Add

Add

0

अपसाऊथचे सातवे जलद गती सेवा रेस्टॉरंट आता पुण्यातील चांदणी चौक भागात
अहमदाबाद शहरापासून सुरु करून गुजराथ बाजारपेठेत प्रवेश करण्याची योजना


पुणे(प्रतिनिधी):- शहरातील प्रसिद्ध क़्युएसआर (जलद गती सेवा रेस्टॉरंट)साखळीतील अपसाऊथने आता अलिकडेच पुण्यातील चांदणी चौक भागात आपली सातवी शाखा सुरु करत असल्याचे जाहीर केले आहेदक्षिण भारतीय पदार्थांमधील सर्वोत्तम पदार्थ या शाखेत मिळणार असून दक्षिण भारतीय बर्गर- उथली, मलबारी परोठा सँडविच, साबुदाणा चीज वडा, एलानीर मुज, मँगो मोक्ष आणि पौष्टिक धान्य पराठा इत्यादी पदार्थही इतर दक्षिण भारतीय पदार्थांसह येथे मिळणार आहेत. वेगवान सेवा आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थ यामुळे विद्यार्थ्यांना पटकन खायचे पदार्थ मिळण्याची सोय असलेले, कुटुंबाला निवांतपणे बसून खाता येणारे आणि कार्यालयात जायची गडबड असणाऱ्यांच्या दृष्टीने सोयीचे असे रेस्टॉरंट आहे. 
सर्वाना आवडणारे पदार्थ जसे की इडली आणि डोस्याचे विविध प्रकार, मेदू वडा, उत्तप्पा, फिल्टर कॉफी, पद्डू आणि इतर अनेक पदार्थ या शाखेत मिळणार आहेत. हे आकर्षक पदार्थ, माफक किंमत, सुंदर अंतर्गत रचना, अस्सल, स्वादिष्ट पदार्थ आणि स्वच्छ आणि लाईव्ह स्वयंपाकघर असलेल्या वातावरणात वेगवान सेवा ही इथली वैशिष्ट्य आहेत. या सगळ्याच्या किमतीही खूपच माफक आहेत. प्रत्येक व्यक्तीला सरासरी केवळ 80-90रुपये लागतात. सेल्फ सर्व्हिस आणि बसून खाण्यासाठीचे हे रेस्टॉरंट आहे. किफायतशीर किमतीत उच्च दर्जाचे पदार्थ ही इथली खासियत आहे. 
“पुण्यातील खवय्यांचे प्रेम आणि पाठींबा यांच्या आधारावर आम्हांला उभरत्या वातावरणात सोयीचे, परवडणाऱ्या किमतीतील, स्वच्छ आणि उच्च दर्जाचे दक्षिण भारतीय जलद गती सेवा रेस्टॉरंट निर्माण करणे शक्य झालेहे. अंतर्गत गुंतवणूक आणि फ्रांचायझी पर्याय यांच्या माध्यमातून पुणे बाजारपेठेत मोठा ठसा उमटविण्याचा आमचा प्रयत्न आहे. दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ खूप लोकप्रिय आहेत आणि दिवसभराच्या जेवणासाठीही ते योग्य आहेत. त्यामुळे संपूर्ण देशभर यशस्वी जलद गती सेवा रेस्टॉरंट साखळी उभारण्याची मोठी संधी अपसाऊथला आहे,” असे बिलियन स्माईल्स हॉस्पिटॅलिटी प्रा.ली.चे उपाध्यक्ष कुमार गौरव म्हणाले.
 आधुनिक जलद सेवा पद्धतीने भारतीय आणि दक्षिण भारतीय शाकाहारी खाद्यपदार्थ सादर करण्यासाठी अपसाऊथ बांधील आहे. सर्वोत्तम स्वच्छ आणि निरोगी वातावरणात कमीत कमी किमतीत दोन्ही प्रकारांतील उच्च दर्जाचे पदार्थ अपसाऊथ सादर करत आहे. मोठमोठ्याआंतरराष्ट्रीय साखळी हॉटेल उद्योगांमध्ये औद्योगिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया केलेले अन्न वापरतात. पण तसे न करता अपसाऊथ मध्ये ताज्या घटकपदार्थांपासून खाद्यपदार्थ बनविले जातात. 
कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह शेफ मनू आर नायर म्हणाले की, “आधुनिक जगाशी सुसंगती राखताना अपसाऊथने भारतीय आणि दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांच्या अनुभवाची पुनर्व्याख्या करत समकालीनता जपली आहे. आम्ही आधुनिक रुपात सकस, ताजे, पौष्टिक आणि संपूर्ण भारतीय आणि दक्षिण भारतीय शाकाहारी पदार्थ सादर करत आहोत.” 
या स्थळांव्यतिरिक्त वर्ष अखेरीपर्यंत शहरात आणखी काही आउटलेट सुरु करण्याचा ब्रँडचा विचार आहे. लवकरच अहमदाबाद शहरापासून सुरु करून गुजराथ बाजारपेठेत प्रवेश करण्याची ब्रँडची योजना आहे. 
पत्ता: अपसाऊथ, चांदणी चौक, बावधन पुणे -411021 
अधिक माहितीसाठी संपर्क:-
कुमार गौरव- +91 9986507810  किंवा अंजथ गोवडा +91 903500280

Post a Comment

 
Top