Add

Add

0
   युवशक्‍तीच देशविकासाची खरी शिल्‍पकार - आमदार मेधाताई कुलकर्णी
पुणे (प्रतिनिधी ):-: युवाशक्‍ती हीच देशविकासाची खरी शिल्‍पकार असून येथून पुढे कौशल्‍यात प्राविण्‍य मिळवणारे युवकच देश विकासात मोठ्या प्रमाणात योगदान देतीलअसे प्रतिपादन आमदार प्रा. मेधाताई कुलकर्णी यांनी व्‍यक्‍त केले.
देशभरात सर्वत्र बेरोजगाराची समस्‍या चर्चिली जाता असताना 'यशस्‍वीसारख्‍या संस्‍था कौशल्‍य प्रशिक्षणाच्‍या माध्‍यमातून युवकांना थेट कंपन्‍यांमध्‍ये ऑन द जॉब ट्रेनिंगची संधी उपलब्‍ध करून देत आहे आणि या रोजगारक्षम झालेल्‍या विद्यार्थ्‍यांना कंपन्‍यांमधून रोजगारसंधी उपलब्‍ध होत आहे. ही खरंच कौतुकास्‍पद बाब आहेअसेही मेधाताई कुलकर्णी यवेळी म्‍हणाल्‍या.
शिका व कमवा आणि 'नीमयोजनांच्‍या माध्‍यमांतून कौशल्‍य प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या युवकांना नोकरीची संधी देण्‍यासाठी उद्योगजगताने घेतलेला पुढाकार ही सुद्धा उल्‍लेखनीय बाब असल्‍याचे मेधाताई कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले.
तरपुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्‍यक्ष राजेंद्र पाटील यांनी यावेळी आपल्‍या मनोगतात सांगितले कीयुवक-युवतींना कौशल्‍य विकास प्रशिक्षण शिकवतानाच त्‍यांना स्‍टायपेंडद्वारे कमवण्‍याचीही संधी देणाऱ्या 'यशस्‍वीसारख्‍या संस्‍थांमुळेच स्‍वतःच्‍या पायावर उभे राहू शकणारे स्‍वावलंबी युवक घडत आहेत, ही अभिनंदनीय बाब आहे.
याप्रसंगी आमदार मेधाताई कुलकर्णी व पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्‍यक्ष राजेंद्र पाटील या मान्‍यवरांच्‍या शुभहस्‍ते 'यशस्‍वी'संस्‍थेच्‍या 'यशोगाथाया चतुःमासिकाचे प्रकाशन झाले.
तसेच शिका व कमवा योजना आणि नीम योजनेतून प्रशिक्षण पूर्ण केल्‍यानंतर विविध नामांकित कंपन्‍यांमधून ज्‍या विद्यार्थ्‍यांना रोजगाराचीनोकरीची संधी प्राप्‍त झाली अशा काही विद्यार्थ्‍यांचा प्रशस्‍तीपत्र व सुवर्णपदक प्रदान करून सत्‍कार करण्‍यात आला. तसेच दिल्‍ली येथे नुकत्‍याच झालेल्‍या 'नॅशनल कन्‍व्‍हेन्‍शन ऑन क्वालिटी कन्‍स्‍पेटस्या राष्‍ट्रीय स्‍पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून जपान येथे होणाऱ्या इंटरनॅशनल कन्‍व्‍हेन्‍शन ऑन क्‍वालिटी कन्‍स्‍पेट्ससाठी निवडण्‍यात आलेल्‍या प्रिकॉल लि. या कंपनीतील 'यशस्‍वीच्‍या प्रशिक्षणार्थ्‍यांचाही यावेळी प्रशस्‍तीपत्र देऊन गौरव करण्‍यात आला. यावेळी विद्यार्थ्‍यांचे गायननृत्‍यसमूह नृत्‍य असे विविध कलाविष्‍कार सादर करण्‍यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक संस्‍थेच्‍या मनुष्‍यबळ व्‍यवस्‍थापिका मुग्‍धा हुप्रीकर यांनी तर आभार प्रदर्शन संस्‍थेच्‍या संचालिका स्मिता धुमाळ यांनी केले. यावेळी कार्यक्रमाला 'यशस्‍वीसंस्‍थेचे अध्‍यक्ष विश्‍वेश कुलकर्णीसंस्‍थेचे संचालक राजेश नागरेडॉ. मिलिंद मराठेअधिष्‍ठाता डॉ. राजेंद्र सबनीससंचालक संजय छत्रेसंजय सिंग,मकरंद कुलकर्णीसंस्‍थेचे सर्व अध्‍यापककर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप 'सामूहिक राष्‍ट्रगीता'ने करण्‍यात आला.

Post a Comment

 
Top