Add

Add

0
              नि:स्वार्थी, निरपेक्ष लोकनेता....शरद ढमाले

मुळशी तालुक्याचे माजी आमदार श्री. शरद बाजीराव ढमाले यांचा जन्म 5 मार्च 1965 रोजी मुळशी तालुक्यातील धरणाच्या दुर्गम खोऱ्यात रायगड जिल्ह्याच्या हद्दीलगत असलेल्या "भोरकस "येथे झाला.त्यांचे शिक्षण प्राथमिक शिक्षण हे भोरकस येथील प्राथमिक शाळेत, माध्यमिक शिक्षण शेरे येथील मामासाहेब मोहोळ विद्यालय व रयत शिक्षण संस्थेच्या भुईंज(ता.वाई) येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय भुईंज, तर महाविद्यालयिन शिक्षण न्यू इंग्लिश स्कुल, टिळक रोड, व आर .सी.एम.गुजराथी हायस्कुल पुणे या ठिकाणी झाले.
शिक्षण झाल्यानंतर त्यांनी आपल्या भोरकस या गावी किराणा मालाच्या दुकानातील काम पाहू लागले. त्यांचे आजोबा स्वर्गीय बाबुराव भाऊराव  ढमाले हे 1960 च्या अगोदर महात्मा गांधी, विनोबा भावे यांच्या सर्वोदय संस्थेत पोस्टमन म्हणून काम करीत होते. त्यावेळी राज्यांची स्थापना झाली नव्हती. परिणामी पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात नव्हती. शिक्षण, आरोग्य, पोष्ट, बांधकाम, अशा सुविधा ही सर्वोदय संस्था पुरवत असे. या संस्थेचे मुळशी धरण खोऱ्यातील ते शिक्षण झालेली व्यक्ती होती. परिणामी सर्वोदय संस्थेच्या सर्व कामे पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांची होती.तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री सी.डी.देशमुख, तत्कालीन पुणे परिसराच्या खासदार इंदिरा मायदेव होत्या. त्यांच्याशी बाजीराव ढमाले यांचा दांडगा संपर्क होता. सी डी देशमुख हे देखील या परिसरात येऊन गेले होते.त्या नंतर ते वांद्रे-पिंपरी ग्रुप ग्रामपंचायतीचे 1958 मध्ये  सरपंच होते.
तर,बंधू विजय ढमाले यांनी सुद्धा भोरकस ग्रामपंचायतीची  सरपंच म्हणून धुरा 1984च्या सुमारास सांभाळली आहे. जे काम हाती घेईल त्या कामाला पूर्ण न्याय द्यायचा असे  त्यांचे  धोरण होते. याच दरम्यान, विधानसभा निवडणूक  झाली होती.तत्कालीन काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री.अशोक अण्णा मोहोळ यांना भोरकस यागावातून त्यांनी 289 पैकी 284 मते मिळवूनदिली होती.महाराष्ट्र शासनाच्या  दूध महापूर योजने अंतर्गतदूध संकलन वाढविण्यासाठी तत्कालीन मंत्री श्री.अनंतराव थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली मेळावा आयोजित केला होता.तालुक्यातील प्रमुख राजकीय व्यक्तीबरोबर श्री शरद ढमाले हेहि त्या मेळाव्यास उपस्थित राहून शेतकरी बांधवाना ज्याअडचणी आहेत त्याची मांडणी करून त्यावर उपायकाढण्याचे मंत्री महोदयांना विनंती केली.  
आपला बाल वर्ग मित्र श्री.दत्तात्रय सुर्वे यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी 1985 मध्ये शिवसेनेतर्फे साजरा केला जात  असलेला दसरा मेळाव्यामध्ये हिंदू हृदय सम्राट  माननीयबाळासाहेब ठाकरे यांचे विचार जाण्यासाठी ठरविले. दसऱ्याच्या आदल्या दिवशी रात्री ते व श्री पत्रकार श्री दत्तात्रयसुर्वे हे मुंबईला दसरा मेळाव्यासाठी जाण्यासाठी निघालेत्यावेळी एसटीचे पुणे ते दादर पर्यंत तिकीट होते 5 रुपये 25 पैसे.पहाटे दादर ला पोहचल्यानंतर सुलभसौचालायामध्येआंघोळ करून ते आपले मित्र श्री.