Add

Add

0
           मंदाकिनी बालवडकर यांच्या  स्मृतीदिनानिमित्त 
             आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट...
पौड (प्रदीप पाटील ):-मुळशी तालुक्यातील बावधन येथील "सेवा फाऊंडेशनच्या" वतीने विद्यार्थी दत्तक योजना 2019 च्या अंतर्गत कै.मंदाकिनी रामदास बालवडकर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त त्यांचे नातेवाईक व संस्थेच्या कार्यकर्त्यांनी गरजु विद्यार्थ्यांना साहित्य भेट देवून श्रद्धांजली अर्पण केली.
कै.मंदाकिनी बालवडकर यांच्या पहिल्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून मुळशी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहोळनगर अंबडवेट येथील कातकरी पाड्यावरील गरजु विद्यार्थ्यांना जेवनाचे डब्बे तसेच खाऊ वाटप करण्यात आला.यावेळी गट शिक्षण अधिकारी माणिक बांगर, विस्तार अधिकारी वाळुंज ,विठ्ठलराव बालवडकर,वैभव मुरकुटे,पोपटराव बालवडकर,सोपान टकले,प्रदीप पाटील,सुशिला खांदवे,राजश्री बालवडकर,छल्लारे सर,मयुरी तोडकर,विशाल बळी, प्रियंका तोंडे तसेच शाळेच्या शिक्षिका तळेकर व मारणे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना सेवा फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित शंकर तोडकर यांनी सांगितले की, मुळशी तालुक्यातील आदिवासी पाड्यांवर अनेक विद्यार्थी परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहतात अशा विद्यार्थ्यांकरिता समाजातील दानशुर नागरिकांच्या मदतीने संस्थेच्या वतीने विद्यार्थी दत्तक योजना सुरु केली आहे.तरी नागरिकांनी वस्तु अथवा आर्थिक स्वरूपात मदत करावी. त्यातून आणखी गरीब व गरजु विद्यार्थांना मदत करता येईल असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.यापुर्वी नागरिकांच्या मदतीतुन 107विद्यार्थी शालेय वस्तूंसाठी दत्तक घेण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी बोलताना दिली.
फोटो - अंबडवेट ता.मुळशी येथील मोहोळनगर कातकरी पाड्यावर शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करताना सेवा फौंडेशनचे कार्यकर्ते, बालवडकर कुटुंबीय आणि उपस्थित मान्यवर 

Post a Comment

 
Top