Add

Add

0

      अनंतराव   पवार महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण...

पिरंगुट(प्रतिनिधी):- मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अनंतराव पवार महाविद्यालयात शैक्षणिक वर्षे 2018-19 या वर्षात विद्यार्थ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरी आणि मिळविलेल्या यशाबद्दल गुणगौरव आणि वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. पंडित शेळके, विनोदी अभिनेते आशुतोष वाडेकर, चित्रपट अभिनेते आणि दिग्दर्शक चेतन चावडा, जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, महाविद्यालय स्थानिक विकास समिती सदस्य बाळासाहेब गोळे, मुळशी तालुका राष्ट्रवादी ग्राहक सरंक्षण समितीचे अध्यक्ष शंकर पवळे, मोहन गोळे, सुरज पवळे, प्रा. अनिल मरे, डॉ. पांडुरंग पाटील, डॉ. प्रवीण चोळके, डॉ. महेंद्र अवघडे, दिलीप बावधने उपस्थित होते.महाविद्यालया तर्फे दरवर्षी दिला जाणार अनंतराव पवार उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.नंदकिशोर उगले,आणिभौतिकशास्त्र विभागातील व्याख्यात्या डॉ. स्मिता लोकरे यांना प्रदान करण्यात आला. तर उत्कृष्ट शिक्षेतर कर्मचारी : निलेश ठोंबरे, विशाल डोळस, विद्यार्थ्यांबरोबरच पीएचडी पदवी प्राप्त केल्याबद्दल इंग्रजीचे व्याखायते डॉ. रोहिदास ढाकणे, इतिहासाचे व्याख्याते डॉ. किसन पालके, पीएचडी मार्गदशर्क मान्यता मिळाल्याबद्दल भौतिकशास्त विभागातील व्याख्याते डॉ. विजय घाडगे यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. तुकाराम चव्हाण आणि प्रा. मिनाली चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.

Post a Comment

 
Top