सुर्वे यांच्या घरी वरळीला गेले. व परत वरळी वरून  दसरा मेळाव्यासाठी जाण्यासाठी 169 नंबर च्या सायन- वरळी कोळीवाडा बसने दादरला पोहचले. यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविचाराने प्रभावित होऊन त्यांनी शिवसेना या पक्षाचे कामकरण्याचे ठरविले. 4सप्टेंबर 1989 रोजी शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांची लोणावळा येथे जाहिर सभा होती. यासभेसाठी त्यांना जायचे होते. यावेळी ते वाघवाडी  वरून मुळशी पर्यंत 2.5 किलोमीटर ची नदी पोहत येऊन ते मुळशीयेथे आले तेथुंन ते पुण्याला आले व त्या वेळेचे मुळशी तालुक्याचे संपर्कप्रमुख स्काँड्रन लीडर अरविंद जमदाडे यांच्या जीप गाडीतून ते लोणावळा येथे सभेसाठी गेले.
शिवसेनेचे काम करीत असताना त्यांनी अनेकांना पक्षातील वेगवेगळी पदे उपभोगण्याची संधी प्राप्त करून  दिली.यामध्ये विभागप्रमुख,शाखाप्रमुख,एखाद्या गावचे सरपंचपद अशी अनेक पदे त्यांनी आपल्या कार्यक र्त्यांना मिळवून दिली.          
 1997मध्ये त्यांनी पहिल्यांदा शिवसेनेच्या तिकिटावरपंचायत समितीची माले तालुका मुळशी या मतदार संघातूननिवडणूक जिंकली ते हि 1600 मतांनी. संपूर्ण पंचायतसमितीमध्ये ते शिवसेनेचे एकमेव सदस्य निवडून आले होते. यावेळी त्यांच्या कामाची पद्दत पाहून तुम्ही  काँग्रेस पक्षात या तुम्हाला आम्ही सभापती पद देतो अशी ऑफर दिली होतीपरंतु त्यांनी ती नम्रपणे नाकारली.पुढे 2002 मध्ये त्यांनाशिवसेनेचे तालुका प्रमुख केले. त्यांच्या या कालावधी मध्येपंचायत समिती मुळशी ची निवडणूकीमध्ये शिवसेनेचे ४सदस्य त्यांनी निवडून आणून पंचायत समिती मुळशी वरपहिल्यांदा शिवसेनेची सत्ता आणली.या कालावधीमध्ये त्यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून विविध विकासकामे करून घेतली. 
त्यांनी आजवर केलेल्या विविध विकासकामे वसंघटनकौशल्य च्या जोरावर 2004च्या विधानसभा निवड णुकीसाठी  त्यांना मुळशी मतदार संघाची शिवसेनेकडूनउमेदवारी मिळाली. मुळशी तालुक्यातील विविध वाड्यावस्त्या,गावे तसेच पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेलालागून असलेल्या मतदार संघात मतदारांपर्यंत जाऊन विविधअडचणीची माहिती घेऊन ते सोडवण्यासाठी आपण मलानिवडून द्यावे अशी विनंती केली  व त्यांना या मतदार संघातीलमतदारांनी १८००० मतांनी निवडून दिले. कोथरूड व वारजेमाळवाडी येथील भागातील मतदारांना पाण्यासाठी तीव्र संघर्षकरावा लागत होता तो त्यांनी कायमस्वरूपी सोडिवला.  मामासाहेब मोहोळ आमदार असताना त्यांनी मुळशी धरण तेपिरंगुट या अंतर्गत २५ ग्रामपंचायतीसाठी १९६७ साली पाणीयोजना आणली होती परिणामी ती फार जुनी झाली होतीत्यामुळे त्याचे पुनर्जन्म करून २२ कोटी खर्च करून ती पाणीयोजना अद्यावत केली.       
आमदार असताना पहिल्या वर्षी अर्थसंकल्पावर बोलताना त्यांनी आदिवासी कातकरी भाषेत भाषण केले. तर ऐकून तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, सभापती बाबासाहेब कुपेकर यांच्यासह सर्व अधीकारी सचिव सर्वजण आवाक झाले हे कोणत्या भाषेत बोलतात. कारण ते देशमुख असताना त्यांनी कातकरी भाषेत कसे केले. यामुळे, कातकरी समजला आदिवासीचे दाखले मिळाले यासाठी ते सभागृहात भांडले आणि त्यांना जातीचे दळलं मिळवून दिले. निरपेक्ष वृत्ती त्यांची अनेक वेळा दिसून आली.पूर्वी पासून त्यांचे अनेक कातकरी मित्र आहेत.त्यांच्याबरोबर अनेक कामे केली आहेत. तर आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पहिला पेढा आई... दुसरा कातकरी महिला माथाबाई याना  भरवून आपला आनंद साजरा केला. पंचायत समितीच्या असताना रीतसर शेती व्यवसाय केला, तर आमदार असताना अनेकवेळा एसटी ने प्रवास केला.
