Add

Add

0
संदेश प्रसार धोरण हे लघु-मध्यम वृत्तपत्रांसाठी 
अन्यायकारक असून जाचक अटी रद्द कराव्यात -आप्पासाहेब पाटील

असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूजपेपर्स ऑफ इंडिया, राज्य शाखेची पुणे येथे बैठक संपन्न

पुणे (प्रतिनिधी) - राज्य शासनाच्यावतीने प्रसारित करण्यात आलेले संदेश प्रसार धोरण -2018 हे लघु-मध्यम वृत्तपत्रांसाठी अन्यायकारक असल्यामुळे यातील लादलेल्या  जाचक अटींची दुरूस्ती करावी, आणि शुद्धीपत्रक प्रसिद्ध करावे, अशी मागणी असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूजपेपर्स ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य शाखेचे प्रदेशाध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांनी केली आहे.
असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूजपेपर्स ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य शाखेचे ,राज्य पदाधिकारी, विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व राज्य कार्यकारणी सदस्य यांची बैठक प्रदेशाध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी (पुणे ) येथील नारायण मेघाजी लोखंडे सभागृहात संपन्न झाली. 
प्रदेशाध्यक्ष आप्पासाहेब पाटील म्हणाले, राष्ट्रीय अध्यक्ष चंन्दोलाजी यांनी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव व सचिव तथा महासंचालक, संचालक प्रशासन, संचालक विशेषकार्य, संचालक वृत्त यांच्याशी चर्चा करून लघु मध्यम वृत्तपत्रांच्या समस्या सांगितलेल्या आहेत. यामुळे यापुढे नवीन जाहीरात धोरण (संदेश प्रसार धोरण २०१८) मधील जाचक अटी व नियम त्वरीत रद्द करणेसाठी घेतलेल्या
हरकतीबाबत सनदशीरमार्गाने आंदोलन करावे लागणार आहे. मोर्चा, धरणे, उपोषण अशी आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर आंदोलन करण्याचे नियोजन लवकरच करण्यात येणार असल्याचे सांगून आप्पासाहेब पाटील म्हणाले, महासंचालक, विभागीय संचालक, विभागीय उपसंचालक, जिल्हा माहिती कार्यालय यांना संघटनेच्या जाहीरात धोरण मसुद्यात दुरूस्ती मागणीचे निवेदनांचे महाअभियान तीन वेळा राज्यात एकाच वेळी राबविण्यात आलेले आहे. जाहीरात धोरणात सुधारणा करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्री, खासदार,आमदार यांना भेटून संदेश प्रसारण धोरणातील अन्यायाबाबत माहिती देण्यात येणार आहे.
असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूजपेपर्स ऑफ इंडिया संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन ओरिसा राज्या तील ब्रम्हपूर येथे 30 व 31मार्च रोजी आयोजित केले आहे.असे सांगून आप्पासाहेब पाटील म्हणाले, संघटनांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री महोदय यांना भेटण्यासाठी तारीख निश्चित करून त्यांना लघु मध्यम वृत्तपत्रावर झालेल्या अन्यायाबाबत माहिती देण्यात येणार असून यामध्ये तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात येणार आहे. शासनाने जाहीरात यादीवरून कमी केलेल्या 307 वृत्तपत्रांच्या (आरएनआय 46, अनियमित 143, बंद असलेली 118) फेरपडताळणी करावी आणि ज्या संपादकांच्या अधिस्वीकृती पत्रिका रद्द केलेल्यां आहेत त्यांना अपिलाची संधी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. 
आयोग,कंपन्या,स्थानिक स्वराज्य संस्था,सहकारी संस्था,बाजार समित्या,जिल्ह्यातील शासकीय, निमशास कीय कार्यालये, शासनाची विविध मंडळे/महामंडळे यांची जाहिरात वितरण धोरण 2001 व जाहिरात वितरण सुधारणा धोरणा प्रमाणे जाहिरात वितरण काटेकोर झाले आहे किंवा नाही याची दप्तर (रजिस्टर) तपासणी जिल्हा माहिती अधिकारी यांना अधिकार द्यावेत अशी मागणी मंत्रालयातील बैठकीत करणेत आलेली आहे. जाहिरात धोरणाची काटेकोर अंमलबजावणीबाबत मंत्रालयातील माहिती व जनसंपर्क खात्याचे संचालक प्रशासन, वृत्त व विशेष कार्य यांच्यासमवेत बैठकीत झालेली आहे. जाहिरातधोरणासंदर्भात केलेल्या प्रयत्नाचा नक्कीच यश येईल असे सांगून आप्पासाहेब पाटील म्हणाले,जाहिरात धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करीता जिल्हावार कार्यशाळा आयोजन करावे यासाठी संचालक,उपसंचालक,जिल्हा माहिती अधिकारी यांचे बरोबर चर्चा करून प्रत्येक जिल्ह्यात संघटनेतर्फे कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्यस्तरावरील मध्यम व लघु वृत्तपत्र संपादकांची कार्यशाळा मुंबई किंवा पुणे येथे आयोजित करून संचालक वृत्त प्रशासन व अधिपरिक्षक पुस्तके प्रकाशने यां यांचे मार्गदर्शन करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. असेही आप्पासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले.
