Add

Add

0

बिलियन स्माइल्सच्या वतीने अपसाउथचं पुण्यात 8 वं आउटलेट लाँच...  
पुण्याच्या बाजारपेठेतून उत्तम प्रतिसादानंतर धोरणात्मक निर्णय 

पुणे(प्रतिनिधी):-पुण्यातील दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांचं लोकप्रिय ठिकाण अपसाउथनी नुकतंच पुण्या तल्या  उंड्रीमध्ये आपलं 8वं आउटलेट सुरू केलं. आपल्या असबॉनसाउथ आणि बिलियन स्माइल्स केटरिंग या लोकप्रिय ब्रँड्सच्याबरोबरच आज बिलियन स्माइल्सने अपसाउथची अनेक आउटलेट्सही सुरू केली आहेत ज्यांच्या माध्यमातून अस्सल दाक्षिणात्य पदार्थांचं फ्युजन असलेले खाद्यपदार्थ देत संपूर्ण बेंगळुरू आणि पुण्याला सेवा पुरवली जाते. उंड्रीसोबतच पुणे शहरात सात ठिकाणी या ब्रँडची आउटलेट यशस्वीपणे व्यवसाय करत आहेत ज्यांमध्ये विमाननगर, पुणे विमानतळ, वानवडी,औंध,वाकड, चांदणी चौक आणि फिनिक्स मार्केट सिटी इथल्या आउटलेटचा समावेश होतो. 
साउथ इंडियन बर्गर-उथली, मलबारी पराठा सँडविच, साबुदाणा चीज वडा, मँगो मोक्ष, आरोग्यदायी सुपर ग्रेन पराठा इ. दक्षिणात्य फ्युजन पदार्थांच्या विशेष डिशेससाठी लोकप्रिय असलेल्या या ब्रँडला भारतातील सर्वोत्तम साउथ इंडियन फ्युजन रेस्टॉरंट म्हणून स्वत:चे स्थान निर्माण करायचे आहे. वेगवेगळ्या ऑफर्स, व्हॅल्यू प्रायसिंग, जबरदस्त इंटिरियर त्याचबरोबर स्वच्छ व लाइव्ह किचनच्या वातावरणातून प्रचंड वेगवान सेवा देणारं अपसाउथ हे सेल्फ-सर्व्हिस आणि सिट-डाउन रेस्टॉरंट म्हणूनही सर्वोत्तम पर्याय आहे. जागतिक स्तरावर आवडीच्या असणाऱ्या विविध प्रकारच्या इडली आणि डोसा, मेदू वडा, उत्तप्पा, फिल्टर कॉफी पड्डू आणि इतर अनेक पदार्थही या आउटलेटमध्ये उपलब्ध आहेत.
 लाँचवेळी याबाबत बिलियन स्माइल्स हॉस्पिटॅलिटी प्रा. लि.चे उपाध्यक्ष कुमार गौरव म्हणाले,चांदणी चौक आणि वानवडीत नुकत्याच सुरु केलेल्या दोन आउटलेट्सना मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर आम्ही उंड्रीमध्ये आउटलेट सुरू करण्याचा निर्णय घेतला. बॅचलर, आयटीमधील प्रोफेशनल्स, विद्यार्थी आणि अनेक कुटुंब उंड्रीत राहतात त्यामुळे आमच्यासाठी हा परिसर योग्य बाजारपेठ आहे. 
नव्या जगाची गती लक्षात घेऊन अपसाउथने भारतीय आणि दक्षिण भारतीय पदार्थांचे मिश्रण तयार करून त्याला एक वेगळी चव दिली आहे ज्याचा स्वाद ग्राहकांना देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही आरोग्याला पोषक, चविष्ट, ताजं आणि संपूर्ण भारतीय व दक्षिण भारतीय शाकाहारी पदार्थ नव्या पद्धतीने ग्राहकांना देतो. या सगळ्या पदार्थांच्या किमतीही खूप परवडणाऱ्या असून, एका माणसाला इथल्या पदार्थांचा अस्वाद घ्यायचा असेल तर सरासरी केवळ 80-90 रुपये खर्चावे लागतील, असे मत कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह शेफ मनु आर. नायर यांनी व्यक्त केले.  
पत्ता :अपसाउथ,सिटी सेंटर,उंड्री, पुणे, महाराष्ट्र 411060.फोन क्रमांक : 09845598258. 
अधिक माहितीसाठी कृपया संपर्क :
                                                                   गौरव सिंग 9970357280.

Post a Comment

 
Top