Add

Add

0
शासनाच्या आरोग्यविषयक लाभाच्यायोजना सर्वसामान्यांपर्यत पोहोचाव्यात
                                                                                                       - आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे
पुणे(प्रतिनिधी):-केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत तसेच राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभाग व आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. या संकल्पनेतर्गत पुण्यातील सूर्यसहयाद्री हॉस्पिटलचा  केंद्रीय आरोग्य तथा कुटूंब कल्याण मंत्री जयप्रकाश नड्डडा यांच्या हस्ते ‍ डिजीटल पध्दतीने लोकार्पण कार्यक्रम पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. सूर्यसहयाद्री हॉस्पिटल हे देशातील या योजनेंतर्गत शंभर टक्के समर्पित  पहिले हॉस्पिटल ठरले आहे.या योजनेंतर्गत लाभार्थ्याना रुपये पाच लाखापर्यंतचे विनामूल्य औषधोपचार मिळणार आहेत.
यावेळी बोलताना श्री. शिंदे म्हणाले की, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत व महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना या दोन्ही योजना सर्वसामान्यांना जीवनदान देणा-या व नवसंजीवनी देणा-या योजना ठरणार आहेत. आतापर्यत बरेच रुग्ण हे त्यांना आर्थिकदृष्टया परवडत नाहीत म्हणून उपचारांपासून वंचित राहीले होते अशा वेळी त्यांना या योजनांमुळे चांगल्या प्रकारचे उपचार घेणे शक्य होत आहे. या योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याकरीता सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच सूर्य सहयाद्री हॉस्पिटलच्या व्यवस्थान करीत असलेल्या या प्रयत्नांबद्दल त्यांनी गौरवोद्वार काढले. व याचा आदर्श  इतरांनीही घ्यावा, असे सांगून शासनाच्या आरोग्य विभाग आणि राज्य सरकारच्या वतीने त्यांचे आभार मानले.
तत्पूर्वी  केंद्रीय आरोग्य तथा कुटूंब कल्याण मंत्री जयप्रकाश नड्डडा यांच्या हस्ते ‍ डिजीटल पध्दतीने  सूर्यसहयाद्री हॉस्पिटलचा डिजीटल पध्दतीने  लोकार्पण कार्यक्रम पार पडला.यावेळी  व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधताना श्री.नड्डा यांनी ही योजना संपूर्णपणे गरिबांना समर्पित आहे  आणिअत्यंत कमी वेळात या योजनेला प्रतिसाद दिल्याबद्दल या हॉस्पिटलच्या व्यवस्थानचे अभिनंदन करताना या हॉस्पिटलचे अनुकरण इतरांनीही करावे असे आवाहन केले.
या कार्यक्रमावेळी सुर्य सहयाद्री हॉस्पिटलचे चेअरमन डॉ.चारुदत्त आपटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना  सरकारबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये भागीदारी करत नाही तोपर्यंत आपण सुजाण नागरिक म्हणून ओळखले जाणार नाही असे सांगितले. यावेळी या योजनेचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त  केले. या कार्यक्रमास सूर्य सहयाद्री हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ.जयसिंग शिंदे, संचालक डॉ.जयश्री आपटे, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुधाकर शिंदे, नॅशनल इन्शुरन्सचे  श्री.अय्यर व  रोटरीचे रवी धोत्रे इ. मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचीन कुलकर्णी यांनी केले.
00000

Post a Comment

 
Top