Add

Add

0
पुणे विभागात 10 लोकसभा मतदार संघ
मतदार संख्या : सुमारे 1 कोटी 94 लाख

पुणे(प्रतिनिधी ): पुणे विभागात पुण्यासह पाच जिल्हयांच्या मतदारांची संख्या 1 कोटी 86 लाख 18 हजार 546 आहे. तर पुणे विभागातील 10 लोकसभा मतदार संघाची मतदार संख्या 1 कोटी 93 लाख 96 हजार 755 एवढी आहे,  अशी माहिती विभागीय आयुक्त  तथा मतदार नोंदणी निरीक्षक डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. दहा लोकसभा मतदार संघात एकूण 58 विधानसभा मतदार  संघाचा समावेश आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत, पनवेल, व उरण विधानसभा मतदार संघाचा समावेश मावळ  लोकसभा मतदार संघात आहे. तर सोलापूर जिल्हयातील बार्शी विधानसभा मतदार संघाचा समावेश उस्मानाबाद लोकसभा मतदार संघात होतो, अशीही माहिती डॉ. म्हैसेकर यांनी दिली.
एकूण 10 लोकसभा मतदार संघापैकी 4 मतदार संघ पुणे जिल्हयात तर सोलापूर व कोल्हापूर जिल्हयात प्रत्येकी दोन लोकसभा मतदार संघ आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी- लोकसभा मतदार संघ निहाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांची नावे व पद पुढील प्रमाणे आहे.
·        33 मावळ – श्रीमती कविता व्दिवेदी (अपर जिल्हाधिकारी पीएमआरडीए),
·         34- पुणे – नवल किशोर राम (जिल्हाधिकारी,पुणे),
·        35 – बारामती – सुभाष डुंबरे (अपर आयुक्त,पुणे),
·        36 –शिरुर – रमेश काळे (अपर जिल्हाधिकारी,पुणे),
·        42 – सोलापूर (अनु. जाती) – डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी, सोलापूर ),
·        43-माढा- रामचंद्र शिंदे, अपर जिल्हाधिकारी, सोलापूर,
·        44 – सांगली – डॉ. अभिजित चौधरी (जिल्हाधिकारी,सांगली),
·        45- सातारा – श्रीमती श्वेता सिंघल (जिल्हाधिकारी,सातारा),
·        47 – कोल्हापूर – दौलत देसाई (जिल्हाधिकारी, कोल्हापूर),
·        48- हातकणंगले – नंदकुमार काटकर (अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर)

