Add

Add

0
चिपळूण पर्यटन वाढीसाठी पश्चिम महाराष्ट्रवासियांना साद
वाशिष्ठी बोटिंग आणि क्रोकोडाईल सफारी ; ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’चे प्रयत्न  
चिपळूण : कोकणची सांस्कृतिक राजधानी असलेल्या चिपळूण शहराला ‘ऑफबीट टुरिझम डेस्टिनेशन’ बनविण्यासाठी सातत्याने गेली सहा वर्षे प्रयत्नशील असलेल्या ग्लोबल चिपळूण टुरिझम मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकताच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांचा दोन दिवशीय दौरा केला. या दौऱ्यात, निसर्ग आणि पर्यटनात रुची असलेल्या स्थानिक समाजघटकांपर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी तीन स्वतंत्र पत्रकार परिषदा आणि तीन जिल्ह्यातील बावीस पर्यटन कंपन्या आणि प्रतिनिधींच्या भेटी घेण्यात आल्या. या माध्यमातून चिपळूण पर्यटन वाढीसाठी पश्चिम महाराष्ट्रवासियांना साद घालण्यात आल्याची माहिती ग्लोबल चिपळूण टुरिझमच्या सूत्रांनी दिली.
संस्थेचे चेअरमन श्रीराम रेडीज यांच्या नेतृत्वाखाली संचालक आणि वन्यजीव अभ्यासक निलेश बापटलेखक आणि पर्यटन अभ्यासक धीरज वाटेकरसंस्थेचे मॅनेजर विश्वास पाटील यांनी या दौऱ्यात सहभाग घेतला. कोल्हापूरच्या ट्रेड विंग्स (बळीराम वाराटे), एन.टी.टी. ट्रॅव्हल्स (समीर शेठ), कोंडुसकर हॉलिडेज (समीर वारुटे), मिरजे टूर्स (आदित्य मिरजे), राणा हॉलिडेज (सतीश दळवी), पर्पल टूर (पराग भोपळे), एन. एन. अत्तार (रसिका ट्रॅव्हल्स), गगन टूर्स (नंदिनी कुपेरकर), अल्पाईन टूर्स (नवनाथ सुर्वे), श्रीनाथ टूर्स (सतीश पोवार), हिरु हॉलिडेज (उमेश पोवार), साताऱ्याच्या ज्योती टूर्स, साई टूर्स, ग्लोबल हॉलिडेज, अमित टूर्स, विहार ट्रॅव्हल्स (प्रशांत ढेकणे), सांगलीच्या अमित टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स, पंकज ट्रॅव्हल्स, गजानन टुरिझम, गुरुनाथ ट्रॅव्हल्स, पार्थ हॉलिडेज, नंदिनी ट्रॅव्हल्स यांच्या भेटी घेण्यात आल्या. संस्थेच्या प्रतिनिधींनी चिपळूण पर्यटन श्रीमंती, पर्यटन सुविधा, सुरक्षा, निसर्ग आणि वनपर्यटन यांची माहिती उपस्थितांना दिली. पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येणाऱ्या पर्यटकांची पाऊले आगामी काळात ‘ऑफबीट टुरिझम डेस्टिनेशन’ चिपळूणकडे वळावित याकरिता निश्चित सहकार्य करण्याचे आश्वासन सर्वांनी दिले. हा दौरा समाधानकारक झाल्याची प्रतिक्रिया संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.     
वाशिष्ठी नदीच्या तीरावरशहराचा पहारेकरी असलेल्या किल्ले गोविंदगडाच्या पायथ्याशीगोवळकोट धक्का परिसरात ही संस्था गेली सहा वर्षे महोत्सवांच्या माध्यमातून चिपळूण पर्यटन वृद्धीसाठी प्रयत्न करते आहे. संस्थेच्या वतीने आगामी दिनांक 4 ते 6 मे 2019 दरम्यान वाशिष्ठी समर बोटिंग आणि क्रोकोडाईल सफारीचे आयोजन करण्यात आले आहे. क्रोकोडाईल सफारीचा वैविध्यपूर्ण अनुभव देणारा हा महाराष्ट्रातील एकमेव उपक्रम आहे. या वर्षाअखेरीस दिनांक 28ते 30डिसेंबर 2019दरम्यान चिपळूण बॅकवॉटर फेस्टिव्हल आणि क्रोकोडाईल सफारी २०१९’ हा महोत्सव होणार आहे. यात एस. आर. जंगल रिसोर्ट धामणवणे येथे विविध साहसी क्रीडा प्रकारांचे आयोजनही करण्यात येणार आहे. सह्याद्री टायगर रिझर्व्हला लागून असलेल्या चिपळूणच्या बफर झोनमध्ये संस्थेने, वनखात्याच्या परवानगीने विविध साहसी पदभ्रमण मोहिमा (ट्रेक्स) निश्चित केल्या आहेत. हिरवेगार निसर्गवैभव‘वाशिष्ठी परिक्रमा : उगम ते संगम’ दर्शन, रमणीय खाड्यागड-किल्लेप्राचीन मंदिरे यांसह चिपळूण परिसरातील वाशिष्ठी खाडीतिच्यातील छोटी-मोठी बेटेसह्याद्रीच्या पर्वत रांगाकोकणी खाद्यपदार्थ आणि येथील समृद्ध लोकजीवनाचा अनुभव पर्यटकांना मिळावाअसा संस्थेचा प्रयत्न आहे. संस्थेमार्फत तीव्र पावसाळी दिवस वगळून क्रोकोडाईल सफारी कायम सुरु असते. सकाळी 11 ते 6वा. पर्यंत विविध 6 सुशोभित नौकांच्या माध्यमातून जलपर्यटन व क्रोकोडाईल सफारी मध्ये खाडीकिनारी निवांत वाळूत पहुडलेल्या मगरींचे दर्शनविविध जलचर आणि पक्ष्यांचे दर्शन पर्यटकांना घडते. ही पर्यटक किमान फेरी 1तासाची असते. पर्यटकांना चिपळूण पर्यटन दर्शन आणि किल्ले गोविंदगडालाही भेट देता येते.
कोकणच्या निसर्गावर नितांत प्रेम करणाऱ्याआपला सुट्टीतील आनंद द्विगुणित करू इच्छिणाऱ्या राज्यभरातील पर्यटनप्रेमींनी ऑफबीट चिपळूणला भेट द्यावी असे आवाहन ग्लोबल चिपळूण टुरिझम’ संस्थेतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी विश्वास पाटील मो. 9823138524,7057434319येथे संपर्क साधावाअसे आवाहन अध्यक्ष राम रेडीज यांनी केले आहे.
अधिक माहितीकरिता ऑनलाईन न्यूज लिंक :

Post a Comment

 
Top