Add

Add

0

                   पिरंगुटमध्ये सरपंच पदासाठी तिरंगी लढत..

पुणे (प्रतिनिधी ):- मुळशी तालुक्‍याची औद्योगिक राजधानी असलेल्या पिरंगुट ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत गतवेळी वापरण्यात आलेला बिनविरोध निवडीचा पॅटर्न या वेळी चालला नाही.येथे सरपंच पदा साठी दोन माजी उपसरपंच व एक माजी तंटामुक्ती अध्यक्ष या तीन उमेदवारांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.तर सदस्यांच्या तेरा जागा बिनविरोध झाल्या असून इतर चार जागांसाठी तेरा जण नशीब आजमावीत आहेत.
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत पिरंगुटने 55 ज
णांना विभागून गावकारभारी करीत बिनविरोधाचा नवा पॅटर्न तयार केला होता. त्याचे अनुकरण काही दिवसांपूर्वी भूगाव ग्रामपंचायतीने केले. उमेदवारी अर्ज भरलेल्या सर्व 44 इच्छुकांना संधी देऊन भूगावने ग्रामपंचायत बिनविरोध केली. पिरंगुट ग्रामपंचायतीसाठी सर्वसाधारण वर्गासाठी खुले असलेल्या सरपंचाच्या एका जागेसाठी तब्बल 37 आणि सदस्यांच्या 17 जागेसाठी 124 उमेदवारी अर्ज आले होते. तथापि मागील पंचवार्षिकमधील कटू अनुभव लक्षात घेऊन संपूर्ण ग्रामपंचायत बिनविरोध होण्यासाठी अपेक्षित गावबैठक झाली नाही.
प्रभागानुसार नात्यागोत्याचे, मैत्रीपूर्ण समझोत्याचे राजकारण झाले. त्यामुळे सदस्यपदासाठी इच्छुकांनी कार्यकाळ वाटून घेतला. तशी लिखापढी केली. त्यानंतर तेरा जागा बिनविरोध झाल्या. त्यात तेजस्वी उभे, सुवर्णा नवाळे, रेश्‍मा पवळे, सुरेखा पवळे, अश्‍विनी निकटे, छाया पवळे, श्रीकांत केदारी, सारिका केदारी, प्रवीण कुंभार,राहुल पवळे, जनाबाई गोळे, अंकुश खडके, सारिका गोळे यांना बिनविरोध काम करण्याची संधी मिळाली. तर माघारीच्या शेवटच्या दिवसाच्या नाट्यमय घडामोडींनंतर सरपंचपदासाठी 34 जणांनी माघार घेतली. त्यामुळे आता चांगदेव पवळे, राजा वाघ आणि चांगदेव निकटे हे तीन उमेदवार सरपंचपदाच्या आखाड्यात उतरले आहेत. 
तर प्रभाग एकमध्ये एका जागेसाठी विकास बाळू पवळे, राहुल मते, जितेंद्र पवळे, रवींद्र गोळे, विकास रामदास पवळे हे पाचजण रिंगणात आहेत. प्रभाग दोनमध्ये महेश वाघ, घनश्‍याम पवळे, सागर पवळे आणि तानाजी निकटे यांच्यात एका जागेसाठी लढत होणार आहे. प्रभाग तीनमध्ये लक्ष्मण निकटे आणि शिवाजी निकटे आणि प्रभाग सहामध्ये रामदास गोळे आणि सुयोग गोळे यांच्यात सरळ लढत होणार आहे.

Post a Comment

 
Top