Add

Add

0

‘टायझर ईझी कॉटन’ श्रेणीला महाराष्ट्रातून भरघोस प्रतिसाद

लोकप्रिय ब्रँड ‘टायझर’ने नुकत्याच सादर केलेल्या ‘ईझी कॉटन’ या शर्टस् आणि ट्राऊझर्सच्या श्रेणीला संपूर्ण महाराष्ट्रातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

पुणे (प्रतिनिधी ):-लोकप्रिय ब्रँड ‘टायझर’ने नुकत्याच सादर केलेल्या ‘ईझी कॉटन’ या शर्टस् आणि ट्राऊझर्सच्या श्रेणीला संपूर्ण महाराष्ट्रातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. ईझी कॉटनचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये ग्राहकांना कॉटनचा संपूर्ण कम्फर्ट तर मिळतोच, परंतु कॉटनच्या देखभालीसाठी वेळ आणि पैसे खर्च करायची अजिबात गरज नाही. शर्टस् 595 रु. ट्राऊझर्स 895 रुपये किमतीत उपलब्ध आहेत.
रु. 595/-मध्ये कॉटनचा कम्फर्ट, सुयोग्य किंमत व झिरो मेंटेनन्स असा तिहेरी फायदा फक्त ‘टायझर ईझी कॉटन’च देत असून मार्केटमध्ये अशा प्रकारचा ‘टायझर’ हा एकमेव ब्रॅण्ड आहे. प्लेन व चेक्स प्रिंट्समध्ये भरपूर व्हरायटी उपलब्ध आहेत.
टायझरचे संचालक कुणाल मराठे यांनी सांगितले की, ‘टायझर’ ब्रॅण्ड नेहमीच ग्राहकांना काय हवे आहे आणि ते कसे देता येईल याचा सातत्याने विचार करतो. कडक उन्हाळा सुसह्य करण्यासाठी ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन आम्ही ‘टायझर ईझी कॉटन’ ही शर्टस् आणि ट्राऊझर्सची श्रेणी घेऊन आलो आहोत. ईझी कॉटनमुळे तुम्हाला कॉटनचा संपूर्ण कम्फर्ट तर मिळतोच पण कॉटनच्या देखभालीचा कोणताही त्रास तुम्हाला होत नाही.
ईझी कॉटनचे वैशिष्ट्य सांगताना कुणाल मराठे म्हणाले, ‘ईझी कॉटन’चे फॅब्रिक हे टायझरने स्वत: संशोधन आणि विकास करून निर्माण केले असून त्याचे पेटंट मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे. कॉटन आणि डेनियर फॅब्रिकचा वापर करून तयार केलेले हे ईझी कॉटन नाविन्यपूर्ण फॅब्रिक इंडस्ट्रीमध्ये फक्त ‘टायझर’कडेच असून या फॅब्रिकमुळे ग्राहकांना कॉटनचा संपूर्ण कम्फर्ट तर मिळतोच पण कॉटन असूनही याला इस्त्रीची गरज पडत नाही. या खास श्रेणीला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून आताचा कडक उन्हाळा ईझी कॉटनच्या सहाय्याने नक्कीच स्टायलिश आणि कूल बनेल असा मला विश्वास आहे.
ईझी कॉटनची संपूर्ण श्रेणी स्टायलिश आणि आकर्षक रंगात, महाराष्ट्रातील टायझरच्या 50 हून अधिक शोरूम्समधून उपलब्ध करण्यात आली आहे. 

Post a Comment

 
Top