Add

Add

0
                ताराचंद आयुर्वेदीय ट्रस्टच्या विश्वस्तपदी 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे गिरीश टिल्लू यांची नियुक्ती 

पुणे (प्रतिनिधी ):-शेठ ताराचंद रामनाथ चॅरिटेबल आयुर्वेदीय ट्रस्टच्या विश्वस्त मंडळावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने हेल्थ सायन्स विभागाचे प्रा. डॉ. गिरीश टिल्लू यांची विश्वस्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. विश्वस्त मंडळावर डॉ. राजेंद्र हुपरीकरगोपाल राठीमहापौर मुक्ता टिळकसुनील कांबळे यांची याआधीच नियुक्ती झाली होती.अशी माहिती अध्यक्ष दत्ताजी गायकवाड यांनी दिली.   
सर्वसामान्यांसाठी शेठ ताराचंद रामनाथ धर्मार्थ आयुर्वेदीय रुग्णालयामध्ये दर वर्षी अंदाजे 55 हजारांहून अधिक पंचकर्म उपचार करण्यात येतात. सर्व वैद्यकीय उपचार व सुविधा याठिकाणी अत्यंत माफक दरात उपलब्ध आहेत.याशिवाय प्रसुती तसेच गुंतागुतीच्या शस्त्रक्रिया देखील येथे तज्ज्ञ चिकित्सक हाताळ तात.भारताला लाभलेली आयुर्वेद ही एक अमूल्य देणगी आहे. आणि त्या माध्यमातून ही संस्था गेल्या 70 वर्षापासून लोकांच्या सेवेत कार्यरत आहे.येथे रुग्णांना आवश्यक ती सेवा आणि योग्य आयुर्वेदिक उपचार पुरविले जातात. डायललीसिसची सेवा 450रुपये इतक्या माफक किंमतीत याठिकाणी उपलब्ध आहे.आर्थिक कारणास्तव कोणाला उपचारात कमतरता भासू नये,म्हणून अत्यल्प दरात ही सेवा अविरतपणे गरजूंना दिली जाते

Post a Comment

 
Top