Add

Add

0
‘‘उपेक्षित राहिलेल्या लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण : 
अनेक भाषांमध्ये केले गायन :शासन दरबारी आजही उपेक्षाच 
: पद्म पुरस्कार मिळावा अशी चाहत्यांची जोरदार मागणी’’   
मराठीसह हिंदीगुजरातीभोजपुरीतामीळपंजाबी अशा विविध भाषांमध्ये आपल्या जादुई आवाजाचे गारुड करणारी ज्येष्ठ गायिका लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण. त्यांनी वयाच्या 86 वर्षा तील अनेक दशके दशके आपल्या आवाजाने अनेक गीते सर्वांग सुंदर बनविली.मुळच्या कोल्हापूर येथी ल असलेल्या आजच्या त्या ज्येष्ठ गायिका असून आचार्य प्र.के.अत्रे यांनी त्यांना लावणीसम्राज्ञी हा किताब दिला.आणि पुढे तीच त्यांची वेगळी ओळख बनली.देश परदेशात त्यांचे असंख्य चाहते आजही आहेत.त्यांच्या या कारकिर्दीत अनेक सन्मान मिळालेत.मात्र,शासन दरबारी त्याउपेक्षितच राहिल्या.केंद्र शासनाकडून दिला जाणारा "पद्म पुरस्कार"सुलोचना चव्हाण यांना मिळावा,अशी चाहत्यांकडून आता मागणी होतआहे.त्यांनी दि.13मार्च रोजीसुलोचना चव्हाण87व्या वर्षात पदार्पण केले त्यानिमित्ताने...  
पाडाला पिकलाय आंबा, फड सांभाळ तुर्‍याला गं आलातुझ्या उसाला लागंल कोल्हा, कळीदार कपूरी पानकोवळं छानकेशरी चुना रंगला काथ केवडा वर्खाचा विडा घ्या हो मनरमणा, खेळताना रंग बाई होळीचा होळीचाफाटला गं कोना माझ्या चोळीचा, कसं काय पाटील बरं हाय काकाल काय ऐकलं ते खरं हाय का?, स्वर्गाहुन प्रिय आम्हाला आमचा सुंदर भारत देशआम्ही जरी एक जरीही नाना जाती नाना वेष, मी बया पडली भिडंचीगाव हे हाय टग्याचं, पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवाआई मला नेसव शालू नवा, मला म्हणत्यात पुण्याची मैना अशी एकापेक्षा एक असंख्य गीते एकली कि ज्यांच्या आवाजाने ती अधिक सुंदर बनली त्या ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांचे नाव समोर येते.
माहेरच्या सुलोचना कदम असलेल्या सुलोचना माईंचा जन्म 13 मार्च 1933साली झाला असून त्या मुळ कोल्हापूरच्या आहेत.मात्र,मुंबईतील एका चाळीत त्यांचे बालपण गेले.गायनाचे कोणतेही शास्त्रीय शिक्षण न घेता सुलोचना चव्हाण यांनी गायन क्षेत्रात आपला एक वेगळा ठसा उमटविला आहे.सुलोचना चव्हाण यांच्या घरचा एक "श्रीकृष्ण बाळमेळा" होता.त्या मेळ्यात त्यांच्यासोबत अभि नेत्री संध्या यांनीसुद्धा काम केले होते.या बाळमेळ्याच्या माध्यमातून सुलोचना चव्हाण यांनी कला क्षेत्रात पहिले पाऊल टाकले. विशेष म्हणजे या मेळ्यांच्या सोबतच त्यांनी हिंदीगुजराती आणि उर्दू नाटकात बालभूमिका केल्या आहेत.
