Add

Add

0
टंचाई परिस्थितीवर मात करण्‍यासाठी सर्व यंत्रणांनी
 समन्‍वय ठेवून कामे करावीत-   जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

पुणे (प्रतिनिधी ): -  जिल्‍हयातील टंचाई परिस्थितीवर मात करण्‍यासाठी सर्व  यंत्रणांनी समन्‍वय ठेवून कामे करावीतअशा सूचना जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्‍या. जिल्‍हाधिकारी कार्यालयात टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ.जयश्री कटारेजिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडेपुणे वन विभागाच्‍या उपवनसंरक्षक श्रीलक्ष्‍मी ए.जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल,रोहयोचे उपजिल्‍हाधिकारी सुधीर जोशी आदी उपस्थित होते. 
जिल्‍हाधिकारी राम यांनी प्रारंभी तालुकानिहाय टंचाई आढावा घेतला. जिल्‍हयात निर्माण होणा-या पिण्‍याच्‍या पाण्‍याची परिस्थिती कशी आहेचारा उपलब्‍धतेचे प्रमाणआतापर्यंत केलेल्‍या कामाची सद्यस्थितीउपलब्‍धता याचीही विस्‍तृत माहिती घेतली. टंचाई निवारणासाठी तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी  यांनी  क्षेत्रिय स्‍तरावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेऊन जनतेच्‍या समस्‍यामागण्‍या समजावून घ्‍याव्‍यातआवश्‍यकतेनुसार पाण्‍याचे  टँकर वाढवावेत. जिल्‍हाधिकारी स्‍तरावर टँकरचे प्रस्‍ताव तात्‍काळ मंजूर केले जातीलअसेही ते म्‍हणाले.  पिण्‍याच्‍या पाण्‍यासाठी आवश्‍यकतेनुसार टँकर भरण्‍याकरीता पर्यायी मार्गाचाही शोध घेण्‍यात यावा. जिल्‍हयात चारा छावण्‍यांबाबत मागणी असल्‍यास त्‍याबाबत प्रस्‍ताव मंजुरीसाठी तातडीने पाठवावेत. पिण्‍याचे पाणीचारा टंचाईबाबतीत तातडीने उपाययोजना कराव्‍यात. अधिका-यांनी अधिकाराचा वापर केला पाहिजे. महत्त्‍वाची  विकास कामे करण्‍यासाठी आचारसंहिता शिथिल करण्‍यात आली  आहे. 
यावेळी लघुसिंचनलघुपाटबंधारेयांत्रिकीभूजलसर्व्‍हेक्षण विकास यंत्रणा,जिल्‍हा परिषदवन विभागसामाजिक वनीकरणकृषीया विभागाकडून करण्‍यात येत असलेल्‍या जलयुक्‍त शिवारगाळमुक्‍त धरण  या बाबत यंत्रणानिहाय कामांच्‍या सद्यस्थितीचा व खरीप हंगामात केली जाणारी खरीप/ रब्‍बी पीक कर्ज वाटपखतांचे वाटप इ. कामे यांचा आढावाही घेण्‍यात आला. सर्वांनी चांगला समन्‍वय ठेवून कामे करावीत असेही जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम म्‍हणाले. 
यावेळी  जिल्‍हयातील उप विभागीय अधिकारीतहसिलदारगट विकास अधिकारीजिल्‍हाधिकारी कार्यालयातील अधिकारीकर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

 
Top