Add

Add

0
                     रेलफोर फौडेशनकडून आदिवासींना मोफत घरे
             कातकऱ्यांसाठीचा मुळशी तालुक्यातील पहिला आदर्श गृहनिर्माण प्रकल्प आंदेशे येथे साकार
पौड(प्रतिनिधी):-स्वतःच्या जागेचा अभाव,शेतावर मोलमजुरीसाठी सातत्याने होणारे स्थलांतर आणि आधुनिक व्यवस्थेमुळे आदिवासी हा भूमिहीन होऊन त्याला स्वतःचे घर नाही अशी परिस्थिती मुळशी तालुक्यातील आदिवासी समाजाची आहे. भुगाव पासून ताम्हिणी पर्यंत तर हिंजवडी पासून लवासा पर्यंत हा समाज गावकुसाबाहेर दुसऱ्याच्या अथवा शासकीय जागेवर गवतापासून बनवलेल्या झोपडी मध्ये राहतो. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असणाऱ्या या समाजात शिक्षणाचा अभाव,प्रचंड कुपोषण,दारिद्र्य आहे. हिंजवडी सारख्या आय.टी हब पासून अवघ्या१२ किमी अंतरावर दारिद्र्याच्या अंधारात चाचपडत असणाऱ्या समाजाला हात दिला आहे एका मोठ्या हृदयाच्या व्यक्तीने,आणि त्या व्यक्तीचे नाव आहे दीपक नथानी. दीपक नाथनीच्या मातोश्री पुष्पा नथानी यांनी वर्षभरापूर्वी एका भेटीच्या दरम्यान या लोकांची अवस्था पाहिल्यानंतर या लोकांसाठी घरे बांधून देण्याचा संकल्प मुलगा दीपक याला सांगितला. यावर दीपक नथानी यांनी लगेच आपल्या रेलफोर फाउंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे मुळशीत वर्षभरापूर्वी 26 घरे मुळशी तालुक्यातील आंदेशे या ठिकाणी बांधण्यास सुरवात केली. याच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन व हस्तांतरण समारंभ नुकताच पार पाडण्यात पडला. या वेळी दीपक नथानी व त्यांच्या मातोश्री यांच्या हस्ते 9 कुटुंबाना घराचे हस्तांतरण करण्यात आली. 
रेलफोर फाउंडेशन तर्फे येत्या वर्षभरात पुणे जिल्ह्यातील आदिवासींना आणखी 100घरे बांधून देण्याचा संकल्पित प्रकल्प हाती घेण्यात आला असल्याची माहिती या कार्यक्रमाच्या वेळी रेलफोर फाउंडेशनचे व्यवस्थापकीय अधिकारी नितीन घोडके यांनी दिली यावेळी ठेकेदार संतोष कदम ,सचिन आकरे, आदीवासी बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो ओळ-आंदेशे(ता.मुळशी)येथे आदिवासीसाठी मुळशी तालुक्यात उभारण्यात आलेल्या गृहनिर्माण प्रकल्पातील पहिल्या घराचे उदघाटन व हस्तांतरण करताना  रेलफोर फौडेशनचे संचालक दीपक नथानी

Post a Comment

 
Top