Add

Add

0

व्हीमूट तर्फे भारतातले पहिले ऑनलाईन चर्चा 
आणि मतदान व्यासपीठ सादर

पुणे(गौरव सिंग ):- पुणे स्थित व्हीमूट या स्टार्टअपने नुकतेच भारतातले पहिले ऑनलाईन चर्चा आणि मतदान व्यासपीठ सादर केले आहे. सर्वसामान्य माणसाला त्याचा आवाज उठवायला मदत करण्याच्या उद्देशाने हे व्यासपीठ सुरु करण्यात आले आहे. चर्चा किंवा संवादात्मक मतदान अशा रूपात प्रश्न उपस्थित करण्यासाठी क़्वेशन अँड ओपिनियन (Q&O) व्यासपीठाचा उपयोग होऊ शकेल. राजकारण,शहर आणि स्थानिक पातळीवरील प्रश्न, क्रीडा, मनोरंजन यांच्याशी संबंधित प्रश्नांवर साधारण याच विषयात रस असणाऱ्या लोकांबरोबर वापरकर्ते चर्चा करू शकणार आहेत आणि या चर्चेवर आधारित विशिष्ट मतापर्यंत पोहोचू शकणार आहेत.

सर्वसाधारण सामाईक क्षेत्रात रस असणाऱ्या वापरकर्त्यांना जोडण्याचे काम हा स्टार्टअप करत असून अप्रत्यक्षपणे जागतिक पातळीवर एक विशिष्ट आकृतिबंध असणारे व्यासपीठ आणि मत तयार करण्याचे काम करत आहे. वापरकर्ते सहभागी होण्यासाठी आपल्या मित्रमंडळीना आणि अनुकरण करणाऱ्यांना फेसबुक आणि ट्वीटर वर आमंत्रित करू शकतात.
 या सादरीकरणाबद्दल बोलताना व्हीमूटचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल शेलार म्हणाले, “फेसबुक, ट्वीटर, क्वोरा इत्यादी व्यासपीठांचे स्वरूप लक्षात घेता त्यावर चर्चा घडत नाही असे काही वर्षांच्या अभ्यासानंतर आमच्या लक्षात आले. पुढे जाऊन या व्यासपीठांवर वापरकर्ते मतं देऊ शकतात पण त्या मतांमुळे बदल घडून येत नाही. चुकीच्या बातम्या आणि एकांगी लेख यामुळे उलटपक्षी सोशल मिडीयावरील पोस्ट्स मधून गैरसमजच पसरतात.”
 ते पुढे म्हणाले, “हा प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही हे व्यासपीठ सादर केले. त्या अनुषंगाने ब्रँडची संकल्पना घेऊन आम्ही पुढे आलो. येथे वापरकर्त्यांना एका नजरेत इतर लोकांचे दृष्टीकोन बघणे, त्यांच्या मताला समर्थन किंवा विरोध करणे शक्य होऊ शकेल. मौल्यवान प्रतिसाद आणि सूचना, प्रस्ताव मिळू शकतील. जेणेकरून लोकांना आपले अंतिम मुख्य मत ठरविणे शक्य होऊ शकेल.”
 या व्यासपीठाला संवादात्मक बनविण्यासाठी अॅपमध्ये एकमेवाद्वितीय वैशिष्ट्य समाविष्ट करण्यात आली आहेत. वापरकर्त्यांना आपलं मत टाईप करण्याऐवजी स्वतःच्या आवाजात रेकॉर्डसुद्धा करता येणार आहे. त्यामुळे एक वेगळाच वैयक्तिक टच या अॅपला मिळणार आहे. सर्व प्रकारचे वापरकर्ते या अॅपचा वापर करू शकणार आहेत. वापरकर्ते एखादा नवा विषयही चर्चेला घेऊ शकणार आहेत. या व्यासपीठावर सातत्याने मतमतांतरे आणि प्रश्न यांकडे बारकाईने लक्ष देण्यात येणार आहे. त्यामुळे कोणताही आक्षेपार्ह आशय किंवा चर्चेशी संबंधित नसलेले मत यांच्यावर लक्ष ठेवता येणार आहे.
 व्हीमूट खाजगी आणि निनावी चर्चेलाही प्राधान्य देत आहे. त्यामुळे खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांना खरा, योग्य आणि मौल्यवान सल्ला मिळू शकेल. चर्चा किंवा मतदान या रूपातील चर्चेचा निकाल सोशल मिडिया पोस्ट्स किंवा सोशल मिडिया पेजेस वरील संबंधित अधिकारी मंडळींना टॅग करून शेअर करता येऊ शकेल.
 व्हीमूट विषयी: व्हीमूट हे भारतातील पहिलेच इंटरनेट आधारित चर्चा आणि मतदान व्यासपीठ आहे. श्री. कुणाल शेलार यांनी या कंपनीची सुरुवात केली. सर्वसामान्य माणसाला त्याचा आवाज उठवायला आणि त्यावर मत, दृष्टीकोन निर्माण करायला मदत करण्याच्या उद्देशाने हे व्यासपीठ सुरु करण्यात आले आहे. व्ही म्हणजे आपण सगळे आणि मूट हे चर्चेला घ्यायचे प्रश्न याअर्थी वापरण्यात आले आहे.
आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींविषयी प्रश्न उपस्थित करून, अशाच प्रकारच्या विषयांमध्ये रस असणाऱ्या समविचारी लोकांशी ऑनलाईन गटामध्ये चर्चा करून आणि एका तर्कशुद्ध निर्णयाप्रत पोहोचून सध्याच्या तंत्रज्ञान प्रेमी पिढीला बदल घडवून आणण्यासाठी मदत करण्याकरता हे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे.
सध्या या व्यासपीठावर 180 हून अधिक वापरकर्ते आहेत. अलिकडेच या स्टार्टअपची आयआयटी मुंबईच्या द टेन मिनिट मिलियन स्टार्टअप स्पर्धेत निवड झाली आणि उपांत्यफेरी पर्यंत ते पोहोचले.
अधिक माहितीसाठी कृपया www.vmoot.com येथे संपर्क साधा

For more information please contact:
Gaurav Singh - 9970357280


Post a Comment

 
Top