Add

Add

0

                  हिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ ?

पिंपरी (प्रतिनिधी):- पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हिंजवडी येथील आयटी हबची सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. आयटी हबमध्ये काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी केंद्रीय सुरक्षा बलाच्या दिल्ली कार्यालयाकडून दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
विदेशी कंपन्यांमुळे हिंजवडी आयटी हबला अतिरेकी संघटनांपासून धोका असल्याचे गुप्तचर यंत्रणांकडून यापूर्वीच कळवण्यात आले आहे. त्यामुळे येथील कंपन्यांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय सुरक्षा बलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत,अशी माहिती सहायक कमांडंट अर्चित खेतान यांनी माहिती दिली.
पुलवामा हल्ल्यानंतर कमांडर खेतान यांनी हिंजवडी येथे तैनात असलेल्या सुरक्षा बलाच्या जवानांची तातडीने बैठक घेतली. या बैठकी दरम्यान त्यांनी मुख्यालयालाकडून जारी करण्यात आलेले संदेश जवानांपर्यंत पोह चवले. तसेच दहशतवादी कारवायांची शक्‍यता लक्षात घेत जवानांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. सतर्कतेचा इशारा दिल्यानंतर आयटी हबच्या भोवताली सुरु असलेल्या गस्तीमध्ये दुपटीने वाढ करण्यात आली आहे. कंपनीमध्ये प्रवेश करणाऱ्या अभियंत्यांची अंगझडती तसेच ओळखपत्रांची जवानांकडून कसून तपासणी सुरू आहे. सुरक्षा बलाचे जवान वाहनांची देखील झडती घेत आहेत.
हिंजवडी पोलिसांनी देखील रात्रगस्त वाढवल्या... 
चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी सांगितले. ते म्हणाले, पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर हिंजवडी आयटी हबमध्ये संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी साध्या वेशामध्ये कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच संभाव्य धोके लक्षात घेत आयटी हबमध्ये येणाऱ्या संशयित वाहनांची देखील तपासणी सुरु आहे. तसेच पोलीस आयुक्‍तांनाही यासंदर्भात दक्षतेचा इशारा दिला असून शहरात सर्वतोपरी सरक्षा राखण्याचा प्रयत्न सुरक्षा यंत्रणा करत आहेत.

Post a Comment

 
Top