Add

Add

0

शहरातील प्रसिद्ध जलद गती सेवा रेस्टॉरंट "अपसाऊथ"
आता वानवडीमध्ये सुरु....
पुणे(प्रतिनिधी ):-पुणे येथीलप्रसिद्ध क़्युएसआर साखळीतील अपसाऊथ आता अलिकडेच वानवडीमध्ये सुरु झाले आहे. विमान नगर, पुणे विमानतळ,औंध,वाकड आणि फिनीक्स मार्केट सिटी मध्ये यशस्वी सुरुवात झाल्यानंतर आता या ब्रँडचे सहावे दालन वानवडी मध्ये सुरु झाले आहे.

अपसाऊथ मध्ये स्वच्छ आणि लाईव्ह स्वयंपाकघर असलेल्या वातावरणात खूप चांगले, अस्सल आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थ वेगवान सेवेत मिळतात.सेल्फ सर्व्हिस आणि बसून खाण्यासाठीचे हे रेस्टॉरंट आहे. वेगवान सेवा आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थ यामुळे विद्यार्थ्यांना पटकन खायचे पदार्थ मिळण्याची सोय असलेले,कुटुंबाला निवांतपणे बसून खाता येणारे आणि कार्यालयात जायची गडबड असणाऱ्यांच्या दृष्टीने सोयीचे असे रेस्टॉरंट आहे.सर्वाना आवडणारे पदार्थ जसे की इडली आणि डोस्याचे विविध प्रकार,मेदू वडा,उत्तप्पा,फिल्टर कॉफी,पद्डू,दक्षिण भारतीय कॉम्बो,जेवण आणि इतर अनेक पदार्थ आहेत. इथले प्रसिद्ध पदार्थ जसे की उथली, मलबारी परोठा सँडविच, साबुदाणा चीज वडा, एलानीर मुज, मँगो मोक्ष आणि पौष्टिक धान्य पराठा हेही येथे मिळणार आहेत. या सगळ्याच्या किमतीही खूपच माफक आहेत. प्रत्येक व्यक्तीला सरासरी 80-90रुपये लागतात. किफायतशीर किमतीत उच्च दर्जाचे पदार्थ ही इथली खासियत आहे.
 अपसाऊथ हे जलद गती सेवा रेस्टॉरंट असून भारतातील आघाडीची हॉस्पिटॅलिटी साखळीतील एक असलेल्या बिलियन स्माईल्स हॉस्पिटॅलिटी प्रा.ली चा तो ब्रँड आहे. 
“उभरत्या वातावरणात सोयीचे, परवडणाऱ्या किमतीतील, स्वच्छ आणि उच्च दर्जाचे दक्षिण भारतीय जलद गती सेवा रेस्टॉरंट निर्माण करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत.अंतर्गत गुंतवणूक आणि फ्रांचायझी पर्याय यांच्या माध्यमातून पुणे बाजारपेठेत मोठा ठसा उमटविण्याचा आमचा प्रयत्न आहे.दक्षिण भार तीय खाद्यपदार्थ खूप लोकप्रिय आहेत आणि दिवसभराच्या जेवणासाठीही ते योग्य आहेत.त्यामुळेसंपूर्ण देशभर यशस्वी जलद गती सेवा रेस्टॉरंट साखळी उभारण्याची मोठी संधी अपसाऊथला आहे,” असे बिलियन स्माईल्स हॉस्पिटॅलिटी प्रा.ली.चे उपाध्यक्ष कुमार गौरव म्हणाले.
 आधुनिक जलद सेवा पद्धतीने भारतीय आणि दक्षिण भारतीय शाकाहारी खाद्यपदार्थ सादर करण्यासाठी अपसाऊथ बांधील आहे. सर्वोत्तम स्वच्छ आणि निरोगी वातावरणात कमीत कमी किमतीत दोन्ही प्रकारांतील उच्च दर्जाचे पदार्थ अपसाऊथ सादर करत आहे. मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय साखळी हॉटेल उद्योगांमध्ये औद्योगिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया केलेले अन्न वापरतात. पण तसे न करता अपसाऊथ मध्ये ताज्या घटकपदार्थांपासून खाद्यपदार्थ बनविले जातात.
 कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह शेफ मनू आर नायर म्हणाले की, “आधुनिक जगाशी सुसंगती राखताना अपसाऊथने भारतीय आणि दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांच्या अनुभवाची पुनर्व्याख्या केली आहे. आम्ही आधुनिक रुपात सकस, ताजे, पौष्टिक आणि संपूर्ण भारतीय आणि दक्षिण भारतीय शाकाहारी पदार्थ सादर करत आहोत.”
 या स्थळांव्यतिरिक्त वर्ष अखेरीपर्यंत शहरात आणखी काही आउटलेट सुरु करण्याचा ब्रँडचा विचार आहे.
पत्ता: अपसाऊथ, विठ्ठलराव शिवरकर रस्ता, वानवडी, पुणे -411040



Post a Comment

 
Top