त्यांच्या या आमदारकीच्या कालावधीमध्ये तहसीलदार कचेरीचे नूतनीकरण,पंचायत समितीचे कार्यालय ,ग्रामीण रुगणालयाची नवीन इमारत,भरे येथील तालुका क्रीडा संकुलव औधोगिक प्रशिक्षण केंद्र,भरे- घोटावडे नदी वरील पूल,विविध गावातील रस्ते,समाज मंदिरे, व्यायामशाळा, पाणीपुरवठा योजना आदी कामे मार्गी लावली.13 जुलै ते 16 जुलै 2007या कालावधीत त्यांनी मुळशी ते वाघवाडी दरम्याननदीवर पूल व्हावा म्हणून 3 दिवस जलसमाधी आंदोलनकेले.या कामासाठी एकूण रकमेच्या 10 %  रक्कम टाटापॉवर हि कंपनी देणार होती .परिणामी जलसमाधीआंदोलनाची सरकार दरबारी दखल घावी लागली आणित्यावेळी तत्कालीन मुखमंत्री विलासराव देशमुख यांनी त्यांनाते मंजूर करून देतो आसे आश्वासन दिले. त्यावेळी त्यांनी ते आंदोलन माघे घेतले.
या धाडसी आंदोलनाचे कौतुक करताना तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आमदार (सध्याचे अर्थमंत्री) सुधीर मुनगंटीवार यांना सांगितले की, अशी आंदोलन पाहिजे.  परिणामी आजपर्यंत याठिकाणी पूल होण्यासाठी  संघर्ष चालू आहे. सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शरदराव 2004 साली प्रथम एकाच वेळी सभागृहात गेले होते. यावेळी देवेंद्र हे पूर्वी पासून फिटनेस मध्ये कायम सतर्क राहत असे. अधिवेशन काळात फडणीस व ते नरिमन पॉइंटला व्यायामासाठी जात असे.शिवसेनेकडून 2009ची निवडणूक भोर विधानसभेतून तर 2014मध्ये भाजपकडून त्यांनी निवडणूक लढविली.
टाटा पॉवर कंपनीच्या सहकार्याने मुळशी तालुका धरण विभाग शिक्षण मंडळ माले या खाजगी औदोयोगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत येथे मुलांना २५ % रक्कम भरून शिक्षण घेता येते राहिलेली 75 % रक्कम टाटा पॉवर कंपनी देते. त्यामुळे धरणग्रस्थ विध्यार्थ्यांना त्याचा मोठा लाभ त्यांनी करून दिला.2011पासून चालू झाले ल्या या संस्थेमध्ये आज विविध कोर्से चे प्रशिक्षण दिले जाते. वांद्रे परिसरात त्यांनी लुपिन औषध कंपनीच्या माध्यमातून शेतकरी  यांच्यासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. त्यांचा स्वभाव पूर्वी पासून निस्वार्थी, निरपेक्ष, सर्वांना सन्मान मोठ्यानं नेहमीच आदर करणे, सामान्य माणसाच्या जीवन जगतात. पैसे, संपत्ती हा त्यांच्यासाठी गौण आहे. पहिली माणुसकीला प्राधान्य त्यांनी दिले. पैसे संपत्ती मिळविण्यासाठी कधी कोणाला दमबाजी किंवा केलेली मी पाहिले नाही. कोणा गरिबांची जमीन बळकविण्याचा प्रयत्न देखील कधी केला नाही. असा राजकीय व्यक्ती असला तरी ते सर्व सामान्य माणसाच्या सारखे जीवन जगतात.

 सौजन्य :- वरद मीडिया - (टीव्ही चॅनेलच्या जाहिरातीसाठी पुण्यातील विश्वसनीय ठिकाण -) 
शिवसागर सोसायटी, मोदींबाग ,शिवाजीनगर,पुणे : मोबाईल - 988198383  

Post a Comment

 
Top