जिल्हानिहाय मतदान केंद्रे व मतदान स्थळे : पुणे विभागात शहरी भागात 7 हजार 296 तर ग्रामीण भागात 12 हजार 546 अशी एकूण 19 हजार 842 मतदान केंद्रे आहेत. तर शहरी भागात 2 हजार 52 व ग्रामीण भागात 8 हजार 226 अशी एकूण 10 हजार 278 मतदान स्थळे आहेत. त्यापैकी पुणे जिल्हयात शहरी भागात 4 हजार 404 तर ग्रामीण भागात 3 हजार 262 अशी एकूण 7 हजार 666 मतदान केंद्रे आहेत. तर शहरी भागात 849 व ग्रामीण भागात 2 हजार 127 अशी एकूण 2 हजार 976 मतदान स्थळे आहेत. 
सातारा जिल्हयात शहरी भागात 372 तर ग्रामीण भागात 2 हजार 598 अशी एकूण 2 हजार 970 मतदान केंद्रे आहेत. तर शहरी भागात 212 व ग्रामीण भागात 1 हजार 917 अशी एकूण 2 हजार 129 मतदान स्थळे आहेत.
सांगली जिल्हयात शहरी भागात 582 तर ग्रामीण भागात 1 हजार 823 अशी एकूण 2 हजार 405 मतदान केंद्रे आहेत. तर शहरी भागात 270 व ग्रामीण भागात 1 हजार 150 अशी एकूण 1 हजार 420 मतदान स्थळे आहेत.
सोलापूर जिल्हयात शहरी भागात 1 हजार 53 तर ग्रामीण भागात 2 हजार 427 अशी एकूण 3 हजार 480 मतदान केंद्रे आहेत. तर शहरी भागात 380 व ग्रामीण भागात 1 हजार 531 अशी एकूण 1 हजार 911 मतदान स्थळे आहेत.
कोल्हापूर जिल्हयात शहरी भागात 885 तर ग्रामीण भागात 2 हजार 436 अशी एकूण 3 हजार 321 मतदान केंद्रे आहेत. तर शहरी भागात 341 व ग्रामीण भागात 1 हजार 501 अशी एकूण 1 हजार 842 मतदान स्थळे आहेत.
लोकसभा मतदार संघनिहाय मतदान केंद्रे व मतदान स्थळे :- पुणे विभागात शहरी भागात 7 हजार 369 तर ग्रामीण भागात 13 हजार 367 अशी एकूण 20 हजार 736 मतदान केंद्रे आहेत. तर शहरी भागात 2 हजार 166 व ग्रामीण भागात 8 हजार 338 अशी एकूण 10 हजार 504 मतदान स्थळे आहेत. त्यापैकी पुणे जिल्हयात मावळ लोकसभा मतदार संघात 2 हजार 405 मतदान केंद्रे तर 715 मतदान स्थळे आहेत. पुणे लोकसभा मतदार संघात 1 हजार 944 मतदान केंद्रे तर 363 मतदान स्थळे आहेत. बारामती लोकसभा मतदार संघात 2 हजार 303 मतदान केंद्रे तर 1 हजार 330 मतदान स्थळे आहेत. शिरुर लोकसभा मतदार संघात 2 हजार 227 मतदान केंद्रे तर 945 मतदान स्थळे आहेत.
सोलापूर जिल्हयात सोलापूर लोकसभा मतदार संघात 1 हजार 857 मतदान केंद्रे तर 831 मतदान स्थळे आहेत. माढा लोकसभा मतदार संघात 2 हजार 2 मतदान केंद्रे तर 1 हजार 377 मतदान स्थळे आहेत.
सांगली जिल्हयात सांगली लोकसभा मतदार संघात 1 हजार 787 मतदान केंद्रे तर 1 हजार 39 मतदान स्थळे आहेत.
सातारा जिल्हयात सातारा लोकसभा मतदार संघात 2 हजार 272 मतदान केंद्रे तर 1 हजार 681 मतदान स्थळे आहेत.
कोल्हापूर जिल्हयात कोल्हापूर लोकसभा मतदार संघात 2 हजार 132 मतदान केंद्रे तर 1 हजार 224 मतदान स्थळे आहेत. हातकणंगले लोकसभा मतदार संघात 1 हजार 807 मतदान केंद्रे तर 999 मतदान स्थळे आहेत.
जिल्हानिहाय मतदार :- पुणे विभागात 10 लोकसभा मतदार संघात 58 विधानसभा मतदार संघ आहेत. विभागात जिल्हानिहाय 96 लाख 66 हजार 377 पुरुष मतदार व 89 लाख 51 हजार 819 स्त्री मतदार आणि 350 तृतीय पंथी मतदार असे एकूण 1 कोटी 86 लाख 18 हजार 546 मतदार आहेत.  

