Add

Add

0
वुमन्स डेला डिजीटल इन्फ्लुएन्सर्स कॉनक्लेव्हमध्ये
 सई ताम्हणकरची विशेष उपस्थिती

पुणे (अनुजा कर्णिक ):-डिजीटल डिटॉक्सवरून नुकत्याच परतले ल्या अभिनेत्री सई ताम्हणकरला वीस्क्वेअर डिजीटल इन्फ्ल्यु एन्सर कॉनक्लेवसाठी विशेष आमंत्रण होते. भारतातल्या पहिल्या इन्फ्ल्युएन्सर मार्केटिंग कॉनक्लेव्हमध्ये उपस्थित महिलांवर सई ताम्हणकरने आपल्या प्रभावी विचारांनी ठसा उमटवला. पॉवर ऑफ डिजीटल वर्ड ऑफ माउथ ह्याविषयावर सईने ह्या कॉनक्लेव्हमध्ये आपले विचार मांडले.
महिला दिन साजरा करण्याविषयीचे विचार मांडताना सई ह्यावेळी म्हणाली, महिला दिनी पुरूष आणि महिला असा भेदभाव न करता, एकत्र येऊन दोघांच्याही शक्तिस्थानांचा योग्य वापर व्हायला हवा. महिला दिन म्हणजे पुरूषांना कमी लेख ण्यासाठी किंवा हिन वागणूक देण्यासाठी नसून महिला दिन आपल्याला आठवण करून देण्यासाठी आहे की,आपण खूप कर्तृत्ववान, कर्तबगारी आणि सुंदर आहात. तुम्ही दैवी देणगी आहात. आणि हे लक्षात ठेऊन ध्येयाकडे आपल्याला वाट शोधत पोहोचायचे आहे. सृजनाची क्षमता असलेल्या बाईला जगात अशक्य असं काहीच नाही असं मला वाटतं.
सोशल मीडियाविषयी सुध्दा सईने आपली परखड मतं मांडली. ती म्हणाली, सोशल मीडियावर पोस्ट टाकताना सुध्दा तुमच्या व्यक्तिमत्वाचा आरसा त्यातून दिसणं मला महत्वाचा वाटतं. त्यामूळे मी जशी वैयक्तिक जीवनात आहे, तसाच माझा वावर सोशल मीडियवरही असतो.”
ट्रोलिंगविषयी विचारल्यावर सई ताम्हणकर म्हणाली, मी ट्रोलर्सकडे जास्त लक्ष देत नाही. आपण ट्रोलर्सना ओळखतही नसतो. तेव्हा चेहरा नसलेल्या व्यक्तिंना किती महत्व द्यायचं हे तुम्हांला कळायला हवं.   
सोशल मीडियाविषयी उत्सुकता असली, तरीही अजूनही अनेक महिला सोशल मीडियावर एक्टिव्ह नाही आहेत. ती अशा महिलांना उद्देशून म्हणाली, सोशल मीडिया हे एक प्रभावी माध्यम असलं तरीही अनेक टॅलेंटेंड महिलांना ते आपल्या व्यवसायवृध्दीसाठी वापरता येउ शकेल ह्याविषयी माहिती नाही. अशा सर्व कतृत्ववान महिलांना मी ह्या नव्या माध्यमाचा पूरेपूर वापर करायचा सल्ला देईन.

Post a Comment

 
Top