Add

Add

0
‘सावट’मधल्या इन्वेस्टिगेटिव्ह ऑफिसरच्या
 भूमिकेसाठी स्मिता तांबेने कापले केस


पुणे (अनुजा कर्णिक ):-सौरभ सिन्हा दिग्दर्शित सावट चित्रपटामध्ये अभिनेत्री स्मिता तांबे एका इन्वे स्टिगेटिव्ह ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. आपल्या वैविध्यपूर्ण सशक्त स्त्री भूमिकांनी आजवर सिनेसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलेली स्मिता तांबे ह्या सिनेमातून पहिल्यांदाच एका पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. पहिल्यांदाच अशी भूमिका करताना स्मिता तांबेने खूप तयारी केली होती.
अभिनेत्री स्मिता तांबे ह्याविषयी म्हणते, “आजवर मराठी-हिंदी सिनेमांमधून अनेक अभिनेत्रींनी पोलिसी खाक्याच्या भूमिका साकारल्या. त्यामूळे अशा भूमिका आपल्याला नवीन नाहीत. म्हणूनच आदिती देशमुखच्या भूमिकेत काहीतरी नाविन्य आणण्याची जबाबदारी माझ्यावर होती. भूमिकेचा अभ्यास करताना मला लक्षात आलं. आदितीची निरीक्षणक्षमता खूप चांगली आहे. ती शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून गुन्हे सोडवणारी ऑफिसर आहे. आपल्या गतकाळातल्या अनुभवांनंतर ती थोडीशी रागीट आणि आक्रमक आहे. मग तिच्या शारीरीक अभिनयावर काम करणं जरूरीचं होतं.”
स्मिता तांबे पूढे म्हणते, “ती साध्या वेशातली पोलिस आहे. त्यामूळे मग ती वेस्टर्न कपडे घालताना पँट कोणत्या आकाराच्या वापरेल. तिचा बसण्या-उठण्यात, चालण्यात-बोलण्यात कसा अॅटिट्यूड असेल, ह्यावर मी संशोधन केले. तिचे शूज कसे असतील ह्यावरही विचार केला. कामात व्यग्र असलेल्या आदितीला तयार व्हायला कमीत कमी वेळ लागेल, असेच कपडे असायला हवे होते. तसेच तिला केस विंचरायलाही जास्त वेळ लागायला नको. म्हणून हेअरकट केला. केस-स्ट

डी चालू असताना तिची हातावर लिहायची स्टाइल डेव्हलप केली. तिचे वागणे मॅस्क्युलीन असेल, ह्यावर भर दिला.”
सावट सिनेमा सुपरनॅचरल थ्रिलर आहे. श्रावण महिन्यातल्या एका ठराविक रात्री एका गावात दरवर्षी एक आत्महत्या होते. सात वर्षात सात आत्महत्या झालेल्या ह्या गावात इन्वेस्टिगेटिव्ह ऑफिसर आदिती देशमुख आत्महत्यांचा तपास करायला येते. आणि मग काय घडतं ते सिनेमात पाहायला मिळतं.
'निरक्ष फिल्म्स'च्या सहयोगाने 'लेटरल वर्क्स प्रा.लि.' आणि 'रिंगीग रेन फिल्म्स’च्या सावट चित्रपटाचे दिग्दर्शन सौरभ सिन्हा ह्यांनी केले आहे. हितेशा देशपांडे, स्मिता तांबे, आणि शोभिता मांगलिक ह्यांची निर्मिती असलेल्या 'सावट' चित्रपटात श्वेतांबरी, मिलिंद शिरोळे, संजीवनी जाधव आणि स्मिता तांबे  मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 22 मार्च 2019 ला  संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.

Post a Comment

 
Top