Add

Add

0

जिद्द व चिकाटी  मेहनत प्रबळ इच्छा शक्तिची ज़रूरत -संगीता खोजे  
  • ग्रामीण भागात शिक्षण संस्था
  •  लहापनी  वडिलांचे छत्र हरपले 
  • पती व एक मुलाचे आपघाती निधन                           कमवा व शिका हा स्वत.आनूभव
घोटवडे ..येथे "शंतनू श्रीकांत शिक्षण संस्था "न्यू डेल इंग्लिश मेडियम स्कुल "संस्थापक  संगीता श्रीकांत खोजे यांची वेगळी जीवन कथा मुळ गाव आळकुटी ता .पारनेर जि .अहमदनगर येथील बंगाळ परिवारातील मुलगी  प्राथमिक व माध्यमिक शिक्षण आळकुटी येथे झाले त्याच काळात वडिलांचे छत्र हारपले .मग नातेवाईकाकडे शिक्षनासाठि  पुण्याला आल्या कमवा व शिका या प्रमाणे वाडिया कॉलेज मधे B.S.C. B.e.d  पूर्ण केले ते ही हालाखीच्या परिस्थितीत .
पुणे सांगवी येथे राहणारे व खाजगी शिकवणी वर्ग घेत आसलेले श्रीकांत खोजे B.S.C..L.L.B.M.B.आशा उच्च शिक्षित श्रीकांत यांच्याशी विवाह  झाला सांगवी .दापोडी .नवी सांगवी येथे खासगी शिकवणी घेणाऱ्या पतीस त्या शिकवणी घेण्यास मदत करीत त्याना एक मुलगी आदीती .एक मुलगा शंतनू तसा संसार सुखात चालला होता. आशात  नियतिच्या मनात काही वेगळेच होते " खेळ कुणाला दैवाचा कळला "या प्रमाणे हे सर्व कुटुंब मुंबई येथे जात आसता दुर्दैवाने घाला घातला त्यांच्या गाडीस आपघात होऊन पती श्रीकांत व मुलगा  शंतनू यांचे जागीच निधन झाले व संगीता याही जखमी झाल्या त्यामुळे त्याना फार मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले त्यात कुटुंबाची  व कर्जाचा डोंगर घेऊन परिस्थितीस सामोरे जावे लागले. 
पुढे न डगमगता एक मुलगी आदीती कडे पाहून शिकवणी वर्ग सुरू केले तीन ठिकाणी वर्ग.सांगवी दापोडी नवी सांगवी .दिवस रात्र मेहनत करून चांगले शिक्षक नेमुन शिकवणी सुरू ठेवली व मुलीला ही चांगले शिक्षण देण्याचे सुरू ठेवले आज मुलगी भारतात उच्च शिक्षण घेऊन आमेरीकेत कमिन्स विद्यापीठात B.E. संगणक पूर्ण करताना सिनेट मेंबर निवडून आली व आज अमेरिकेत नौकरी करत आहे
  येवढे करून त्या थांबल्या नाही काहीतरी करायची सुप्त इच्छा मनात होती समाजाचे देने लागतो या तत्वाने त्यानी घोटवडेयेथे इंग्रजी शाळा सुरू करण्याचे ठरविले शहरात राहणारी भगिनी ग्रामीण भागात शाळा सुरू करताना आनेक आडचनी प्रयत्न सुरू केले जमीन विकत घेतली पैशाची अडचण वित्तीय संस्थाचे सहकार्य घेतले सहा वर्ग खोल्या तयार झाल्या शासन दरबारी परवानगी साठी हेलपाटे सुरू केले संस्था नोंद करून  राज्य शासनाची परवानगी मिळाली .जि .प .पुणे यांची परवानगी मिळाली व 58 मुलांवर शाळा सुरू झाली
  शाळेला शिक्षक महत्वाचे ते शहरातून येण्यास वाहन व्यवस्था करावी लागते  विद्यार्थी वाहतूक बस सुरू केली पुढे विद्यार्थी वाढत गेले जागा भाड्याने घेऊन प्राथमिक व माद्यमीक वर्ग सुरू ठेवले आनंत आडचनी शाळेची इमारत बांधायचे ठरले संगीता खोजे यानी घर वित्तीय संस्थेस तारण ठेऊन कर्ज घेतले पुन्हा P.M.R.D. A. ची परवानगी मिळविली 50 लक्ष रुपयाची इमारत तयार झाली त्यात हवेशीर वर्ग .रासायनिक प्रयोग शाळा .ग्रँथालय यासाठी हॉल व मोठे क्रीडांगण त्यात कराटें  .व खेळाचे  सराव घेतले  जातात
आपला आर्थिक फायदा न पाहता ग्रामीण मुलांसाठी शासनाच्या निकषाप्रमाणे फी घेऊन उच्च दर्जाचे शिक्षण दिले जाते दहा वर्षात 500 च्या वर पट आहे संगीता याना सदर कामात संचालक  आदीती खोजे .संतोष बंगाळ.मंदाकिनी  बंगाळ.महेश शेवाळे.प्रवीण रहाटाडे .साहेबराव भेगडे .आनंद घोगरे हे सहकार्य करतात
कुठलाही व्यवसाय करताना उत्पादन खर्च व विक्री यावर नफा हे तत्व आहे या प्रमाणे शाळेत शिकविणारे शिक्षक हे विद्यार्थी घडवितात त्यांच्या मेहनतीने चांगले नागरीक  घडतात .शिक्षकेतर कर्मचारी ही चांगले काम करतात
संगीता खोजे याना पुढील कार्याबद्दल   विचारले आसता उच्च माद्यमीक वर्ग सुरू करण्याचे  मनोगत व्यक्त केले एक असहाय महिला जीवनातील दुख बाजूला ठेऊन सामाजिक व वैयक्तिक जीवन समर्थ  पेलू शकते फक्त जिद्द व चिकाटी  मेहनत प्रबळ इच्छा शक्तिची ज़रूरत आहे..
                                                                                                               लेखन-साहेबराव भेगडे 

Post a Comment

 
Top