Add

Add

0
॥ जयतु जयतु हिन्दुुराष्ट्रम् ॥ 

27 मे ते 8 जून 2019 या कालावधीत रामनाथी, गोवा
येथे होणार्‍या अष्टम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या निमित्ताने...

सामाजिक ऐक्यासाठी लोककल्याणकारी हिंदु राष्ट्राची आवश्यकता !
      ‘सामाजिक ऐक्य’, ‘समता’, ‘बंधुता’ या शब्दांना सध्या मोठी मागणी आहेविशेषतः हिंदुत्वाला लक्ष्य करतांना या शब्दांचा नेहमी उल्लेख केला जातो. ‘हिंदुत्व’ ही उच्चवर्णियांची मक्तेदारी असल्याची भावना काही हिंदुत्व विरोधकांमध्ये असतेतर हिंदु राष्ट्र म्हणजे ‘अहिंदूंचे दमन’ अशीही काहींकडून निरर्थक नकारात्मक मांडणी केली जातेयामागे अज्ञान असतेतसे ‘हिंदुत्वाला विरोध’ हाही अजेंडा असतोखरेतर आध्यात्मिक हिंदुत्वामध्येच सामाजिक ऐक्य घडवून आणण्याची क्षमता असून त्यासाठी लोककल्याणकारी हिंदु राष्ट्र अपरिहार्य आहेही केवळ तात्त्विक संकल्पना नसून गेली वर्षे गोव्यातील फोंडा येथे यशस्वीपणे पार पडणार्‍या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनामध्ये याची प्रचितीही आली आहे
सामाजिक दुफळी !
विविधतेमध्ये एकता’ असे कितीही नारे दिलेतरी आज समाजामध्ये जात-पातपंथवर्ण यांवरून भेद आहेराजकीय पक्ष आणि हिंदुत्व विरोधकांच्या माध्यमातून काही विदेशी शक्तीही भारतीय समाजविशेषतः हिंदु समाजात दुफळी माजवण्यासाठी प्रयत्नशील आहेतराजकीय पक्षांचे नेते भाषणांमधून जातीभेद निर्मूलनाच्या गप्पा मारतात आणि प्रत्यक्षात मात्र जातीजातींमधील दरी वाढवणारी वक्तव्ये करतातयासाठी विशिष्ट समाजाच्या आंदोलनांना बळ देतातकेवळ एका विशिष्ट समूहाच्या द्वेषापोटी पगडी-पागोटे यांचे राजकारण करतात आणि सनातन हिंदु धर्मावर टीका करतातअशांनी खरेतर ना सत्य इतिहासाचा अभ्यास केलेला असतो ना हिंदु धर्माच्या शिकवणीचा अभ्यास केलेला असतो केवळ मतपेढीवर डोळा ठेवून राजकीय पक्षांकडून सामाजिक ऐक्याच्या नावाखाली सामाजिक दुहीचे राजकारण केले जात आहेहे वास्तव आहे
भाईचार्‍याचा फसलेला प्रयोग !
    जी गोष्ट जातीभेदाचीतीच धर्मभेदाचीही ! ‘गंगा-जमुना तहजीब’, ‘सर्वधर्मसमभाव’, ‘भाईचारा’ अशा गोंडस नावांखाली स्वातंत्र्यप्राप्तीच्या पूर्वीपासून हिंदु-मुसलमान ऐक्याचे प्रयत्न झालेकथित अहिंसेच्या पुजार्‍याचा आत्मघातकी सल्ला मानून स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी परधर्मियांकडून होणारे अत्याचारही हिंदूंनी सहन केलेमात्र त्याच्या बदल्यात हिंदूंना ऐक्य सोडाचकेवळ उपेक्षा आणि अन्याय पदरी आलाआजही समरसतेच्या नावाखाली ऐक्याचे प्रयत्न होत आहेतमात्र ते बहुतांश एकतर्फी म्हणजे केवळ हिंदूंच्या बाजूने आहेतयाचे कारण दुसर्‍या धर्मामध्ये असलेले ‘बिभीषण’ नगण्य झाले आहेत. ‘हिंदूंनी फूल दिलेतरी दुसर्‍या बाजूने निखाराच अंगावर पडत असल्या’च्या अनेक घटनांचा इतिहास हा साक्षी आहेत्यामुळे आज अनेक हिंदू ‘जशास तसे’ धोरण राबवण्यासाठी बाध्य झाले आहेतआज हिंदूबहुल भारतात अकबरुद्दीन ओवैसीसारखा माणूस ‘10 मिनिटांसाठी पोलीस हटवलेतर25 कोटी मुसलमान 100 कोटी हिंदूंना मारतील’अशी भाषा करतो. ‘गळ्यावर सुरी ठेवलीतरी वन्दे मातरम म्हणणार नाही’असे वक्तव्य केले जातेराजकीय नेते अस्तित्वात नसलेल्या ‘हिंदु आतंकवादा’चा बागुलबुवा निर्माण करतातधर्मद्वेषापोटी हिंदुत्वनिष्ठांच्या सहस्रावधी हत्या होऊनही त्याविषयी चकार शब्द न काढणारी मंडळी काही निवडक हत्यांच्या संदर्भाने उर बडवतात आणि तरीही हिंदूंच्या माथी असहिष्णुतेचा शिक्का मारला जातोबहुसंख्यांकांच्या धर्माची इतकी हेटाळणी जगात अन्यत्र कुठेही होत नसेलहे येथे ठळकपणे सांगण्याजोगे सूत्र !
