Add

Add

0
वर्ल्ड क्लास लॅबसाठी टेक्‍नीश  आणि एमआयटीमध्ये सामंजस्‍य करार

पुणे(प्रतिनिधी ):- जागतिक दर्जाच्‍या लॅब निर्मितीसाठी टेक्‍नीश आणि एमआयटीमध्ये नुकताच सामंजस्‍य करार झाला आहे.नॅनो धूळ विस्फोट होण्याच्‍या धोक्‍यांवरील प्रयोगात्‍मक तपासणीसाठी संयुक्‍तपणे प्रयोग शाळेची स्‍थापना करण्यात येणार आहे. या सामंजस्‍य करारावर टेक्‍नीशचे संचालक निलेश सकपाल आणि माईर्स एमआयटीचे संस्‍थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी स्‍वाक्षरी केली. ही संशोधन ग्रांड सर्वात मोठी म्‍हणजे जवळपास 91.5 लाख रूपयांची आहे. 
यावेळी टीपीएलचे संचालक मेधा साकपाल,  टेक्‍नीशचे  अक्षय आगवान व हरीश कदम तसेच एमआयटीचे प्राचार्य डॉ.एल.के.क्षीरसागर, पेट्रोलियम विभागाचे प्रमुख डॉ. समर्थ पटवर्धन, डॉ.नाईक,डॉ.पाटील व डॉ. जाधव आदी मान्‍यवर उपस्‍थित होते.
या प्रयोगशाळेत स्फोटकपणा आणि ज्वलनशीलतेसाठी चाचणी केली जाईल. त्‍यात  खनन, औषध, पॉलिमर, तेल, गॅस आणि अन्न उद्योगातील विविध प्रकारचे धूळीचा समावेश आहे. प्रायोगिक डेटाच्या आधारावर, या प्रोजेक्ट अंतर्गत सुरक्षा मानकांची स्थापना करण्यासाठी गणितीय मॉडेल विकसित केले जाणार आहे. तसेच हे संशोधन आऊटपुट संरक्षण क्षेत्रासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.
विविध औद्योगिक क्षेत्रांमध्ये गुंतलेल्या धूळीचा धोका समजण्यासाठी आणि नॅनो धूळ कणांच्या विविध गुणधर्मांचे विश्लेषण करण्यासाठी संशोधन आवश्यक असल्याने, एमआयटीने  तंत्रज्ञानाद्वारे डीएसटी (एसई आरबी) कडे प्रस्ताव सादर केला होता. संशोधनासाठी हे अनुदान मंजूर केले गेले आहे आणि याचा वापर एमआयटी परिसर अंतर्गत अत्याधुनिक नॅनो-डस्ट स्फोट सुविधा स्थापित करण्यासाठी केला जाईल. 
हा मंजूर प्रस्ताव डीएसटी, सरकारच्या आयआरआरडी (इंडस्ट्री प्रासंगिक संबंधित आर अँड डी) योजने अंतर्गत आहे.

Post a Comment

 
Top