Add

Add

0
भारतीय संस्कृतीची स्पंदने जगभर पसरतील
डॉ.विश्‍वनाथ कराड यांचे प्रतिपादन;समाधीतील स्पंदने याग्रंथाचेप्रकाशन 

पुणे (प्रतिनिधी ):-"ज्ञान, कर्म आणि भक्ती यांच्या समन्वयातून समाधीची स्पंदने या ग्रंथाची डॉ. रामचंद्र मोरवंचीकर यांनी निर्मिती केली आहे. या ग्रंथाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे स्पंदने संपूर्ण जगभर पसरली जातील. असे प्रतिपादन विश्‍व शांती केंद्र (आ़ऴंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांनी केले.
डॉ. रामंचद्र श्री.मोरवंचीकर यांनी लिहिलेल्या समाधीतील स्पंदने या ग्रंथाचे प्रकाशन शांतिब्रह्म ह.भ.प.श्री. मारूती महाराज कुर्‍हेकर व प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांच्या हस्ते विश्‍वरूप दर्शन मंच, श्री क्षेत्र आळंदी येथे करण्यात आले. या सोहऴ्याप्रसंगी ते बोलत होते. हा ग्रंथ तत्त्वज्ञसंत शिरोमणी ज्ञानेश्‍वर माऊलींच्या चरणी अर्पण करण्यात आला.
या प्रसंगी जलतज्ञ शरद द. मांडे, डॉ. विकास मोरवंचीकर, प्रकाशक शशिकांत पिंपळापुरे, सौ. उषा विश्‍वनाथ कराड, माईर्स एमआयटीच्या कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा कराड-नागरे, कार्यकारी संचालिका प्रा.स्वाती कराड-चाटे, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण, माजी कुलगुरू डॉ.सुभाष आवळे, साहित्यिक प्रा.रतनलाल सोनाग्रा, मिटसॉटचे प्रकल्प संचालक डॉ. मिलिंद पांडे, पप्पूशेठ तापकीर, बबनराव कुर्‍हाडे पाटील व सुरेश वडगावकर  उपस्थित होते.
डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले, ग्रंथ निर्मितीसाठी लेखकाने जीवनभराची साधना पणाला लावली आहे. वारकरी सांप्रदायाचा राम कृष्ण हरीचा संदेश जगभर पसरविण्यासाठी या ग्रंथाचा उपयोग होणार आहे. वारकरी सांप्रदायाने जगाला विश्‍व शांती व मानवतेचा संदेश नेहमीच दिला आहे. समाधी म्हणजे नेमके काय असते. समाधी घ्यावयाची म्हणजे नेमके काय घ्यावयाचे असते आणि त्याही पुढे जाऊन संजीवन समाधी म्हणजे काय. कोणत्या समाधीला संजीवन म्हटले जाते या बद्दलच्या सर्व प्रश्‍नांवर लेखकानी प्रकाश टाकला आहे. आपल्या विवेचनातून त्यांनी पसायदनातील संजीवक तत्त्वाचे सुरेख विश्‍लेषण केले आहे.
डॉ. विकास मोरवंचीकर म्हणाले, आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती हा कोणत्या न कोणत्या गोष्टीसाठी धावतांना दिसत आहे. तो कुठेच थांबत नाही, अशा वेळेस जे अध्यात्माचा अनुभव घेतील त्यांच्या जीवनातील ताण-तनाव पूर्णपणे कमी होईल. त्यासाठी भक्तीमार्ग हा प्रमुख साधन आहे. आळंदी या तीर्थ क्षेत्रातील इंद्रायणी नदी व सुंदर अध्यात्मिक वातावरण हे तर सृष्टीवरील खरे नंदनवन आहे. जीवनात प्रत्येक व्यक्ती हा कोणला तरी आदर्श ठेऊन आपल्या जीवनाची वाटचाल करीत असतो. त्यामुळे आपण सुद्धा माऊलीकडे पाहून जीवनाची वाटचाल करावी. 
शरद मांडे म्हणाले, डॉ. मोरवंचीकर लिखित समाधीतील स्पंदने हे साहित्य नाही तर एक अध्यात्मिक अनुभव आहे. या ग्रंथात आदिनाथ ते निवृत्तीनाथापर्यंतच्या प्रवासाचे वर्णन केले आहे. तसेच संत ज्ञानेश्‍वर महाराजांनी समाधीपर्यंत कसा प्रवास केला याची विस्तृत माहिती यात नमूद केली आहे. 
डॉ. एस.एम.पठाण म्हणाले, समाधीतील अवस्था काय असते आणि संत ज्ञानेश्‍वरा महाराज यांना अगदी जवळून समजून घेण्यासाठी हा ग्रंथ महत्वाचा आहे.
डॉ. रतनलाल सोनाग्रा म्हणाले, समाधी स्पंदनेचा अनुभव खूपच कमी लोकांना येतो. ज्यांना याचा अनुभव येतो त्यांची मानवी प्रवृत्ती ही विलिन झालेली असते. तसेच त्यांची मनस्थिती ही संतांच्या भावनेशी एकरूप झालेली असते. या ग्रंथात सामधीतील स्पंदने हे परम मांगल्याची कल्पना आहे.
शालिग्राम खंदारे महाराज यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. 

Post a Comment

 
Top