Add

Add

0
            राजीव परीख क्रेडाई- महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी

पुणे(प्रतिनिधी):-क्रेडाईमहाराष्ट्रच्या कोल्हापूरचे अध्यक्षपदी राजीव परीख यांची बिनविरोध निवड करण्यात आली. क्रेडाईमहाराष्ट्रची निवडणूक  पुण्यातील कॉनरॅड हॉटेल येथे झाली. क्रेडाई महाराष्ट्रच्या सर्वसभासदांनी एकमताने  राजीव परीख  यांची 2 वर्षाच्या कालावधीसाठी निवड केली.येत्या १ एप्रिल पासून ते पदभार स्वीकारतील. 
यावेळी  क्रेडाई नॅशनलचे चेअरमन गीतांबर आनंद, क्रेडाई नॅशनलचे प्रेसिडेंट इलेक्ट सतीश मगर,क्रेडाई नॅशनलचे अध्यक्ष जक्षय शहा, क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया तसेच 51 शहरातील अनेक सदस्य उपस्थित होते.2019-2021या कालावधीसाठी क्रेडाई- महाराष्ट्रच्या उपाध्यक्ष पदांच्याही निवडणुका सदरदिवशी झाल्या त्यात संघटनेची नवी राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात सुनील फुरडे (सोलापूर)महेश साधवानी (नागपूर),रसिक चौव्हाण (नवी मुंबई), श्रीकांत परांजपे (पुणे), प्रफुल्ल तावरे (बारामती), रवी वट्मवार(औरंगाबाद) यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. सुनील कोतवाल (नाशिक)यांची  सचिव पदी व गिरीश रायबागे (कोल्हापूर) यांची खजिनदारपदी नेमणूक करण्यात आली. संयुक्त सचिवपदी अनिश शाह (जळगाव),महेश यादव (कोल्हापूर),दीपक मोदी (माळेगाव),विकास लागू (सांगली), राज्य सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी  शैलेश वानखेडे (अमरावती) यांची नियुक्ती करण्यात आली.बांधकाम व्यवसायात अधिकाधिक सुशासन,सुसूत्रता,झिरो डीले पॉलिसी, आधुनिक बांधकाम तंत्रज्ञानाचा उपयोग करून बांधकाम खर्च कमी करून नफा कसा वाढवता येईल यासर्व बाबींवर प्रामुख्याने लक्ष देण्यात येईल. याशिवाय तसेच प्लॉटिंग डेव्हपमेंट,स्कील डेव्हपमेंट, कर विषयक सुधारणा यांसारख्या मुद्द्यांवर देखील जास्तीत जास्त मार्गदर्शन विकसकांना मिळावे असा मानस असल्याची भावना परीख यांनी व्यक्त केली. 
चौकट :- क्रेडाई नॅशनलचे चेअरमन गीतांबर आनंद यांच्या हस्ते क्रेडाई महाराष्ट्राच्या नवीन ऑफिसचे उदघाटन झाले यावेळी,क्रेडाई नॅशनलचे अध्यक्ष जक्षय शहा ,क्रेडाई नॅशनलचे प्रेसिडेंट इलेक्ट सतीश मगर, क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया यावेळी उपस्थित होते. बांधकाम व्यवसायाशी निगडित सर्व महत्वाची ऑफिसेस पुण्यातच असल्यामुळे पुण्यासारख्या मध्यवर्ती ठिकाणी क्रेडाई महाराष्ट्रचे ऑफिस होणे आवश्यक  होते हीच गरज लक्ष्यात घेऊन कँपमधील न्यूक्लियस जीजीभाय टॉवरच्या सहाव्या मजल्यावर हे ऑफिस घेण्यात आले. एकता हीच क्रेडाईची  सर्वात  मोठी ताकद आहे  असे मत गीतांबर आनंद यांनी यावेळी व्यक्त केले. 

Post a Comment

 
Top