Add

Add

0
सुस (प्रतिनिधी):- शिवसेनेचे पुणे जिल्हा सहसंपर्क प्रमुख मुळशी पंचायत समितीचे मा.उपसभापती बाळा साहेब चांदेरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुस ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेत *महिला गटातून महेशदादा फौंडेशन तर पुरुष गटातून चेतक क्लबने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकाविला.*
मुळशी तालुक्यात पहिल्यांदाच मॅटवरील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सलग तीन दिवस चाललेल्या स्पर्धेत जिल्हयांतून महिला व पुरुष असे दोन्ही गटातील मिळून एकूण 40संघांनी सहभाग घेतला होता.बाळासाहेब चांदेरे यांच्याअभीष्ट चिंतन सोहळ्यासाठी व बक्षीस वितरण प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि विविध पक्षाची नेते मंडळी उपस्थित होती.
याप्रसंगी शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, सहसंपर्क प्रमुख माजि.प.सदस्य कुलदिप कोंडे,जिल्हा प्रमुख रमेश कोंडे,मुळशी तालुका प्रमुख संतोष मोहोळ,वेल्हा तालुका प्रमुख शैलेश वालगुडे,वा पहिलवान चित्रपटाचे हेमंत निवंगुणे, पंचायत समिती सदस्य विजय केदारी,उपजिल्हा प्रमुख विशाल पवार,भा.वि.सेनेचे जिल्हा उपसंघटक रामभाऊ गायकवाड,नगरसेवक अमोल बालवडकर,हवेली पंचायत समिती मा.सदस्य सुहास गोलांडे, उपतालुका प्रमुख दिपक करजांवणे,अमोल पांगारे,गणेश भोयणे, नितीन चांदेरे,महिला तालुका संघटिका ज्योती चांदेरे,पांडुरंग दातिर,सुसगावच्या सरपंच अपुर्वा निकाळजे,उपसरपंच गजानन चांदेरे,मा.उपसरपंच सचिन चांदेरे,शुभांगी ससार,ग्रामपंचायत सदस्य अनिकेत चांदेरे,गणेश साळुंके,बाळु निकाळजे,ग्रामपंचायत सदस्या दिपाली पारखी,दिशा ससार,सिमा निकाळजे,मा.सरपंच नारायण चांदेरे,नामदेव चांदेरे,मिरा देवकर,मा.उपसरपंच मिना चांदेरे, मा.चेअरमन दत्तोबा चांदेरे,नवनाथ चांदेरे, मा.उपसरपंच पप्पुदादा चांदेरे,तंटामुक्ती उपाध्यक्ष बाळासाहेब भोते,रोहिदास चांदेरे,सतिश चांदेरे,शाखा प्रमुख वाल्मिक चांदेरे,महिला आघाडी शाखा प्रमुख शांताबाई चांदेरे, सोमनाथ कोळेकर,उत्तम ससार,मा.चेअरमन मारूती चांदेरे, राजाभाऊ ससार,शंकर चांदेरे,युवासेनेचे वैभव शितोळे,संदिप देंडगे,वाल्मिक गायकवाड,प्रतिक दगडे,शिवसेना प्रसिद्धी प्रमुख किसन सुतार,ग्रामस्थ खेळाडु मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच अपुर्वा निकाळजे यांनी केले.सुत्रसंचालन गणेश साळुंके,आभार नवनाथ चांदेरे यांनी मानले.
विजेते संघ व उत्कृष्ठ खेळाडूंची नावे पुढील प्रमाणे - 
महिला विभाग -
प्रथम - महेश दादा फौंडेशन, द्वितीय - जागृती प्रतिष्ठान,तृतीय -राजा शिवछत्रपती संस्था, चतुर्थ - एम. एच.स्पोर्ट्स क्लब, उत्कृष्ठ चढाई -हृतिका होनमाने , उत्कृष्ठ पकड- नगरींद्रा कुरा, अष्टपैलू खेळाडू - तृप्ती लांडगे
पुरुष विभाग - 
प्रथम क्रमांक-चेतक स्पोर्टस क्लब, द्वितीय - उत्कर्ष क्रीडा संस्था, तृतीय -शिवाजी उदय मंडळ, चतुर्थ - बाबुराव चांदेरे फौंडेशन, उत्कृष्ट चढाई -प्रथमेश 
टोणपेकर, उत्कृष्ट पकड - ओंकार घोडके, उत्कृष्ट खेळाडू, समीर ढोकळे 

Post a Comment

 
Top