Add

Add

0
            "परळ - पौड - परळ"एस टी 1 मे पासून अखेर पुन्हा सुरू
मुंबई (प्रतिनिधी ):-मुळशी व मावळकरांची जीवनवाहिनी असलेली "परळ - पौड" ही एस टी मुंबई व नवी मुंबई स्थित असलेल्या मुळशी मावळ रहिवाशांच्या "मुळशी मावळ प्रवासी संघ- मुंबई" यांच्या प्रयत्नांनातून अखेर चालू करण्यात आली.
 परळ डेपोचे वरिष्ठ आगार व्यवस्थापक सचिन चाचरे,दिलीप शिंदे (मा.नगरसेवक),राम चोरगे(अध्यक्ष - मुळशी सहकारी पतपेढी मुंबई) व एकनाथ साठे (मुळशीकर उद्योजक)यांनी हार घालून व श्रीफळ वाढवून सकाळी 7.30 वा.परळ वरून पौडला एसटी रवाना केली.
  यावेळी "मुळशी मावळ प्रवासी संघ- मुंबई" चे पदाधिकारी राजू उंबरकर,सिताराम साठे,कैलास शिंदे,हेमंत लोकरे,नामदेव लायगुडे,स्वप्निल लाखवडे,तानाजी केमसे,नितीन चोरघे,शिवराम फाले,मंगेश दुर्गे,अर्जुन फाले,सुरेश दाभाडे,दिलीप फाले,संभाजी लायगुडे,नवनाथ कदम,नवनाथ साठे,एसटी संवर्धक,प्रेमी अवलीया रोहित धिंडे व अन्य मुळशी व मावळकर मेंबर्स उपस्थित होते.
      पुढे "जवन -कोळवण पौड" येथे सामाजिक धार्मिक व राजकीय क्षेञातील तसेच  जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य सचिन साठे,सागर काटकर,शिवसेना नेते आप्पा टेमघरे,राम गायकवाड,लहू लायगुडे ह.भ.प रामदास दाभाडे,अर्जुन फाले,सुरेश जोरी,हरि दुर्गे,हरिभाऊ धिडे,संतोष शेलार,नवनाथ पालकर अशा अनेक मान्यवरांनी एस टी चे स्वागत केले.
  पहिल्याच दिवशी प्रवासी वर्गानी 75% प्रतिसाद दिला असून शहरी व ग्रामीण भागातील लोकांना याचा नक्कीच चांगला फायदा होईल.
  एस टी परळ वरून सकाळी 7.30 वा.पौडला व पौड वरून दुपारी 1.30 वा.परळ (मुंबई) सुटेल.प्रवासाचा रूट :- परळ,दादर नेहरू नगर ,चेंबूर ,वाशी पनवेल,खोपोली ,लोनावळा कामशेत, पवनानगर ,जवन,कोळवण व  पौड असा असेल.तरी मुळशी तालुक्यातील सर्व शहरी व ग्रामीण प्रवाशांनी या एस टी ने प्रवास करावा अशी विनंती करण्यात आली आहे. 

Post a Comment

 
Top