लोकसभा मतदार संघनिहाय मतदार – पुणे विभागातील 10 लोकसभा मतदार संघात 1 कोटी 70 हजार 460 पुरुष मतदार आणि 93 लाख 25 हजार 948 स्त्री मतदार तर 347 तृतीयपंथी मतदार असे एकूण 1 कोटी 93 लाख 96 हजार 755 इतके मतदार आहेत.
पुणे विभागात 1 कोटी 86 लाख 18 हजार 546 मतदार असून त्यापैकी 1 कोटी 81 लाख 74 हजार 468 व्यक्तिंना मतदार ओळखपत्र मिळाले आहे. विभागामध्ये 19 हजार 842 मतदान केंद्रे असून सर्व मतदान केंद्रांसाठी 19 हजार 842 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी तर 16 हजार 16 मतदान केंद्रस्तरीय एजंट  असतील.
मतदान केंद्रांवर सुविधा :- सर्व मतदान केंद्रांवर  निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार आठ प्रकारच्या मुलभूत सुविधा देण्याबाबत जिल्हा प्रशासनाला सुचना देण्यात आल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय, मदत कक्ष, स्वच्छता गृह, वीजेची सोय, दिव्यांग व्यक्तिंसाठी रॅम्प आदी सुविधा मतदान केंद्रांवर असतील. मतदान केंद्रांवरील दिव्यांग मतदारांची एकूण संख्या पाहता दिव्यांग मतदारांसाठी आवश्यक त्या सुविधा देण्याचे निर्देश डॉ. म्हैसेकर यांनी प्रशासनाला दिले आहेत. जिल्हा परिषद कार्यालयांनी दिव्यांग उन्नत अभियांनातर्गत जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तिंचे सर्वेक्षण केले असून या यादीनुसार दिव्यांग मतदार यादी अद्यावत करण्याची कार्यवाही सुरु आहे.
मतदार यादी पुर्ननिरिक्षणासाठी विभागातील सर्व जिल्ह्यांना विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी वेळोवेळी भेटी दिल्या असून सर्व राजकीय पक्ष प्रमुख व मतदार नोंदणी अधिकारी यांच्या सोबत बैठका घेऊन आढावा घेतला आहे. तसेच लोकसभा निवडणूक पूर्वतयारीच्या अनुषंगाने विभागातील सर्व जिल्ह्यांना भेटी देऊन निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्या सोबत बैठका घेऊन  योग्य त्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.  त्याचबरोबर विभागीय स्तरावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे  जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक यांच्या समवेत बैठका घेऊन निवडणूकीच्या तयारीचा आढावा घेतला आहे.  
निवडणूक विषयक कामकाजासाठी 1 लाख 68 हजार 636 इतके अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. विविध कामांसाठी विविध पथके स्थापन करण्यात येत असून 855 खर्च देखरेखीसाठी, 922 व्हिडिओग्राफर्स, 751 सूक्ष्म निरीक्षक, 2 हजार 367 झोनल ऑफिसर, 215 भरारी पथके, 219 एसएसटी पथके (स्थिर पथक), 183 व्हिडिओ सर्व्हायलन्स पथके, 72 व्हिडिओ  पाहणी पथक, 77 लेखापथक नियुक्त करण्यात येत आहेत.
दळणवळण व्यवस्थापन :- 19 हजार 842 मतदान केंद्रासाठी म्हणजेच 2हजार 288 सेक्टरसाठी 3 हजार 50 बसेस आवश्यक असून 2 हजार 292 वाहनांची क्षेत्रिय अधिकाऱ्यांसाठी आवश्यकता आहे.  
निवडणूकीच्या अनुषंगाने आचारसंहिता भंगाच्या नागरिकांच्या तक्रारी नोंद करुन घेण्यासाठी सीव्हिजिल ॲप उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच एनजीआरएस सिस्टीम  ऑनलाईन तक्रार नोंदणीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे.
सैन्यातील सर्व्हिस वोटर्स साठी ईटीपीबीएस (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्स्मीटेड पोस्टल बॅलेट सर्व्हीस) यावेळी नव्याने उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट चे मशिनची हाताळणी करण्यासाठी पुणे विभागात 11 हजार 747 ठिकाणी शिबिर घेण्यात आले. तसेच 7 लाख 57 हजार 111 मतदारांनी या मशिनची हाताळणी केली आहे.
000000000000-- 
उपसंचालक (माहिती),
विभागीय माहिती कार्यालय, 
नवीन मध्यवर्ती इमारत, पुणे-01
दुरध्वनी क्रमांक - 020-26123435
फॅक्स क्रमांक - 020-26119520
ई-मेल आयडी- ddpune@gmail.com
सोशल मिडिया:


-- 
उपसंचालक (माहिती),
विभागीय माहिती कार्यालय, 
नवीन मध्यवर्ती इमारत, पुणे-01
दुरध्वनी क्रमांक - 020-26123435
फॅक्स क्रमांक - 020-26119520
ई-मेल आयडी- ddpune@gmail.com
सोशल मिडिया:

Post a Comment

 
Top