Add

Add

0

        जिल्हा कृषी महोत्सवात मुळशीतील शेतकऱ्यांचा सन्मान 
                'आत्मा' योजनेअंतर्गत सेंद्रिय गटशेतीला चालना 
पौड (प्रतिनिधी):- कृषी विभागाच्या आत्मा योजनेंतर्गत शेती,शेतीमाल प्रक्रिया व शेतीमाल उत्पादनांची विक्री या विषयात उत्कृष्ट कामगिरी करणारे पुणे जिल्ह्यातील शेतकरी व शेतकरी गटांना महाराष्ट्र शासनाच्या पुणे जिल्हा कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या वतीने बारामती येथे आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनात सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र शासनाचा मुळशी तालुका कृषी विभाग (आत्मा) तसेच इनोरा आणि सुदर्शन केमिकल्स यांच्या मार्गदर्शनाखाली मुळशी तालुक्यातील विविध गावात अनेक शेतकरी प्रयोगशील झाले आहेत. या सेंद्रिय शेती व गट पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये पिरंगुटचे शेतकरी हनुमंत पवळे, अंबडवेट येथील प्रतापराव ढमाले व दत्तवाडी (नेरे) चे नवनाथ जाधव तसेच गडदावणे (अंबडवेट) येथील सेंद्रिय शेती करणाऱ्या भैरवनाथ सेंद्रिय शेतकरी महिला बचत गट यांना बारामती येथील कृषी प्रदर्शनात महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त सचीन्द्रप्रताप सिंह , ‘आत्मा’ पुणेचे प्रकल्प संचालक अनिल बनसोडे, प्रकल्प उपसंचालक अनिल देशमुख, पूनम खटावकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. मुळशीतील या पुरस्कारीत झालेल्या शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा यशस्वी प्रयोग, चारसूत्री भातलागवड, सेंद्रिय फळबाग , भाजीपाला, तर गटातील शेतकऱ्यांनी गटशेती, थेट भाजीपाला विक्री व्यवस्था,एकात्मिक शेती असे विविध प्रयोग केले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेवून या प्रयोगशील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने सन्मानित करण्यात आल्याची माहिती सुदर्शन सुधाच्या मुळशी तालुका प्रकल्प अधिकारी वैशाली मुळे यांनी दिली. 
या शेतकऱ्यांना मुळशी तालुका कृषी विभागाचे सत्यवान नरे, सी.एस.जोशी, झांजे, शेजवळ, कांबळे,एस.एल.शिंपी, कनकधर व आत्मा योजनेचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक व्ही.डी. गवळी, सुदर्शन केमिकलच्या वैशाली मुळे,नो हाऊ फौंडेशन इनोराच्या सरला आंधळे, यांचे सातत्याने मार्गदर्शन लाभले. 
फोटो – बारामती येथे महाराष्ट्र राज्य कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी प्रदर्शनात सन्मान स्विकारताना मुळशी तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी व सेंद्रिय शेती गटाचे सदस्य समवेत कृषी विभागाचे अधिकारी

Post a Comment

 
Top