Add

Add

0
               प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार संधी कायमस्वरूपी   देण्याचे 
    औद्योगिक जगताचे धोरण कौतुकास्पद - डॉ. कॅप्टन. सी. एम. चितळे.
'यशोत्सव' स्नेहसंमेलनात 'यशोगाथा' प्रकाशन सोहळा संपन्न.

पुणे (प्रतिनिधी ):-प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी  रोजगार संधी देण्याचे औद्योगिक जगताचे धोरण कौतुका स्पद आहे असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे  मानद प्राध्यापक डॉ. कॅप्टन.सी.एम.चितळे यांनी  व्यक्त केले. 
'यशस्वी' संस्थेच्या  विद्यार्थ्यांच्या 'यशोत्सव' स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करताना  ते बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, कंपन्यांमधून ऑन द जॉब ट्रेनिंग  करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्याना प्रत्यक्ष मशिनवर व  शॉप फ्लोअर वर काम  करण्याची  संधी मिळत असल्याने  त्यांच्यात कामाप्रती अनुभव संपन्नता वाढीस लागते आणि यामुळेच अशा कौशल्याधिष्टित शिक्षणव्यवस्थेतून तयार होणारे हे  कुशल मनुष्यबळ उद्योगजगताची खरी गरज पूर्ण करण्यास सक्षम ठरते. शिवाजीनगर येथील महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड  केटरिंग  टेक्नॉलॉजीच्या  सभागृहात  महाराष्ट्र दिनानिमीत्त  या कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले होते.     
तर याप्रसंगी  उपस्थित असणाऱ्या द  सोसायटी  फॉर  डोअरस्टेप स्कुल्सच्या संस्थापक अध्यक्ष रजनीताई परांजपे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की,आजही  आपल्या  देशात अगदी पुणे,  मुंबई सारख्या  महानगरांमधुनही  शाळेची पायरीसुद्धा ओलांडू न  शकणारी  हजारो मुले- मुली दिशाहीन आयुष्य जगत आहेत. एकीकडे महागडे अभ्यासक्रम शिकवून बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना दुसरीकडे  'यशस्वी' सारख्या  संस्थेतून  कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगारक्षम युवा पिढी तयार होत आहे, ही  नक्कीच आश्वासक  बाब  आहे, या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला 'यशस्वी' संस्थेच्या विद्यार्थ्यांना आवाहन करायला आवडेल की  त्यांनीही त्यांच्या आयुष्यातील करिअरच्या वाटेवर प्रगती करत असताना  शक्य होईल तितक्या प्रमाणात  अजूनही शाळेत न  पोहोचू शकलेल्या मुला-मुलींना किमान शाळेपर्यन्त  आणण्यासाठी प्रयत्न करावेत. 
यावेळी मान्यवरांच्या हस्ते संस्थेच्या 'यशोगाथा' विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच विविध कंपन्यांतून ऑन द जॉब ट्रेनिंगमध्ये शंभर टक्के उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांचे व कंपनीत ऑन  रोल  नोकरीची संधी प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात प्रशस्तीपत्र व सुवर्णपदक देऊन त्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. 
तर कार्यक्रमाच्या उत्तरार्धात  विद्यार्थ्यांचे गायन, वादन व समूह गायन  हे कलाविष्कार सादर करण्यात आले. 
यावेळी कार्यक्रमाला  'यशस्वी' संस्थेचे  अध्यक्ष  विश्वेश कुलकर्णी,संस्थेच्या  संचालक, स्मिता धुमाळ, संचालक डॉ. मिलिंद मराठे,संजय छत्रे, राजेश नागरे,अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सबनीस, अध्यापन विभाग प्रमुख डॉ. सुनीता पाटील, संस्थेच्या मनुष्यबळ  व्यवस्थापक  मुक्ता  हुपरीकर, कौशल्य विकास  प्रशिक्षण विभाग प्रमुख संजय सिंग यांच्यासह संस्थेचे  सर्व अध्यापक, सुपरवायजर, फिल्फ ऑफिसर व विद्यार्थी  मोठ्या संख्येने उपस्थित  होते. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुक्त हुपरीकर  यांनी तर आभार प्रदर्शन  डॉ.सुनीता पाटील यांनी  व सूत्रसंचालन योगेश रांगणेकर यांनी  केले. 
या कार्यक्रमासाठी श्वेता साळी,हर्षा पटेल,अश्विनी घनवट, वर्षा राणे, प्रशांत कुलकर्णी, वैशाली भुसारी,माधवानंद खांडेकर,सोमन पात्रा, मेघा बोरकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.           

Post a Comment

 
Top