ज्येष्ठ संपादक पत्रकारांसाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना लागू करणेत आलेली आहे.याची लवकरच अंमलबजावणी होईल असे सांगून आप्पासाहेब पाटील म्हणाले, अधिस्विकृतीधारक पत्रकार/संपादक यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करावी. यासाठी प्रत्येक जिल्हाध्यक्षांनी त्यात या जिल्ह्यां मध्ये पालकमंत्री यांना निवेदन देऊन चर्चा करावी. अधिस्विकृतीधारक पत्रकार/संपादक यांना त्यांच्या लेटर पॅडबर व व्हिजिटंग कार्डस्वर अधिस्विकृतीधारक पत्रकार/संपादक म्हणून छापणेस परवानगी मिळणे आवश्यक आहे. यासाठी महासंचालक यांना भेटून चर्चा करण्यात येणार आहे. अधिस्विकृतीधारक पत्रकार/संपादक यांचे स्वत:चे मालकीचे वाहन (कार) गाडींना राज्यातील टोल माफ करण्यात यावे यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री यांची भेट घेऊन निवेदन देण्यात येणार आहे यापूर्वी दिलेले आहे आता याचा पाठपुरावा करावा लागणार आहे.सभापती महाराष्ट्र विधानपरिषद यांनी आयोजित केलेल्या विधान भवनातील बैठकी बैठकीमध्ये लघु-मध्यम वृत्तपत्रांच्या अडचणी मांडल्या आहेत व शासनाने शुद्धीपत्रक प्रसिद्ध करावे अशी मागणी केली आहे. दरम्यान याबाबत अद्याप अंमलबजावणी न झाल्याने पुन्हा दुरुस्तीसाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे आप्पासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले.
केंद्र शासनाच्या डी.ए.व्ही.पी. जाहिरात यादीसाठी फेब्रुवारी अखेरपर्यंत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. यासाठी अधिकाधिक लघु- मध्यम वृत्तपत्राच्या संपादकांनी अर्ज दाखल करावेत असे आवाहन राज्य सहसचिव गोरख तावरे यांनी यावेळी केले.केंद्र शासनाच्या डी.ए.व्ही.पी.,आर.एन.आय. पोष्ट खाते याबाबत काही अडचणी असल्यास संघटनेच्या माध्यमातून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे असे गोरख पवार यांनी यावेळी सांगितले.आरएन.आय 31 मार्च 2019 नंतर वार्षिक विवरणपत्र 31 मे पूर्वी वेळेत भरणे आवश्यक आहे अन्यथा आपले आर. एन. आय. रजिस्ट्रेशन रद्द होऊ शकते.नवीन जाहिरात धोरणानुसार जून महिन्यामध्ये वृत्तपत्रांच्या पडताळणी व तपासणी होणार आहे. यासाठी कागद खरेदीचे जी.एस.टी. बिले अत्यावश्यक आहे. याची संपादकांनी नोंद घेऊन नोंद घ्यावी अशी सूचनाही गोरख तावरे यांनी केली.
कोल्हापूर जिल्हातील जाहिराती सीमाभागातील वृत्तपत्रांना दिल्या जातात, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या निधीमध्ये वाढ करावी अशी मागणी करून सीमाभागातील मराठी वृत्तपत्रांना दर्शनी जाहिरात संख्या महिन्याला 2 प्रमाणे वार्षिक 24देण्यात याव्यात त्याचबरोबर सीमाभागातील मराठी पत्रकारांना महाराष्ट्र शासनाची अधिस्विकृति पत्रिका मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह पवार यांनी केली आहे. बैठकीसाठी उपस्थित असलेल्या राज्यपदाधिकारी, विभागीय अध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांनी केलेल्या माहिती यावेळी उपस्थितांना दिली.
प्रारंभी पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात येऊन धारातीर्थी पडलेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्याचबरोबर रायगड जिल्हाध्यक्ष सुनिल दांडेकर व पुणे जिल्हा कार्याध्यक्षांचे वडील कै. बाळसिंग डांगे, उपाध्यक्ष श्यामसुंदर शर्मा यांचे बंधू नरसिंह शर्मा यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना व महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजना तसेचअधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एस.टी. महामंडळाच्या शिवशाही बसमधून प्रवास सवलत, या तिन्ही योजना सुरू केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला. 
आत्मलिंग शेटे, शिवशंकर झाडे ,किसन माने, दत्तात्रय दमकोंडवार,राहुल पाटील,विक्रमसिंह पवार,सम्राट सनगर, अरुण वडेकर,दत्तात्रय सुर्वे,सतीशचंद्र जकाते,शशीकांत डांगे,महेश लोंढे, यशवंत गायकवाड, संदीप डोंगरे, चैतन्य फुलारे, महादेव साकोरे, नितीन तळेकर, आनंद लोके, भीका चौधरी,शरद कुलथे, गोरख तावरे , रंगराव शिपुंकडे यांनी चर्चेत सहभाग घेतला. प्रा. यशवंत गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले.

Post a Comment

 
Top