Add

Add

0

  भविष्यात मुलींबरोबर मुलांनाही सायकली मिळणार-सभापती  कोंढरे 

बावधन(प्रतिनिधी):-भविष्यात जिल्हा परिषद शाळेच्या मुलींबरोबर मुलांनाही खासदार सुप्रिया सुळे यांच्या वतीने सायकली मिळणार आहेत.मुलींच्या शिक्ष णात खंड पडत असल्याची जाणीव झाल्याने खासदार सुळे प्रत्येक उपेक्षित मुलीला सायकल मिळवून देण्यासाठी पुढे आलेल्या आहेत,अशी माहिती मुळशीच्या सभापती राधिका कोंढरे यांनी दिली.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून जिल्हा परिषद सुस शाळेच्या मुलींना सायकल वाटप सभापती राधिका कोंढरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोर विधानसभा राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील चांदेरे होते. यावेळी माजी सभापती आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे, सूस उपसरपंच गजानन चांदेरे, माजी उपसरपंच सचिन चांदेरे, माजी सरपंच नामदेव चांदेरे, पोलीस पाटील मुरलीधर चांदेरे, तंटामुक्ती अध्यक्ष दीपक बांदल, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय चांदेरे, ग्रामपंचायत सदस्य अमोल चांदेरे, सारिका काळभोर, वृषाली चांदेरे, प्रियांका गांडेकर, चेअरमन गणेश सुतार, व्हाईस चेअरमन गोपिनाथ चांदेरे, दशरथ चांदेरे, गुलाब चांदेरे, विठ्ठल सुतार, सुखदेव चांदेरे, रोहन शितोळे, बाप्पू भोते, अनिल चांदेरे, चंद्रकांत काळभोर, मुख्याध्यापक शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
सभापती कोंढरे म्हणाल्या, समाजातील विषमता संपली पाहिजे. त्यासाठी स्त्री शिकून पुढे गेली पाहिजे. दळणवळणाच्या सुविधांअभावी आजही ग्रामीण भागात मुलींना शिक्षण घेणे अवघड आहे. सुस शाळेला 19 सायकली देण्यात आलेल्या असून गरजू विद्यार्थ्यांना सायकली देण्यात येणार असल्याची त्यांनी सांगीतले. मुळशी तालुक्‍यात 1642 सायकली व बारामती लोकसभा मतदार संघात दहा हजार सायकलींचे वाटप खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. त्यामुळे भविष्यात मुलींबरोबर मुलांनाही सायकलींची आवश्‍यकता असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे यांनी सांगितले. सूत्रसंचालन नितीन चांदेरे यांनी केले व दत्तात्रय चांदेरे यांनी आभार मानले.

  • मुलींच्या चेहऱ्यावर आगळा वेगळा आनंद…
    सुसच्या विद्यार्थिनींना सायकल मिळाल्याने मुलींच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता. त्यामुळे एक आगळा वेगळा आनंद दिसत होता. सायकलमुळे वाचलेल्या प्रवास वेळेचा उपयोग आम्ही अधिक अभ्यास करण्यासाठी करणार असल्याचे मुलींनी यावेळी सांगितले.
  • सुस रोड पुलासाठी 15 कोटी मंजूर
    खासदार सुप्रिया सुळे यांनी सुस गावच्या वाहतूक व ट्रॅफीकच्या प्रश्‍नात लक्ष घातले असून सुस रोड महामार्गावरील पुलासाठी 15 कोटी रूपये मंजूर केले आहेत. त्याच बरोबर सुसकरांचा पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी देखील सुळे आग्रही आहेत. असे यावेळी केल्याचे सुनील चांदेरे यांनी यावेळी सांगीतले.

Post a Comment

 
Top