Add

Add

0
                         6 जून शिवराज्याभिषेक दिन पुणे जिल्ह्यात
                      स्वराज्य गुढी उभारुन  साजरा होणार.
              पुणे जिल्हा परिषदच्या ऐतिहासिक निर्णयाच्या अंमलबजावणीची तयारी सुरु.

    पुणे (प्रतिनिधी ):- 6 जून शिवराज्याभिषेक दिन पुणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, पंचायत  समिती व पुणे जिल्हापरिषद इमारतीसमोर स्वराज्य गुढी उभारुन गेल्या 2 वर्षांच्या परंपरेप्रमाणे साजरा होणार.
 6 जून 1674 रोजी रायगडावर छत्रपती श्री शिवाजीमहाराजांचा राज्याभिषेक मोठ्या दिमाखात साजरा झाला होता. याच दिवशी शिवकालगणनेला प्रारंभ झाला होता, शिवाजी महाराज छत्रपती झाले, स्वतःचा शिवशक प्रारंभ करुन राजदंड हाती घेतला तो हा शुभदिन होय. महाराजांनी तत्कालीन प्रस्थापित सत्तांना पालथे करुन स्वतःच्या सार्वभौम स्वराज्याचा पवित्र मंगल कलश रयतेला अर्पन करुन रयतेची झोळी सुख समृद्धीने भरली होती.
शिवजयंती महोत्सव समिती रायगड किल्यासह शनिवारवाडा, लालमहल व इतर असंख्य ठिकाणी स्वराज्य गुढी उभी  करुन हा पवित्र दिवस साजरा करत असते. गेल्या 7 वर्षापासून समितीच्या वतीने शनिवार वाड्यावर 51 फुटी स्वराज्य गुढी उभारुन ढोलताशांच्या गजरात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो.
शिवजयंती महोत्सव  समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित  गायकवाड यांच्या बरोबर समितीचा मुख्य समन्वयक या नात्याने मी मा.जि.प. सदस्य श्री.शांतारामदादा इंगवले यांना स्वराज्य गुढी पुणे जिल्ह्यातील  प्रत्येक  ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद भवनासमोर उभी करण्यासाठी जिल्हा परिषदेत ठराव करण्याची विनंती केली होती. त्यांनी तसा ठराव दि. 19/12/2016 रोजी जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेसमोर मांडला होता त्यास सर्व सदस्यांनी मान्यता देऊन ठराव एकमताने मंजूर केला होता.
या ठरावाची यशस्वी अंमलबजावणी गेल्या 2वर्षांपासून होत आहे . येणार्‍या 6 जून 2019ला शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यासाठी जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.गावडे साहेब , उप मुख्य कार्यकारी अधिकारी मा.घुले साहेब ,व मा.कोईनकर साहेब यांच्याबरोबर  बैठक झाली. या बैठकीत  हा दिवस संपुर्ण  जिल्ह्यात  परंपरेप्रमाणे गुढी उभारुन साजरा करण्यासाठी सर्व तालुक्याचे सभापती, उपसभापती व बि.डी.ओ. यांना सूचना देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे, व प्रत्येक  ग्रामपंचायतीला व पंचायत समितीला पत्रक काढणार असल्याचे सांगितले. 
 जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले व याबाबत सविस्तर चर्चा झाली. या वेळी समितीचे संस्थापक अध्यक्ष मा.अमितशेठ गायकवाड , मंदारशेठ मते  उपस्थित होते

Post a Comment

 
Top