Add

Add

0


   कलेला भाषा,प्रांत,जात, धर्म आणि देशाच्या सीमा  नसतात 
    ढेपेवाड्या त आयोजित 'सूर मिलाफ ' ह्या मैफलीमुळे सिद्ध ... 

  पौड (प्रतिनिधी):- संगीत किंवा कुठल्याही कलेला भाषा, प्रांत ,जात, धर्म आणि देशाच्या सीमा  नसतात  हेच रविवारी ढेपेवाड्यात आयोजित 'सूर मिलाफ ' ह्या मैफलीमुळे सिद्ध झाले.ह्या पुढेही अशा आगळ्या वेगळ्या संकल्पना ढेपे वाड्यात सादर करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे 
ईस्ट वेस्ट बँडचे निर्माते उदय रामदास (तबला ) ,झेक रिपब्लिक येथील यान किन्सल ,( सॅक्सोफोन -बासरी ) ,विनीत अंतुरकर(गायन ,गिटार ) ,भूपाल लिमये (मेंडोलीन) ,कॅनडा येथील नीरज प्रेम ( सतार ) या कार्यक्रमात सहभागी झाले . 
जुन्या मराठी वाडा  संस्कृतीप्रमाणे बांधलेल्या ढेपे वाड्याच्या आलिशान दिवाणखान्यात भारतीय बैठकीवर बसलेल्या रसिकांसमोर ही  मैफिल रंगली . हंसध्वनी ,चारुकेशी ,खमाज   या भारतीय रागदारीवर आधारित रचना सादर झाल्या . जॅझ ,वेस्टर्न क्लासिकल रचनाही या कलाकारांनी सादर केल्या . आफ्रिकन ,मराठी लोकसंगीतही रसिकांना मोहवून गेले . भैरवीने मैफलीची सांगता झाली .
कार्यक्रमाचे संयोजक व प्रसिद्ध तबला वादक उदय रामदास म्हणाले ' ढेपेवाड्यातल्या दिवाणखान्यात कार्यक्रम करायची खूप दिवसांची इच्छा पूर्ण झाली.इथल्या वेगळ्या वातावरणात  मैफलीचा आनंद वेगळाच होता . '
यान किन्सल म्हणाले ,'भारतीय संस्कृती आणि संगीत महान असून ढेपे वाड्यामुळे मला भारतीय संस्कृती आणि त्यातील राहणीमान जवळून अनुभवता आले. ही वास्तू मला एक वेगळा अनुभव देऊन गेली आहे .

Post a Comment

 
Top