Add

Add

0

          “पिरंगुट’ ग्रामपंचायती मध्ये बिनविरोधची हॅट्‌ट्रीक होणार?

पिरंगुट (प्रतिनिधी):-येथील ग्रामपंचायतीसाठी 24 मार्चला मतदान होणार आहे. मागील दोन पंचावार्षिक निवडणुका ग्रामस्थांनी एकत्र येऊन बिनाविरोध केल्या होत्या. त्यामुळे यावर्षीही निवडणूक बिनविरोध करून बिनविरोध निवडणुकीचा “पिरंगुट पॅटर्न’ यावर्षीही ग्रामस्थ कायम राखणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
मुळशी तालुक्‍याची औद्योगिक राजधानी अशी पिरंगुटची ओळख आहे. मोठ्या प्रमाणावर गावाचा विकास झाला आहे. कामधंद्यामुळे अनेक नागरिक याठिकाणी स्थायिक झाले आहेत. त्यामुळे गावची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. गावची एकूण लोकसंख्या जवळपास 20 हजाराच्या दरम्यान आहे. एकूण मतदार संख्या 9 हजार 128 आहे. कायदा सुव्यवस्था व शांतता राखण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येऊन एका जागेवर अनेकांना संधी देण्यात आली होती. त्यामुळे हा पॅटर्न तालुकाभर गाजला. अनेक ग्रामपंचायतीने त्याचा अवलंब केला. ग्रामपंचायतीसाठी एकूण सहा वॉर्ड आहेत. तर एकूण सदस्य संख्या 17 आहे. यंदा सरपंच हा थेट जनतेतून निवडून द्यायचा आहे. सरपंचपद सर्वसाधारणसाठी आहे. त्यामुळे अधिकच चुरस निर्माण झाली आहे. विद्यमान सदस्यांबरोबरच अनेकजण इच्छुक आहेत. त्यामुळे निवडणूक रंगतदार होणार आहे. स्थानिकांबरोबरच भाडेकरू मतदारही अधिक आहेत.


Post a Comment

 
Top