सुलोचना चव्हाण यांनी उत्तम गावे असे त्यांच्या बहिणीला वाटत होते. त्यासाठी त्या नेहमी प्रोत्साहन देत असत. त्याकाळात ग्रामोफोन रेकॉर्ड ऐकून ऐकूनच त्यांनी गायनाचा रियाज केला. त्यावेळी एकीकडे घरची परिस्थिती आणि दुसरीकडे तारेवरची कसरत करत आपली आवड जोपासत असल्यामुळे त्यावेळच्या परिस्थितीमुळे सुलोचना दीदी उत्तम गायिका बनल्या. सुलोचना माईंनी पहिले चित्रपट गीत गायिले तेही हिंदी चित्रपटासाठी. तो चित्रपट होता कृष्ण सुदामा. आणि त्यावेळी माई होत्या अवघ्या 9 वर्षांच्या. त्यावेळची आठवण माई अजूनही सांगतात. विवाहापूर्वी माईंनी सुमारे 70 हिंदी चित्रपटांमधून पार्श्वगायन केले.त्यावेळी सुलोचना कदम किंवा के.सुलोचना यानावाने ओळ खायचे. 
वयाच्या 16 व्या वर्षी सुलोचना माईंनी गायक मन्ना डे यांच्यासोबत भोजपुरी रामायण गायले. त्यावेळी पार्श्वगायन करताना सी.रामचंद्र, मोहम्मद रफी,मन्ना डे,शमशाद बेगम,गीता दत्त,श्यामसुंदर अशा दिग्गज आणि आघाडीच्या गायकांसोबत त्यांनी अनेक गीते गायली.मराठीतील लावणी या गीत प्रकारापुरते मर्यादित न राहता हिंदी,गुजराती,भोजपुरी,तामिळ,पंजाबी या भाषांमधील भजने आणि गझल त्यांनी गायल्या आहेत.माईंच्या गझला एकूण बेगम अख्तर यांनी दिलखुलास दाद दिली तर आहेच शिवाय कोणत्याही प्रकारचे शास्त्रीय शिक्षण न घेता एवढ्या दमदार गायन करत असल्याचे पाहून त्या आश्चर्यचकितहि झाल्याचे माई सांगतात.
सुलोचना चव्हाण यांनी आचार्य अत्रे यांच्या हीच माझी लक्ष्मी या चित्रपटातील "मुंबईच्या कालेजात गेले पतीआले होऊनशानबीए बीटी..." हि सर्वात प्रथम लावणी गायली. सुलोचना चव्हाण यांनी १९५३-५४ च्या सुमारास "कलगीतुरा" या चित्रपटासाठी राजा बढेयांनी गायलेल्या काही लावण्या गायल्या. त्या चित्रपटाचे दिग्दर्शक होते "एस. चव्हाण". लावणी गायनातला खरा मार्ग, शब्द फेक शामराव चव्हाण यांनी शिकविली. त्यानंतर दि. 12ऑगस्ट 1953साली माईंचा शामराव चव्हाण यांच्या सोबत विवाह झाला. यादरम्यानच "रंगल्या रात्री अशा" या चित्रपटातील गाणी सुलोचना चव्हाण यांनीच गावी असा आग्रह गीतकार जगदीश खेबुडकर यांनीधरला आणि "नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापुरचीमला हो म्हणत्यात लवंगी मिरची" या गाण्याने त्यांचे आयुष्यच बदलून गेले. त्यातूनच खर्‍या अर्थाने लावणीसम्राज्ञी म्हणून सुलोचना चव्हाण पुढे आल्या. त्याकाळी माईंनी गायलेल्या अनेक लावण्या महाराष्ट्रभर गाजत होत्या. किंबहुना आजही ते महत्व कमी झालेले नाही.
वयाची 60वर्षे भविष्याची गाठोडी न बांधता संपूर्ण विदर्भ, खानदेश,मराठवाडा,येथे शाळा, कॉले जेस,वाचनालय,मंदिरे,अनाथ आश्रम,रुग्णालये यांच्या मदतीसाठी असंख्य कार्यक्रम केले.यादरम्यान कुटुंबाकडे तेवढे लक्षही देता आले नाही.विशेष म्हणजे नांदेड येथील डॉ.भुसारी यांच्या कुळधाम हॉस्पिट लसाठी लागणाऱ्या प्लास्टिक सर्जरी मशीनसाठी 10कार्यक्रम करून सुमारे 9 लाखांची मदत माईंनी मिळवून दिली.नागालँड आणि भारत छुपे युद्ध सुरु असताना भारतीय लष्कराच्या मनोरंजनासाठी नागालँड येथे माईंनी कार्यक्रम केले.आपल्या गायकीच्या कलेतून सुलोचना माईंनी सामाजिकताहि वेळोवेळी जपली आहे. नियोजित रक्कम जमा झाली नाही म्हणून प्रसंगी आपले दागिने विकून मदत उभी करणार्या माईंनी कधीही पुरस्कारासाठी कोणाकडे हात पसरले नाहीत. या सर्व प्रवासात शामराव चव्हाण यांचीही खंबीर साथ असल्याचे माई आवर्जून सांगतात. मायबाप रसिक प्रेक्षकांची उत्स्फूर्त टाळी हाच आयुष्यातील गायनाला मिळालेला मोठा पुरस्कार असल्याचे माई सांगतात.
