Add

Add

0
पुण्यातील प्रमुख मान्यवरांशी बापट यांचा संवाद

कार्यअहवालाची दिली माहिती.... 

पुणे (प्रतिनिधी ):-भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात आणि राज्यात आल्यानंतर देशाचा आणि राज्याचा आमूलाग्र विकास होत आहे. राज्याचा मंत्री तसेच पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून राज्यात आणि पुणे जिल्ह्यात विकासाच्या दृष्टीने सकारात्मक बदल घडवण्याचा या साडेचार वर्षात प्रामाणिक प्रयत्न पालकमंत्री गिरीश बापट यांनी केला. ही कारकीर्द 'बदलता महाराष्ट्र आणि बदलते पुणे' या पुस्तकात शब्दबद्ध करण्यात आली आहे. या पुस्तकाचे संपादन माजी पत्रकार व कंटेन्ट कन्सेप्ट कम्युनिकेशन चे संचालक सुनील माने यांनी केले आहे.या प्रवासात पुण्यातील विविध क्षेत्रातील अनेक लोकांचे मार्गदर्शन लाभले. 
या सर्वांना भेटून त्यांना कार्यअहवाल द्यावा यासाठी एका स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. सर्वांच्या मार्गदर्शनामुळे मला माझ्या पुढील सामाजिक आणि राजकीय आयुष्यात आणखी स्फूर्ती मिळेल.अशी भावना  बापट यांनी व्यक्त केली.
यावेळी स्नेहमेळाव्याला सायरस पुणावाला,शा.ब मुजुमदार सर, बाबा कल्याणी, अरुण फिरोदिया, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमाळकर, परवेझ ग्रँड, प्रकाश धारीवाल,अतुल चोराडीया, विशाल चोराडीया,अनिरुद्ध देशपांडे, जहांगीर हॉस्पिटलचे डॉ फडके,जेकब थॉमस, कृष्णकुमार गोयल, बारी मलहोत्रा, वासुदेवन, मोहिनीश अरोरा, मनप्रीत उप्पल, जेकब थॉमस, एस के जैन, श्रीकांत अगस्ते, फिरोदिया, विद्या येरवडेकर, अनिरुद्ध देशपांडे, राजकुमार चोराडीया, डॉ रणजित जगताप, सुधीर साबळे, महेंद्र पितलिया, पोपट ओत्सवाल, फत्तेचंद रांका, गणेश शेट्टी, बाळासाहेब गांजवे,चंद्रकांत कुडाळ, सारन काळे,जया किराड, सूर्यकांत पाठक, अशोक धिवरे, रवींद्र वांजरवाडकर, महेश करपे,सतीश पवार, अतुल गोयलश्रीकांत परांजपे, युवराज ढमाले,सुहास मंत्री कमलेश झाला,मदन मेंगाळे,यांच्या सह माध्यमक्षेत्रातील मान्यवर, पराग करंदीकर, नंदकुमार सुतार,अभय वैद्य, हरीश केंची, विठ्ठल जाधव, अरुण निगवेकर आदि मान्यवर देखील यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

 
Top