Add

Add

0
 प्रधानमंञी किसान सन्मान योजना यशस्वीपणे राबविणार ..                                                                                            तहसीलदार चव्हाण 
पौड (प्रतिनिधी):-मुळशी तालुक्यातील महसूल विभागातील भ्रष्टाचाराबाबत दक्षता घेणार असून तालुक्यातील महसूल विषयक गेल्या दोन महिन्यात रेंगाळलेली कामे मार्गी लावणार आहे.याशिवाय प्रधानमंञी किसान सन्मान योजना यशस्वीपणे राबविणार असल्याची माहिती मुळशीचे नवनियुक्त तहसिलदार अभय चव्हाण यांनी दिली.
    गेले दोन महिने रिक्त राहिलेल्या मुळशी तहसिलदार पदाचा कार्यभार अभय चव्हाण यांनी गुरूवारी दुपारी स्वीकारला.त्यानंतर पञकारांशी बोलताना मुळशी तालुक्यातील कारभाराबाबतचव्हाण यांनी हि माहिती दिली आहे.अभय चव्हाण हे 2007 च्या राज्य लोकसेवा आयोग परीक्षेतून नायब तहसिलदारपदी नियुक्त झाले होते.2015 साली ते तहसिलदार पदावर औरंगाबाद येथे रूजू झाले.त्यानंतर त्यांनी बीड, जालना या ठिकाणी तहसिलदार म्हणून काम पाहिले आहे. त्यांचे मूळगांव सोलापूर जिल्ह्यातील उमरगा हे शहर आहे. मुळशीच्या तहसिलदारपदी नियुक्ती होण्यापूर्वी ते कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात धान्य खरेदी अधिकारीपदी कार्यरत होते. 
       मुळशी तालुक्यात यापूर्वीचे तहसिलदार सचिन डोंगरे यांना जमिन व्यवहाराच्या नोंदीवरून एक कोटीची लाच घेतल्याच्या प्रकरणावरून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दोन महिन्यापूर्वी अटक केली होती.या पार्श्वभूमीवर तालुक्यातील महसूल विषयक तक्रारी व कारभार चव्हाट्यावर आला होता.त्यामुळे नवनियुक्त तहसिलदार अभय चव्हाण यांच्या कामकाजाकडे मुळशी तालुका आशादायी दृष्टिकोनातून पाहात आहे.

Post a Comment

 
Top