      वास्तविक ‘व्यापकता’ आणि ‘सहिष्णुता’ हे हिंदु धर्माचे स्थायी गुण आहेतअन्य काही पंथांप्रमाणे आपली विचारधारा न मानणार्‍यांची हत्या करण्याची शिकवण हिंदु धर्म देत नाहीतर ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ची संकल्पना मांडतो. ‘हे विश्‍वचि माझे घर’ असे म्हणतांना हिंदूंना मोठे तत्त्वचिंतन करावे लागत नाहीकारण संत-ऋषींनी पूर्वीच्या काळी दिलेली शिकवण हिंदूंनी मुळातच सहजतेने स्वीकारली आहेकिंबहुना तोच हिंदूंचा गुणधर्म आहेत्यामुळे प्रतिदिनच्या प्रार्थनेतही हिंदु समाज ‘सर्वेत्र सुखिनः सन्तु’,अशी सहजतेने प्रार्थना करतोया वेळी केवळ धार्मिक दृष्टिकोनातून हिंदूंसाठी प्रार्थना करण्याचा विचार कोणाच्या मनात येत नाही,तर जे जे चांगले आहेत्या सर्वांसाठी मंगल कामना केली जातेहीच हिंदु धर्माची उदारता आणि सहिष्णुता आहेम्हणूनच हिंदु समाजासह पारशी समाजाला हिंदु धर्माने पूर्णपणे सामावून घेतलेनास्तिकतावादी चार्वाक विचारही येथे मांडले गेलेहिंदुत्वामध्ये मुळातच एक जोडणारी शक्ती (binding force) आहेअशा सनातन हिंदु धर्माला आज पुनर्प्रतिष्ठा आणि संविधानिक संरक्षण प्राप्त करून देण्याची आवश्यकता आहेयानेच भारताची गेल्या 71 वर्षांत झालेली परमावधीची अधोगती भरून निघेल नि भारतियांमध्ये वास्तविक सामाजिक ऐक्यबंधुत्वव्यापकत्व आदी गुणांची वृद्धी होऊन देश आनंदी होईल.
     याच उद्देशाने अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे आयोजन करण्यात येत आहेगेल्या सात अधिवेशनांमध्ये भारताच्या विविध राज्यांतील हिंदुत्वनिष्ठांसह पूर्वीच्या आर्यावर्तात असणार्‍या बांगलादेशनेपाळश्रीलंका या देशांमधील हिंदुत्वनिष्ठही सहभागी होत आहेतकेवळ तात्त्विक चिंतन नाहीतर हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दिशेने नियोजनबद्ध मार्गक्रमण करत आहेतम्हणूनच ‘हिंदुत्वनिष्ठांचा कुंभमेळा’ असे अधिवेशनाचे वर्णन केलेतरी वावगे ठरणार नाहीया अधिवेशनात ना प्रांताचा भेद उरतोना भाषेचाना जातीचा सनातन हिंदु धर्माच्या धाग्याने सर्व हिंदुत्वनिष्ठ जोडले जातात आणि केवळ संघटित नाहीतर आपापल्या प्रांतात रामराज्य आणण्यासाठी कृतीशीलही होतातकेवळ राजसिक हिंदुत्व नाहीतर आध्यात्मिक हिंदुत्व हा या अधिवेशनाचा पाया आहेकेवळ वर्षांमध्ये संघटकांचे संघटन करून त्यांच्यामध्ये बंधुभाव निर्माण करणारे हे अधिवेशन सामाजिक ऐक्यासाठी लोककल्याणकारी हिंदु राष्ट्राची आवश्यकता अधोरेखित करणारे आहे.
यंदा 27 मे ते जून या कालावधीत अष्टम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन !
यंदाच्या वर्षी 27 मे ते जून या कालावधीत गोवा येथे अष्टम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहेया अंतर्गत 27 आणि 28 मे या दिवशी धर्मप्रेमी अधिवक्ता अधिवेशन, 28 मे या दिवशी उद्योगपती अधिवेशन, 29 मे ते जून या कालावधीत अखिल भारतीय हिंदू अधिवेशन आणि ते जून या कालावधीत हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण आणि अधिवेशन घेण्यात येणार आहे.
         श्री. रमेश शिंदे,
                                              राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती.
                                                        संपर्क : 9987966666

Post a Comment

 
Top