Add

Add

0
       महाराष्ट्राची सुवर्ण कन्या ...गीता मालुसरे .
                        आंतरराष्ट्रीय जलतरणपटू ......
गीता महेश मालुसरेने महाराष्ट्रासाठीच्या सुवर्णपदकाचा सिलसिला कायम ठेवत पोरबंदर गुजरात येथे झालेल्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवला ...
5 व 6 जानेवारी 2018 रोजी गुजरातमधील पोरबंदरच्या समुद्रात आयोजीत 10 किलोमीटर स्पर्धेत भारतात गीता पहिली आली व 5 किलोमीटर स्पर्धेत तिसरी आली आहे .विशेष म्हणजे 14 वर्षाच्या गीताने ओपन स्पर्धेत हे यश मिळवले आहे . 
मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ... गीताचे पाय तिच्या वडिलांना आंघोळीच्या भांड्यात दिसले आणि वयाच्या तिसरया वर्षीच गीताचा पोहण्याचा सराव सुरू झाला तो आजतागायत 11 वर्षे सुरूच आहे . आज गीता 14 वर्षाची झालीय या 11 वर्षात गीताने अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवले आहे .त्याचबरोबर आपल्या तेराव्या वाढदिवसाला ‘बेटी बचाव ,बेटी पढाओ’ हा संदेश देण्यासाठी तीने मुंबई येथील प्राॅंझ लाईट हाऊस - गेट वे आॅफ इंडीया - वाशी खाडी पुल हे 32 किलोमीटरचे अंतर ६ तासात पोहून पुर्ण केले आहे .असे करणारी ती भारतातील एकमेव मुलगी आहे .अमेरीकेत देखील गीताने भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे . 
हे सगळं ऐकायला छान वाटत आसल तरी त्यामागे गीताने प्रचंड मेहनत घेतली आहे . रोज चार ते पाच तास सकाळ संध्याकाळचा सराव ती गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे . हे सर्व शाळा करून करते हे विशेष. 
कोणत्याही यशस्वी पाल्यामागे सक्षम पालक असावे लागतात .तसाच 
गीतासाठी मालुसरे परिवार ठाम उभा आहे .शेतकरी कुटूंबाची पार्श्वभुमी असलेल्या मालुसरे परिवारातील महेशराव आणि माझा संबंध गेल्या २० वर्षापासूनचा . माझ्या मित्रपरिवारातील अत्यंत जवळचा मित्र . निखळ ,निर्मळ ,निष्कपट आणि निस्वार्थ मैत्री करणारया आमच्या या मित्राने आपल्या मुलीने भारतासाठी आॅलंपिकमधे सुवर्णपदक मिळवावे म्हणून आहेरात्र वाट्टेल तेवढे कष्ट करण्याची तयारी ठेवलीय . संसार चालवण्यासाठी गरजेपुरते पैसे मिळवने बाकी सगळा वेळ मुलांसाठी तो अनेक वर्षांपासून देतोय ... पहाटे 6 ते रात्री 11 पर्यंत मधल्या वेळात गीताला सरावासाठी घेऊन जाणे ,परत येणे ,शाळेत सोडवणे - घेऊन येणे ,परत सरावासाठी जाणे या सगळ्यातून जमेल तेवढे काम करणे व त्यातूनच संसाराचा गाडा ,मुलांची शाळा व खेळासाठी होणारा खर्च भागवने ही मोठी तारेवरची कसरत तो करतोय .परंतु त्याला कधीही पहिले तर हसत मुख समाधानाने जीवन जगताना तो दिसतो . 
त्याच्या तोंडून कायम मी ऐकतो ,आता कितीही काम केले तरी मिळून मिळून किती पैसे मिळणार ....त्यापेक्षा जेवढे पैसे लागतात तेवढच काम करायचे ...लागतात तेवढे पैसे मिळाले म्हणजे बास....
कमवायचय ते भारतासाठी 
आॅलंपिक सुवर्णपदक “...
त्यासाठी प्रयत्न करतोय ,सुदैवाने गीता यासाठी अजुनपर्यंत कमी पडत नाहीये.ती चांगला कसून प्रयत्न करतीय . काळजी वाटते ती मुलांच्या वाढत्या वयातील बदलांची ....मृगजळाच्या मागे न लागता व चंगळवादापासून मुलांना दोन हात दूर ठेवण्यासाठी जर यशस्वी होता आले तर कोणतेही यश मिळाल्याशिवाय रहात नाही ... याची त्याला खात्री आहे .गीता तीच्या वडिलांचा हा विश्वास सार्थ ठरवणार यांत शंकाच नाही. 
अर्थात या सगळ्यासाठी त्याची पत्नी अॅडव्होकेट दिपा महेश मालुसरे यांची भक्कम साथ व इतर सर्व मालुसरे परिवाराचा भक्कम पाठींबा आहेच . 
परमेश्वराला मनःपुर्वक प्रार्थना मालुसरे परिवाराची आणि या बाप लेकीची ईच्छा पूर्ण होवो आणि येणारया काळात गीताच्या माध्यमातून भारताला आॅलंपिकमधे सुवर्णपदक मिळो. 
गीता ,महेश ,दिपा वहिनी व मालुसरे परिवाराचे खुप खुप अभिनंदन व शुभेच्छा .
                                                                               शब्दांकन -श्री .अनिल पवार 
                                                                                भूगाव ,ता. मुळशी ,जी .पुणे 

Post a Comment

 
Top