Add

Add

0
         विकासाला प्राधान्य देणाऱ्या सरकारला मत द्यावे  - बापट 

पुणे(प्रतिनिधी ):- विकासाला प्राधान्य देत भाजप सरकारने  कायमच लोकांच्या हिताचा विचार करून निर्णय घेतले. यामुळेच यावर्षीदेखील भाजपाला आपले बहुमूल्य मत देऊन विजयी करावे असे आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले. 
पुणे शहर लोकसभेसाठी उमेदवार म्हणून गिरीश बापट यांची निवड झाल्यानंतर सर्वात आधी बापट यांनी शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यानंतर पक्षाच्या शहर कार्यालयात खासदार अनिल शिरोळे, आमदार विजय काळे, जगदीश मुळीक, भिमराव तापकीर, माधुरी मिसाळ, शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे,महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, पक्षनेते श्रीनाथ भिमाले, शहर अध्यक्ष योगेश गोगावले, यांच्यासह शिवसेना, भाजप आरपीआय व शिवसंग्राम संघटनेच्या अनेक कार्यकर्ते व नगरसेवकांनी त्यांचे स्वागत केले. पक्ष कार्यालयात शहर अध्यक्ष तसेच सहयोगी पक्षाची बैठक घेऊन प्रचारा संबंधी रणनीती तयार केली.
यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णा भाऊ साठे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, केसरी वाड्यातील लोकमान्य टिळक, स्वातंत्रवीर सावरकर, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून बापट यांनी प्रचाराची सुरुवात केली.

Post a Comment

 
Top