Add

Add

0
हिंदु संघटना आणि राष्ट्रप्रेमी नागरिक यांचे सामाजिक दुष्प्रवृत्ती रोखण्यासाठीराष्ट्रीय हिंदु आंदोलन !
           दुधात भेसळ करून मानवी आरोग्याशी खेळणार्‍यांवर कठोर कारवाई करा ! श्री.श्रीकांत बोराटे 
शिरवळ (प्रतिनिधी ):-- जागतिक स्तरावर सर्वाधिक दूध संकलन करणारा देश अशी ख्याती असणार्‍या भारत देशात दुर्दैवाने सध्या भेसळयुक्त दूध मोठ्या प्रमाणात विकले जात आहे. देशभरात विकल्या जाणार्‍या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांपैकी तब्बल 68.7टक्के उत्पादने भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण यांच्या मानांकनाप्रमाणे शुद्ध नाहीत,तसेच त्यामध्ये डिटर्जंट पावडर,कॉस्टिक सोडाग्लुकोजपांढरा रंग आणि रिफाइन तेल आदी भेसळ होत असल्याचेही भारतीय पशु कल्याण मंडळाचे सदस्य मोहन सिंह अहलुवालिया यांच्या अहवालात नमूद करण्यात आले होते. मुंबई येथील दूधविक्रेते ग्राहकांना अनुमाने 78टक्के निकृष्ट दर्जाचे दूध पुरवत असल्याचा अहवाल कन्झ्युमर गाईडन्स सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेने राज्य आणि केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण खात्याकडे सादर केला होता. याचप्रकारे महाराष्ट्रात 2 लक्ष लिटर पाण्याची भेसळ करून दुधाची विक्री केली जात असल्याचे धक्कादयक वास्तव असतांना शासन आणि प्रशासन याविषयी काहीही करत नाही. दूधामध्ये केली जाणारी भेसळ ही जनतेची फसवणूक आणि मानवी आरोग्यासाठी घातक असतांना हे थांबव ण्यासाठी शासन काय पावले उचलत आहेअसा प्रश्‍न करत दूध भेसळ करणार्‍यांवर कठोर कारवाई करावीतसेच दूध उत्पादकांशी साटेलोटे असणारे शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी,अशा मागण्या हिंदु जनजागृती समितीचे श्री.श्रीकांत बोराटे यांनी आज केल्या. या विषयावर भारतभर छेडण्यात आलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात ते बोलत होते.हे आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज चौक,शिरवळ या ठिकाणी 17 एप्रिल  या दिवशी करण्यात आले.

       पेट्रोल पंपांवर पेट्रोल-डिझेल भरण्यासाठीचे पाईप पारदर्शक करण्याचा नियम करा ! - प्रा.विठ्ठल जाधव
  दुधाप्रमाणेच देशात बहुतांश ठिकाणी पेट्रोल-डिझेलच्या मापात फसवणेभेसळयुक्त इंधन पुरवणे आदी गोष्टी सर्रास होत आहेत. यापूर्वी महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश या राज्यांत विविध पेट्रोल पंपांवरील डिस्पेसिंग युनिटमध्ये बेकायदेशीर पालट करून मापात फसवले जात होतेतसेच पेट्रोलमध्ये भेसळ केल्याचे अनेकदा उघड झाले आहे. अशा घटनांमुळे ग्राहकांमध्ये असुरक्षितता आणि अविश्‍वासार्हता निर्माण झाली आहे. यासाठी पेट्रोल पंपांवर ज्या पाईपमधून पेट्रोल किंवा डिझेल वाहनामध्ये भरले जातेतो पाईप पारदर्शक करावा. जेणेकरून त्यातून नक्की पेट्रोल जाते आहे कि नाहीहे ग्राहकांना समजू शकेलअशी मागणीही या वेळी करण्यात आली. ग्राहकांची फसवणूक आणि भेसळ करणार्‍या पेट्रोल पंपचालकांची अनुमती रहित करून त्यांच्यावर कठोर कारवाई कराअसे सनातन संस्थेचे,प्रा. श्री. विठ्ठल जाधव म्हणाले.

  पॉर्नसाइट,अश्‍लील आणि ऑनलाइन वेश्याव्यसवाय करणारी संकेतस्थळे यांवर बंदी घाला ! - कु.क्रांती पेटकर 
देशात महिला आणि अल्पवयीन मुले यांवरील लैगिंक अत्याचार अन् बलात्कार यांत प्रचंड वाढ झाली आहे. यामागील एक महत्त्वाचे कारण पॉर्नसाइटअश्‍लील आणि ऑनलाइन’ वेश्याव्यसवाय करणारी संकेतस्थळे पहाणे हेदेखील आहे. तसेच सध्या वेब सीरीजचा देखील सुळसुळाट झाला असून याद्वारेही अश्‍लीलताअनैतिकता आणि गुन्हेगारी यांची परिसीमा गाठणारे चित्रण कोणत्याही निर्बंधांशिवाय प्रसारित होत आहे. त्यामुळे अशा समाजघातकी पॉर्नसाइटअश्‍लील आणि ऑनलाइन वेश्याव्यसवाय करणारी संकेतस्थळे यांवर बंदी घालावीतसेच अशा वेब सिरीजवर निर्बंध आणावेतअशी मागणी रणरागिणी शाखेच्या कु.क्रांती पेटकर या वेळी  राष्ट्रीय हिंदू आंदोलनात केली.

Post a Comment

 
Top