"मल्हारी मार्तंडकेला इशारा जाता जातासवाल माझा ऐकाअशा अनेक तमाशा प्रधान चित्रपटांतून त्यांनी आपल्या ठसकेबाज स्वरात लावण्या सादर केल्या. चपखळफटकेबाज शब्दांना आपल्या आवाजाच्यासुरांच्या माध्यमातून ठसका व खटका देण्याचे काम सुलोचना चव्हाणां इतके कुणीच उत्तम करू शकलेले नाही. "पाठीमागे अंतरे कसेही असोत पण लावणीच्या मुखड्याची सुरुवात ठसकेबाजच झाली पाहिजे" असे सुलोचना चव्हाणांचे ठाम मत होते आणि याचा प्रत्यय त्यांनी गायलेल्या लावण्यांतून येतोच.
सुलोचना चव्हाण यांना महाराष्ट्र शासनाचे दोन जीवनगौरव पुरस्कार, पी. सावळाराम यांचा गंगा जमुना पुरस्कार,1965साली"मल्हारी मार्तंड"या चित्रपटातील पार्श्वगायनासाठी महाराष्ट्र शास नाचा पुरस्कार,शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा 2009सालचा राम कदम कलागौरव पुरस्कारसंगीत क्षेत्रातील विशेष कामगिरीसाठी दिला जाणारा महाराष्ट्र शासनाचा वर्ष 2010चा "लता मंगे शकर"पुरस्कारचिंचवडच्या रोटरी क्लबतर्फे जीवनगौरव पुरस्कार यासह अनेक सन्मान मिळालेत. त्यांचे देश आणि परदेशात असंख्य चाहते आजही आहेत. आंतरारष्ट्रीय पातळीवर आपल्या आवाजाने जादू करणाऱ्या या मराठी गायिकेची मात्र शासन स्तरावर उपेक्षाच झाली आहे. केंद्र शासनाकडून देण्यात येणारा पद्म पुरस्कारासाठी याहीवर्षी डावलले गेले.राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने यावर्षी तरी सुलोचना माईंचा पद्म पुरस्कारासाठी शिफारस करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
माईंचे माझं गाणं माझं जगणं हे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले असून या महान गायिकेचा दरवर्षी वाढदिवस सिलोन रेडीओ स्टेशनवर जुनी गीते आणि आठवणी प्रसारित करून गेल्या अनेक वर्षांपासून साजरा केला जात आहे.त्याला परदेशातूनही उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले जाते.त्याकाळी ठसकेबाज आवाजात गायलेल्या अनेक लावण्या आजही प्रेक्षकांच्या मनात असून त्याअनेकांच्या ओठां वर सहज रेंगाळतात. माईंना त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आभाळभर शुभेच्छा...
लेखन आणि संकलन : निकेत पावसकर,
(पत्रकार, विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेशांचा संग्राहक)
तळेरे, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग. 416801
9860927199/940310156  niketpavaskar@gmail.com

सोबत : सुलोचना चव्हाण फोटो

Post a Comment

 
Top