Add

Add

0
मुळशी पंचायत समितीच्या सभापतीपदी राधिका कोंढरे बिनविरोध 
         पती -पत्नी दोघेही सभापती होण्याचा मुळशी तालुक्याच्या 
             राजकीय इतिहासात पहिला मान कोंढरे कुटुंबीयांना ..
पौड (प्रतिनिधी):- मुळशी पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राधिका महादेव कोंढरे यांची बिनविरोध निवड झाली. 1962 मध्ये स्थापन झालेल्या मुळशी पंचायत समितीच्या २१ व्या सभापती म्हणून कोंढरे या निवडूनआल्या आहेत.
मुळशी पंचायत समितीचे सभापती पद पहिल्या अडीच वर्षांकरिता महिलेच्या खुल्या प्रवर्गासाठी राखीव होते. त्यानुसार पहिल्या दहा महिन्याकरिता धरण भागातील कार्यकर्त्या कोमल वाशिवले यांना संधी देण्यात आली होती. पुढील दहा महिने हिंजवडी गणातील सद स्या कोमल साखरे यांना देण्यात आली होती. त्यानंतर कोमल साखरे यांनी आपल्या नियोजित वेळेत राजीनामा दिल्यानंतर राधिका कोंढरे यांची सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली. 
यावेळी सभापती पदासाठी राधिका कोंढरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी सुभाष भागडे यांनी काम पाहिले. यावेळी गटविकास अधिकारी स्मिता पाटील, निवासी नायब तहसीलदार भगवान पाटील तसेच राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते . राष्ट्रवादी काँग्रेसचे मुळशी तालुका अध्यक्ष व माजी सभापती महादेव कोंढरे हे सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी पक्षाचे कट्टर समर्थक मानले जातात. कोंढुर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून राजकीय वाटचालीचा श्रीगणेशा केलेल्या महादेव कोंढरे यांचा मागील कालावधीत राष्ट्रवादी पक्षाच्या कामात नेहमी सक्रिय सहभाग राहिलेला आहे . मुळशी पंचायत समितीचे उपसभापती, सभापती म्हणून कार्यरत असताना त्यांनी केलेल्या कामाची व आजपर्यंत पक्षाकरिता केलेल्या कार्याची दखल घेऊन पक्ष नेतृत्वाने पिरंगुट गणातून महादेव कोंढरे यांच्या घरात पत्नी राधिका कोंढरे यांच्या रूपाने दुसऱ्यांदा उमेदवारी दिली होती. ती उमेदवारी सार्थ ठरवत अत्यन्त चुरशीच्या निवडणुकीत कोंढरे या विजयी झाल्या होत्या. मागील लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांची मुळशी तालुक्यातून मतदान मिळण्यात पीछेहाट झालेली असताना कोंढरे यांच्या कासार आंबोली गणातून मात्र सुळे यांना मतांची काहीशी आघाडी मिळाली होती. बदलेल्या गणरचनेत पिरंगुटमधील मतदार संघाचा काही भाग हा तसा महादेव कोंढरे यांच्या दृष्टीने नवखा होता. पिरंगुट गणात पिरंगुट शहर हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला असूनही ते आव्हान स्वीकारुन महादेव कोंढरे यांनी आपल्या कामाच्या व रणनीतीच्या बळावर आपल्या पत्नी राधिका कोंढरे यांची विजयश्री खेचून आणली होती. 
त्यांच्या कार्याची पक्ष नेतृत्वाकडून विशेष दखल घेऊन मागील काही महिन्यापूर्वीच महादेव कोंढरे यांना राष्ट्रवादी पक्षाच्या मुळशी तालुका अध्यक्ष पदी नियुक्त करण्यात आले होते त्यानंतर अवघ्या काही महिन्यानंतर त्यांच्या पत्नी राधिका कोंढरे यांना पक्षाने सभापती पदी काम करण्याची संधी दिली आहे. मुळशी तालुक्याच्या राजकीय इतिहासात एकाच घरातील दोघेजण सभापती होण्याचा मान त्यांनी मिळविला आहे.
१[चौकट :- मुळशी पंचायत समितीच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच कोंढरे दाम्पत्याच्या रूपाने पती व पत्नीला सभापती पद मिळण्याची संधी मिळाली आहे 

Post a Comment

 
Top