभ्यासू लेखक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा शिरगावकर यांच्या अण्णा शिरगावकर : दाभोळमधील साठ वर्षे’ या विषयावरील ‘वाटचाल’ हा संग्राह्यमूल्य असलेला 132 पानी,संपूर्ण रंगीत,दुर्मीळ माहिती, कात्रणे आणि छायाचित्रांचा संग्रह असा विशेषांक शिवजयंतीला उपस्थितांच्या हस्ते प्रकाशित होत आहे. ‘दाभोळमध्ये राहून केलेल्या कामाचा अहवाल आपण वयाच्या 89व्या वर्षी समाजासमोर सादर करीत आहोत’, अशी प्रतिक्रिया या प्रकाशन समारंभाच्या पार्श्वभूमीवर शिरगावकर यांनी दिलेली आहे.

हा प्रकाशन समारंभ शिवजयंती मंगळवार दिनांक 19 फेब्रुवारी 2019 रोजी दुपारी 3.45वा. राधा कृष्ण मंदिर दापोली येथे संपन्न होणार आहे.या विशेषांकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. वाटचाल विशेषांकाची निर्मिती-संकलन-संपादन हे लेखक धीरज वाटेकर आणि त्यांचे सहकारी विलास महाडिक यांनी केले आहे.सौ.नूतन आणि श्री.रविंद्र लब्धे यांच्या नूतन प्रकाशनच्या वतीने हा विशेषांक प्रकाशित होत आहे.यावेळी प्रमुख पाहुणे डॉ.अशोक देशमुख आणि निवृत्त प्राचार्या शांता सहस्रबुद्धे या अण्णांच्यावाटचालीबाबत आपली भूमिका मांडतील. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धीरज वाटेकर करतील.अण्णांच्या दाभोळच्या वास्तव्याबद्दल यावेळी काही निमंत्रित मान्यवर बोल तील. प्रत्यक्ष अण्णा शिरगावकर ही यावेळी आपले मनोगत व्यक्त करतील.कार्यक्रमास येणाऱ्या कोणीहीहार,तुरे,शाल,सत्कार असे नियोजन करू नये.हा निरोपाचा,गप्पा-टप्पांचासाधा कार्यक्रम असणार आहे. कार्यक्रमाचा समारोप साडेसहा वाजता खमंग वडाचहापान यांनी होईल.
साठ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात अण्णांच्या, स्वामी स्वरुपानंदांपासून सत्यसाईबाबांपर्यंत आणि दीनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयींपासून यशवंतराव चव्हाणांपर्यंतच्या झालेल्या मार्गदर्शन भेटींच्या नोंदी अंकात आहेत. वाशिष्ठीच्या तीरावरील दानशूर स्वामीभक्त अंबरीश उर्फ दादा खातू आणि परिवाराच्या सेवाभावी वृत्तीस अण्णांनी हा विशेषांक समर्पित केला आहे. सुरुवातीच्या भागात सुमारे 40 पानात अण्णांनी दाभोळ गावचा विविध अंगांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत आढावा घेतला आहे. दुसऱ्या भागात संबंधित निवडक लेख आहेत. तिसऱ्या आणि अंतिम भागात इतिहास आणि संशोधन, समाजकार्य,सागरपुत्र आणि शैक्षणिक, प्रशस्ती आणि सन्मान या अनुषंगाने सचित्र कार्यदर्शन अनुभ वायला मिळेल. दाभोळच्या इतिहासाचे संदर्भही अंकात आहेत.अण्णांच्या सागरपुत्रवर यापूर्वी लेखन केलेल्या नामवंतांची यादी स्तंभित करते. त्यांचा मरणाच्या दारातून हा लेख वेगळेपणा दर्शविणारा आहे. तर मॅनर्स, एटीकेट्स, शिष्टाचार आणि वागावे कसे ? वगैरे हा लेख अण्णांच्या सेवाकामाचे गमक स्पष्ट करणारा आहे. शंभर वर्षांपूर्वीच्या दाभोळचे वर्णन कवितेची मूळ प्रत, विविध संशोधने, विदेश दौरे, अंजनवेलच्या प्रिन्सची ऐतिहासिक कोकण भेट, दाभोळच्या अनेक जुन्या जाणत्यांच्या आठवणी, दाभोळमधील पहिली शिवजयंती, पुस्तक प्रकाशने, महाराष्ट्राच्या पहिल्या आणि एकमेव मुख्यमंत्र्यांनी केलेली वाशिष्ठी खाडीची सैर, अण्णांच्या प्रचारसभा, मुंबईतील घरेलू कामगार संघाचा प्रारंभ आदि अनेकविध माहितींनी अंक संपन्न आहे.
आपल्या 60 वर्षांच्या दाभोळमधील कारकिर्दीत अण्णांनी समाजकारणराजकारणपुराणवस्तूसंग्रहइतिहास संशोधन या क्षेत्रात डोंगराएवढे काम उभे केले आहे. त्या संपूर्ण कामाच्या अहवालाची दस्तऐवज स्वरुपात संक्षिप्त नोंद असलेल्या या अंकाच्या प्रकाशन समारंभास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे निमंत्रक उद्योजक-पत्रकार रमेश जोशी आणि उखाणेकर श्रीमती मिलन मोहन गुजर यांनी केले आहे.

Post a Comment

 
Top