Add

Add

0
व्हाईस एडमिरल एस.एन.घोरमोडे यांनी स्वीकारली नौदलाच्या पूर्व कमांडची धुरा 

नवी दिल्ली(प्रतिनिधी) : अतीविशीष्ट सेवा पदक व नौसेना पदकाने सन्मानित महाराष्ट्राचे सुपूत्र व्हाईस एडमिरल एस. एन. घोरमोडे यांनी आज विशाखापट्टनम येथे नौदलाच्या पूर्व कमांडच्या प्रमुख पदाचा पदभार स्वीकारला.

 श्री घोरमोडे 1984 मध्ये  भारतीय नौदलात कमांडीग ऑफिसर म्हणून रूजू झाले. त्यांनी  पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमीसह मुंबईतील नेव्हल वॉर कॉलेज आणि न्युपोर्ट येथील युनायटेड स्टेट्स नेव्हल स्टॉफ कॉलेजमधून पदवी संपादन केली. ‘संरक्षण आणि धोरणात्मक अभ्यास’ या विषयात त्यांनी  मुंबई विद्यापीठातून एम.फील आणि पुण्यातील सिंबायोसीस बिजनेस मॅनेजमेट इन्स्टिटयूटमधून पर्सनल मॅनेजमेंट विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

 नौदलातील 35 वर्षांच्या दिर्घ सेवेत त्यांनी  विविध मोहिमांमध्ये योगदान दिले तसेच त्यांनी विविध पदही भूषविली आहेत. त्यांच्या योगदानासाठी 2017 मध्ये अतिविशीष्ट सेवा पदक आणि 2007 मध्ये नौसेना पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आले.  

Post a Comment

 
Top