Add

Add

0
सार्वत्रिक निवडणूक तयारीसंदर्भात
स्वीप’ आणि पीडब्ल्यूडी’ समितीची बैठक संपन्न

पुणे(प्रतिनिधी):-लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक शाखेतर्फेविविध समित्यां ची स्थापना करुन तयारीचा आढावा घेण्यात येतोया अनुषंगाने स्वीपआणि पीडब्ल्यूडी’ सुकाणू समितीची बैठक उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंग यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडलीयावेळी मतदान जनजागृती मोहिम,मतदान संकल्प पत्र वितरण,शाळा व महाविद्यालयात इलेक्टोरल लर्नींग क्लबची स्थापना करणेशासकीय व निमशासकीय कार्यालयेसंस्थांमध्ये मतदार साक्षरता मंच स्थापणे, ग्राम पंचायत स्तरावर चुनाव पाठशाला’ आयोजित करणेदृक-श्राव्य माध्यमांचा वापर करुन निवडणूक प्रक्रियेबद्दल प्रचार करणेदिव्यांग मतदारांचा शोध घेणेदिव्यांग मतदारांची नोंदणीदिव्यांग मतदारांना मतदानाप्रसंगी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देणेनिवडणूक प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग वाढविणे याचा आढावा उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंग यांनी घेतला. उपजिल्हाधिकारी सुभाष बोरकरजिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग तसेच नेहरु युवा केंद्राचे समन्वयक यशवंत मानखेडकर यांनी उपस्थित अधिकारी व समिती सदस्यांना मार्गदर्शन केलेबैठकीला विविध विभागांचे अधिकारीसमितीचे सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

 
Top